India-Pak Tension Why is the 'Red Cross' symbol on the roofs of hospitals amid India-Pak tension What does it mean
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. याच बिथरलेल्या परिस्थिती पाकिस्तानने भारताविरोधात खुरापती सुरु केल्या आहेत. पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याच वेळी जम्मू आणि काश्मीर येथील एका रुग्णालयावरील हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आणि मानवतावादी नियमांचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या हल्ल्यानंतर भारताच्या काही राज्यातील रुग्णालयांनी भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांच्या छतांवर रेड क्रॉस चिन्ह रेखाटले आहे. यामुळे जिनिव्हा करारा पुन्हा चर्चेत आला आहे.
अलीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी कारवाया सुरु आहेत. याच दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या एका रुग्णालयावर हल्ला झाला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान या हल्ल्यानंतर रुग्णालयाने छतावर रेड क्रॉसचे चिन्ह रेखाटले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पाहता जिनिव्हा कररानुसार, हवाई हल्ले आणि लष्करी कारवायांपासून आरोग्यसेवा केंद्रांचे संरक्षण करण्यासाठी रेड क्रॉस रेखाटण्यात आले आहे.
याचा अर्थ युद्धपरिस्थितीत मानवतावादी दृष्टीकोनातून काही ठिकाणांना संरक्षण मिळते. जिनिव्हा कायद्यांतर्गत रुग्णालये, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा केंद्रावर हल्ला करण्यास मनाई आहे. यामुळे भारता आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता रुग्णलयांच्या छतांवर रेड क्रॉस चिन्ह काढण्यात आले आहे.
1949 मध्ये स्थापन झालेल्या या मानतावदी कायद्याचे अत्यंत महत्व आहे. हा कायदा युद्धकाळात नागरिक, रुग्णालये आणि वैद्यकीय सेवांचे संरक्षण करतो. याअंतर्गत रेड क्रॉस, रेड क्रिसेंट आणि रेड क्रिस्टल ही चिन्हे रुग्णालयाच्या छतांवर आखली जातात. यामुळे या ठिकाणांचे हल्ल्यापासून संरक्षण होते.या कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केले जाते. तसेच चिन्हाचा गैरवापर देखील कायद्याचे उल्लंघन मानले जाते.
याचा वापर केवळ रुग्णालये, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा असलेल्या ठिकाणी करण्याची परवानगी आहे. युद्धादरम्यान याचा वापर अनिवार्य आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव उग्र होत चालला आहे. आज सकाळी पाकिस्तानने भारताच्या नियंत्रणे रेषेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भारताच्या 26 शहरांवर देखील हल्ला केला आहे. तथापि भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.