India Pakistan Ceasefire countries that played the role of mediator for the end of the India-Pakistan conflict
नवी दिल्ली: अखेर गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेला भारत आणि पाकिस्तान संघर्षाला विराम मिळाला आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई केली. यामागचे कारण म्हणजे पाकिस्तानचा सीमापार दहशतवादाला असणारा पाठिंबा आहे. दरम्यान भारताच्या कारवाईने पाकिस्तानची भंबेरी उडाली होती. पाकिस्तान भारताला वारंवार अणु हल्ल्याची धमकी देत होता. अशातच भारताने ०७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्क काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवथाळला. चवथाळलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या सैन्याने पाकिस्तानचे हल्ले धूडकावून लावले.
दरम्यान या काळात दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. जागतिक स्तरावर दोन्ही अणुशक्ती देशांमध्ये युद्ध होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी ‘पूर्ण आणि तात्काळ युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. तथापि भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविरामासाठी केवळ अमेरिका नव्हे तर इराण, सौदी, अरेबिया, कतार, यूएई, रशिया या देशांनी देखील प्रयत्न केला होता.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीसाठी अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेने भारताच्या अटींवर पाकिस्तानवर दबाव आणत संघर्षविराम घडवून आणला आहे. गेल्या ४८ तासांत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पतंप्रधान एस. जयशंकर, लष्कर प्रमुख असीम मुनीर, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल असीम मलीक या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अमेरिकेसोबत चर्चा झाली. या दीर्घ चर्चेदरम्यान भारत आणि पाकिस्ताने पूर्ण आणि तात्काळ युद्धविरामासाठी सहमती दर्शवली. याची माहिती ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. दोन्ही देशांनी विविध मुद्द्यांवर वाटाघाटी करण्यास सहमती दर्शवली आहे.
याच दरम्यान इराणने देखील भारत पाकिस्तानच्या तणावाच्या काळात मध्यस्थीची भूमिका घेतली. इराणने परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना शांती दूत म्हणून भारत-पाकिस्तान दौऱ्यावर पाठवले होते. दरम्यान अराघची यांनी दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शांततेसाठी पुढाकार घेतला. तसेच इराणशी झालेल्या चर्चेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले होते की, भारताला युद्ध नको आहे, पण पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचा हल्ला केल्या योग्य उत्तर देण्यात येईल. इराणने संघर्षविरामासाठी प्रयत्न केला परंतु ही चर्चा अयशस्वी ठरली.
या मुस्लिम देशांनी दिला संयम बाळगण्याचा सल्ला मे रोजी पत्र पाठवले होते. त्यांनी नवी दिल्लीत एस जयशंकर यांची भेट घेतली आणि नंतर पाकिस्तानला भेट दिली. या अनपेक्षित भेचीदरम्यान जुबैर यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सैदी अरेबियाने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले. सौदी अरेबियाची ही भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते.
याच वेळी यूएई आणि कतार या देशांनी देखील भारत आणि पाकिस्तानला शांततेचे आवाहन केले होते. यूएईचे उपतंप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांनी दोन्ही देशांना शांतात, संयम आणि समंजस्यपणा दाखवण्याचे आवाहन केले होते. जेणेकरुन तणाव आणखी वाढणार नाही. तसेच कतारनेही शांततेचे आवाहन केले होते.
दरम्यान तुर्की आणि अझरबैझान या दोन मुस्लिम देशांनी तसेच चीनने पाकिस्तानला आपला पाठिंबा दर्शवला होता. तर रशिया आणि इस्रायलने भारताला पाठिंबा दर्शवला होता. रशियाने देखील भारत आणि पाकिस्तानला मध्यस्थीची ऑफर दिली होती.