
फोटो सौजन्य AI
आकडेवारीनुसार , जुलैमध्ये भारताने रशियाकडून दररोज सुमारे २.८२ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले होते . ऑगस्टमध्ये हे प्रमाण घटून सुमारे २.०८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाले . म्हणजेच एका महिन्यात आयातीत सुमारे २६.३ टक्क्यांची घट झाली . रशियन तेलाच्या स्वस्त दराचा भारताला गेल्या काही वर्षात मोठा फायदा झाला आहे . त्यामुळे रशिया हा भारताचा तेल आयातीत महत्वाचा भागीदार बनला आहे .
रशियाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या कच्च्या तेलासाठी भारत आणि चीनमध्ये स्पर्धा वाढत आहे . चीनमधील रिफायनऱ्यांकडून रशियन तेलाची खरेदी वाढल्याने भारतासाठी उपलब्ध असलेल्या काही तेलाच्या बॅरल्सवर परिणाम झाला आहे . रशियाच्या तेल पुरवठ्यातील मर्यादा आणि आशियातील वाढती मागणी यामुळे भारतीय कंपन्यांना तेल खरेदीच्या धोरणात काही बदल करावे लागत आहेत .
याशिवाय भारतातील काही रिफायनऱ्यांमध्ये नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरु असल्याने कच्च्या तेलाची मागणी काही प्रमाणात कमी झाली . त्यामुळे ऑगस्टमध्ये रशियन तेलाच्या आयातीत झालेली घसरण ही केवळ एका कारणामुळे झालेली नसून अनेक घटकांचा एकत्रित परिणाम असल्याचे मानले जाते .
आयातीत मोठी घट झाली असली तरी भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील रशियाचे महत्व कायम आहे . ऑगस्टमध्ये भारताने आयात केलेल्या एकूण कच्च्या तेलापैकी सुमारे ४५ % हिस्सा रशियाचा होता . त्यामुळे चीनची वाढती मागणी आणि जागतिक तेल बाजारातील बदलांमुळे भारतासमोर स्वस्त कच्च्या तेलाचा पुरवठा कायम ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे . भारत जगातील प्रमुख कच्चा तेल आयातदार देशांपैकी एक आहे .
त्यामुळे रशियन तेलाच्या पुरवठ्यातील बदलांचा परिणाम देशाच्या रिफायनींग क्षेत्रासोबतच पेट्रोल – डिझेल किमती , व्यापार तूट अंडी ऊर्जा सुरक्षेवरही होऊ शकतो . आगामी काळात रशियाकडून किती तेल खरेदी करतो अंडी चीनची मागणी वाढते , याकडे जागतिक बाजाराचे लक्ष राहणार आहे .