Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा

Hajj 2026 : भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध अधिक दृढ होत चालले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे दोन्ही देशात २०२६ च्या हज यात्रेसाठी एक करार करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय यात्रेकरुंना चांगल्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2025 | 11:27 AM
India, Saudi Arabia sign Haj 2026 agreement

India, Saudi Arabia sign Haj 2026 agreement

Follow Us
Close
Follow Us:
  • २०२६ च्या हज यात्रेसाठी भारत आणि सौदी अरेबियात करार
  • हज यात्रेकरुंना मिळणार नवीन व्यवस्था
  • आरोग्य सेवांमध्ये मोठा सुधार

Hajj 2026 News in Marathi: रियाध/नवी दिल्ली : दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लिम बांधव सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी (Hajj Piligrim)  जातात. मक्का या पवित्र शहरात या यात्रेचे आयोजने केले जाते. यामुळे जगभरातून येणाऱ्यांसाठी एक कोटा निश्चित केला जातो. येत्या २०२६ च्या यात्रेसाठी भारतीय हज यात्रेकरुंसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने सौदी अरेबियासोबत २०२६ च्या हज यात्रेसाठी एक करार केला आहे.

मलेशियात भीषण दुर्घटना! किनाऱ्याजवळ ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली ; शेकडो बेपत्ता…

भारत सौदी अरेबियात द्विपक्षीय करार

हा करार दोन्ही देशांतली दृढ संबंधाचे प्रतीक आहे. भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय मंत्री किरेन रिजिजू ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात हज यात्रेकरुंसाठी महत्त्वाचा द्विपक्षीय करार करण्यात आला.

रिजिजू यांनी सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फव्झान अल रबिया यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाला. यावेळी हज यात्रेच्या २०२६ च्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच दोन्ही देशात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. यावेळी यात्रेकरुंना मिळणाऱ्या सुविधांवरही चर्चा झाला.

याअंतर्गत भारतीय हज यात्रेकरुंना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये निवास व्यवस्था, वाहतूक आणि आरोग्य सेवा भारतीय हज यात्रेकरुंना दिल्या जाणार आहेत. यामुळे यात्रेकरुंचा हज प्रवास अधिक सुखकर होईल.

यंदाचा भारताचा हज कोटा

या बैठकीत २०२६ च्या हज यात्रेसाठी भारतीय यात्रेकरुंसाठी एक कोटा निश्चित करण्यात आला आहे. करारानुसार, १७५,०२५ यात्रेकरुंचा कोटा हजसाठी निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही मंत्र्यांनी रियाधच्या दूतावास आणि जेद्दाहमदील भारतीय वाणिज्य दूतावासचा आढावाही घेतला.

भारतीय कोट्यात वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये हज यात्रेसाठी भारताचा कोटा 1,36,020 होता, त्यानंतर 2015 मध्ये तो 1,75,025 वाढवण्यात आला होता. हा कोटा दरवर्षी सौदी अरेबियाकडून निश्चित केला जातो. २०२४ मध्ये हज यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

यामुळे हा कोटा कमी 1,22,518 करण्यात आला होता. पण २०२६ कोट्यात काहीशी वाढ करण्यात आली आहे. विमानांपासून ते मक्का-मदिना पर्यंतची वाहतूक, मीना कॅम्पमध्ये राहण्याची सोय, निवास, जेवण या सर्व व्यवस्था मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली आहे.

काय आहे हज यात्रा?

हज यात्रेला गेल्यानंतर सर्व प्रकारच्या चुका, पाप माफ होतात असे बोलले जाते. यावेळी मुस्लिम पुरुष बांधव पांढरे कपडे परिधान करतात. तर महिलांना कोणत्याही रंगाचे सैल कपडे घालण्याची परवानगी असते. 628 मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी १४०० अनुयानांना घेऊन प्रवास सुरु केला होता. त्यानंतर त्यांनी केलेला हा प्रवास इस्लामचा पहिला तीर्थयात्रा ठरला आणि पुढे जाऊन या यात्रेला हज असे नाव देण्यात आले.

जपान हादरला! २४ तासांत सात भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा जारी

Web Title: India saudi arabia sign haj 2026 agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?
1

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?
2

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

Explainer : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल?
3

Explainer : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल?

जपान हादरला! २४ तासांत सात भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा जारी
4

जपान हादरला! २४ तासांत सात भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.