Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर

India US Relation : सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे जगभरात तेलाचा पुरवठा कमी पडत आहे. यामुळे भारतही अडचणीत आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका-भारतात वाद निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 02:55 PM
India says No Permission Needed for Russian Oil Imports

India says No Permission Needed for Russian Oil Imports

Follow Us
Follow Us:
  • भारताने अमेरिकेला सुनावले खडे बोल
  • रशियाकडून तेल खरेदीसाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही
  • जाणून घ्या काय म्हटले होते अमेरिकेने?
नवी दिल्ली : रशियाकडून तेल आयातीसाठी सवलत दिल्याच्या अमेरिकेच्या दाव्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी, केंद्र सरकारने अमेरिकेला खडे बोल सुनावत सांगितलो की, रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. भारताने असेही म्हटले आहे की, रशियाकडून तेल आयात करत राहू. इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जाक्षेत्र विस्कळीत झाले आहे, ज्यामुळे जगभरात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. होमुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे जाण्यापासून रोखण्याच्या इराणच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे.

सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारत तेल खरेदीसाठी अल्पकालीन सवलतींवर अवलंबून नाही. ‘भारत कधीही रशियन तेल खरेदी करण्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीवर अवलंबून राहिलेले नाही. भारत यापुढेही रशियन तेल आयात करत राहील आणि रशिया भारताचा सर्वांत मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार राहील.

Fuel Prices: ‘रशियाचा फायदा नाही, जगाचं हित!’ ट्रम्प यांनी भारताला रशियन तेलाच्या खरेदीसाठी दिली सूट; सवलतीमागे मोठे राजकारण

काय म्हणाला होता अमेरिका ?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री स्कॉट बेसेंट यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, “जागतिक बाजारात तेलाची उपलब्धता कायम राखणे ही आमची प्राथमिकता आहे. भारतीय रिफायनरीजना ही सूट केवळ समुद्रात असलेल्या चालू व्यवहारांपुरतीच मर्यादित असेल, जेणेकरून रशियाला कोणताही नवीन मोठा आर्थिक फायदा होणार नाही, परंतु जागतिक पुरवठा साखळी कोलमडणार नाही.” यामुळे भारताला आपले ऊर्जा स्रोत टिकवून ठेवण्यासाठी ३० दिवसांचा महत्त्वाचा वेळ मिळाला आहे.

होर्मुझची नाकेबंदी आणि भारतापुढील आव्हान

जगातील एकूण तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. भारत आपल्या गरजेच्या ८८ टक्के कच्चे तेल आणि ५० टक्के नैसर्गिक वायू आयात करतो, ज्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो. इराणने हा मार्ग रोखल्यामुळे भारतासमोर मोठे संकट उभे राहिले होते. या संकटकाळात अमेरिकेने भारताच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी जवळून काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

LPG च्या किमतीत ६० रुपये वाढ

इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताकडे २५ कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा आहे. तथापि, भारताने शनिवारी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ केली. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली. जागतिक स्तरावर, शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमती ८.५ टक्क्यांनी वाढल्या आणि या आठवड्यात जवळजवळ ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियन तेल खरेदीवरून भारत-अमेरिकेत वाद का निर्माण झाला?

    Ans: अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीसाठी तात्पुरती सवलत दिली असल्याचा खळबळजनक दावा केला. परंतु भारत सरकारने स्पष्ट केले आहे, रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नाही.

  • Que: रशियन तेल भारतासाठी एवढे महत्त्वाचे का आहे?

    Ans: भारत आपल्या गरजेच्या सुमारे ८५-८८% कच्चे तेल आयात करतो. यातील बहुतांश तेल रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात मिळते. यामुळे भारतासाठी ते ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Web Title: India says no permission needed for russian oil imports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • America
  • crude oil
  • India Russia relations

संबंधित बातम्या

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल
1

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल

BRICS Summit : चीनचा AI मास्टरप्लॅन! BRICS देशांसाठी ‘Open Source Zone’; अमेरिकेला नवा टेक्नॉलॉजी चॅलेंज?
2

BRICS Summit : चीनचा AI मास्टरप्लॅन! BRICS देशांसाठी ‘Open Source Zone’; अमेरिकेला नवा टेक्नॉलॉजी चॅलेंज?

9/11 Attacks: अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या फाईलमधून नवीन खुलासे; वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यापूर्वीच भारत होता बिन लादेनचा निशाणा
3

9/11 Attacks: अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या फाईलमधून नवीन खुलासे; वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यापूर्वीच भारत होता बिन लादेनचा निशाणा

Russia-India Aviation : रशियाचं विमान भारताच्या आकाशात! Il-114-300 च्या १०५ विमानांचा मेगा प्लॅन
4

Russia-India Aviation : रशियाचं विमान भारताच्या आकाशात! Il-114-300 च्या १०५ विमानांचा मेगा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.