
US Midterm Elections 2026 James Talarico Dosa Campaign
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचा (US Midterm Elections) प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत (US Midterms) विजयाची चावी हाती घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत. परंतु, यावेळच्या प्रचाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांनी थेट ‘भारतीय-अमेरिकन’ समुदायाला (Indian-American Community) केंद्रस्थानी ठेवले आहे. भारतीय मतदारांची वाढती संख्या आणि त्यांची राजकीय ताकद लक्षात घेता उमेदवारांनी भारतीय संस्कृतीशी जुळवून घेण्याचा नवा मार्ग निवडला आहे. यामध्ये कुणी भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन गरम-गरम डोसा बनवताना दिसत आहे, तर कुणी हिंदू मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना करत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवत आहे.
अमेरिकेतील या अनोख्या प्रचाराचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरले आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जेम्स टॅलारिको (James Talarico). टेक्सास (Texas) राज्याच्या सिनेट जागेसाठी निवडणूक लढवत असलेले टॅलारिको हे रिपब्लिकन पक्षाचे दिग्गज उमेदवार केन पॅक्सटन (Ken Paxton) यांना तगडे आव्हान देत आहेत. प्रचार मोहिमेदरम्यान टॅलारिको यांनी डलासच्या उपनगरातील इर्विंग (Irving) येथील एका प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटला भेट दिली. तेथे त्यांनी केवळ मतदारांशी संवाद साधला नाही, तर स्वतः शेफची टोपी घालून तव्यावर तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत मसाला डोसा तयार केला.
टॅलारिको यांनी डोसा तयार करून केळीच्या पानावर सर्व्ह केला, तेव्हा उपस्थित भारतीय समुदायाने टाळ्यांच्या गजर करून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. टॅलारिको यांच्या या कृतीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्यावसायिक आणि राजकीय विश्लेषक जेम्स ब्लंट (James Blunt) यांनी या प्रयत्नांचे जोरदार समर्थन केले. ब्लंट यांनी स्पष्ट केले की, “एकीकडे रिपब्लिकन समर्थकांकडून भारतीयांबद्दल आणि त्यांच्या खाद्यपदार्थांबद्दल नकारात्मक टिप्पणी केली जात असताना, टॅलारिको हे भारतीय तांदळापासून बनवलेल्या चविष्ट डोशाच्या माध्यमातून लोकांची मने जोडण्याचे काम करत आहेत. एका बाजूला फूट पाडणारे राजकारण आहे, तर दुसऱ्या बाजूला सहकार्याची भूमिका आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh Ties : दिल्ली नाही, ढाक्यात भारतविरोधी घोषणाबाजी; तारिक रहमान यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक, राजीनाम्याची मागणी
केवळ अन्नपदार्थांपुरता हा प्रचार मर्यादित राहिलेला नाही, तर ज्या राज्यांमध्ये भारतीय-अमेरिकन नागरिकांची लोकसंख्या मोठी आहे, तेथील मंदिरे आता उमेदवारांच्या राजकीय संवादाची मुख्य केंद्रे बनली आहेत.
पेन्सिल्व्हेनियाच्या हॅरिसबर्ग (Harrisburg) भागात रिपब्लिकन काँग्रेस सदस्य रँडी फाईन (Randy Fine) आणि स्कॉट पेरी (Scott Perry) यांनी भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक मंदिरांना भेटी दिल्या. भारतीय समुदायाचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणे, हा या भेटींमागचा मुख्य उद्देश होता.
Texas Democratic US Senate candidate @jamestalarico making a mouth watering masala dosa in Dallas! 🤤 https://t.co/z02BqoRSxr — Nathan Punwani (@npunwani) October 30, 2026
credit – social media and Twitter
त्याचप्रमाणे, मिशिगनचे (Michigan) काँग्रेस सदस्य जॉन जेम्स (John James) यांनीही स्वामीनारायण मंदिराला भेट देऊन मंदिराच्या परंपरा, स्थापत्यशास्त्र आणि हिंदू-अमेरिकन समुदायाची सामाजिक सेवा याबद्दल सविस्तर माहिती घेतली. मिशिगनसारख्या चुरशीच्या राज्यात १-२ टक्के मतेही अत्यंत निर्णायक ठरतात, त्यामुळे ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Prime Meridian Day : कसा झाला जन्म GMT आणि Time Zones चा? जाणून घ्या पृथ्वीची वेळ ठरवणाऱ्या ‘त्या’ काल्पनिक रेषेबद्दल
अमेरिकेतील राजकीय समीकरणांचा विचार केला असता, कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, इलिनॉय, पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जिया या प्रमुख राज्यांमध्ये भारतीय-अमेरिकन नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषतः पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना यांसारख्या “बॅटलग्राउंड स्टेट्स” (Battleground States) मध्ये जय-प्रजयाचे अंतर अत्यंत कमी असते.
अशा वेळी १ ते २ टक्के भारतीय मतदारांचे मतदानही उमेदवारांचे भवितव्य बदलू शकते. यामुळेच अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये उमेदवारांनी भारतीय समुदायाला आकर्षित करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. आता ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानामध्ये या ‘डोसा डिप्लोमसी’ आणि ‘मंदिर दौऱ्यां’चा उमेदवारांना किती फायदा होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Ans: टेक्सासमधील सिनेट जागेचे डेमोक्रॅटिक उमेदवार जेम्स टॅलारिको (James Talarico) यांनी इर्विंग येथील रेस्टॉरंटमध्ये स्वतः डोसा बनवून भारतीय मतदारांचे लक्ष वेधून घेतले.
Ans: टेक्सास, पेन्सिल्व्हेनिया आणि मिशिगनसारख्या राज्यांमध्ये १-२ टक्के भारतीय मतदारांची मतेही विजय-पराजयाचे गणित बदलण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतात.
Ans: अमेरिकन नेत्यांनी न्यू जर्सीतील अक्षरधाम मंदिर तसेच ओहायो, हॅरिसबर्ग आणि मिशिगनमधील BAPS स्वामीनारायण मंदिरांमध्ये जाऊन प्रचार केला.