Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘UNSC’ मध्ये भारताला सदस्यत्व हवे; रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी व्यक्त केली भूमिका

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देशांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 21, 2024 | 12:39 PM
'UNSC मध्ये भारताला सदस्यत्व हवे' रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी व्यक्त केली भूमिका

'UNSC मध्ये भारताला सदस्यत्व हवे' रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी व्यक्त केली भूमिका

Follow Us
Follow Us:

मॉस्को: रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देशांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. लावरोव यांनी नमूद केले आहे की, जगातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणे महत्त्वाचे आहे आणि जागतिक संघटनेत प्रादेशिक दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या देशांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सुरक्षा परिषदेत भारतासारख्या महत्त्वाच्या देशांना कायमस्वरूपी सदस्य म्हणून समावेश करण्याची गरज असल्याचे लावरोव यांनी म्हटले आहे.

भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देश सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी पात्र आहेत

मिळालेल्या माहितीनिसरा, रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी एका मीडियाशी संवाद साधताना हे स्पष्ट केले आहे. त्यांनी भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देश दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. त्यांचे प्रतिनिधित्व कायमस्वरूपी असणे ही जागतिक बहुसंख्यांचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक बाब आहे. विशेषतः ग्लोबल साउथचा आवाज अधिक ठळक करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असेही लावरोव यांनी म्हटले.

हे देखील वाचा- Russia Ukraine War: रशियाविरूद्ध झेलेन्स्कीची विजय योजना; अमेरिकन आणि युरोपीय मित्र राष्ट्रांत मतभेद

चीनच्या विरोधामुळे भारताला UNSC मध्ये जागा मिळाली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील पाच कायमस्वरूपी सदस्यांमध्ये चीन, रशिया, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. भारताला कायम सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनीही लावरोव यांना आदीच समर्थन दिले होते. मात्र चीनने याला विरोध केला आहे. चीनने यामध्ये अडथळे निर्माण केल्याने भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आत्तापर्यंत जागा मिळाली नाही. सध्या, 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेतील 10 सदस्य अस्थायी असून 5 सदस्य कायमस्वरूपी आहेत.

रशियाने भारताच्या बाजूने आवाज उठवला

मीडिया रिपोर्टनुसार, 2021-22 मध्ये भारताने अस्थायी सदस्य म्हणून सुरक्षा परिषदेवर काम केले होते. त्या काळातही भारताने UNSC मध्ये सुधारणा आणि कायमस्वरूपी जागांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. यामुळे रशियाने जागतिक स्तरावर दक्षिणेचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी भारताच्या बाजूने आवाज उठवला आहे. लावरोव यांनी असेही सांगितले आहे की, न्याय जागतिक व्यवस्थेसाठी सुरक्षा परिषदेत भारताचे आणि इतर प्रमुख देशांचे प्रतिनिधित्व वाढविणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्थिरता सुनिश्चित होईल.

हे देखील वाचा- अमेरिका आणि कॅनडाने मिळून चीनचा ताण वाढवला; संवेदनशील भागात युद्धनौका दाखल

Web Title: India shoul be in un securirty council parliment says russian foreign minister lavrov nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 12:39 PM

Topics:  

  • America
  • China
  • india
  • Russia

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
2

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.