पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि उघडकीस आलेली भूमिका
पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे हा हल्ला “स्थानिक जनतेचा भारतातील हिंदुत्ववादी सरकारविरोधातील उठाव” असल्याचे हास्यास्पद आणि निराधार कारण दिले गेले. मात्र, पाच ते सात प्रशिक्षित दहशतवाद्यांचा सहभाग, त्यांना स्थानिक दोन अतिरेक्यांची साथ, आणि सर्वांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, हे अधिकृत तपासात स्पष्ट झाले आहे. प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबाच्या संशयितांची स्केचेस प्रसिद्ध करण्यात आली आहेत आणि त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणातील एक संशयित, विजबेहेराचा आदिल पुरी, याची ओळख मृत पर्यटकाच्या हत्येत झाली आहे. आदिल २०१८ मध्ये भारतातून पाकिस्तानात घुसला होता आणि तिथे लष्करसोबत प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: कॉउंटडाऊन सुरू! फक्त 7 दिवसांत भारत उचलणार पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल
भारताची कठोर कारवाई, संरक्षण सल्लागारांची हकालपट्टी
भारत सरकारने या दहशतवादी कृत्याला गंभीरपणे घेत, पाकिस्तानमधील भारतीय दुतावासातील लष्कर, नौदल आणि वायुदल सल्लागारांना परत बोलावले आहे. त्याचवेळी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील सल्लागारांना ‘अवांछित व्यक्ती’ जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत औपचारिकपणे निश्चित करण्यात आली. याशिवाय, अटारी येथील इंटिग्रेटेड चेक पोस्ट तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयांचा पुनर्विचार फक्त तेव्हाच केला जाईल जेव्हा पाकिस्तान दहशतवादाला कायमस्वरूपी थांबवेल, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे.
भारताची कूटनीती, खाडी राष्ट्रांशी सामंजस्य, चीनकडे ठोस भूमिका
भारताने यावेळी खाडी देशांशी असलेले संबंध प्रभावीपणे वापरण्याची गरज ओळखली आहे. दिल्लीने आता काबूल आणि तेहरान यांच्याशी जवळीक वाढवून, मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरमध्ये सामील होण्याच्या संधी अधिकाधिक स्वीकाराव्यात, असा अभ्यासकांचा सल्ला आहे. याशिवाय, चीनकडेही भारताने ठामपणे भूमिका मांडण्याची गरज आहे, कारण पाकिस्तानचा आजचा सर्वात मोठा आर्थिक आधार चीन आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात चीन भारताशी संबंध सुधारण्यास उत्सुक होता. त्यामुळे भारताने चीनसमोर अशी अट घालावी की, ते पाकिस्तानला भारतविरोधी कारवायांपासून रोखतील, अन्यथा आर्थिक हितसंबंध धोक्यात येतील.
#PahalgamAttack,India takes strong diplomatic action:
IndusWaterTreaty suspended
Diplomatic mission strengthned to 30
Pak military diplomats declred persona non grata
SAARC visa for Pak canceled
Wagah-Attari border closed
Terror has conseqnces#IndiaWillAvenge #NationWantsRevenge pic.twitter.com/PeIhcBYntE— Mahmud Saad (@MahmudSaad75232) April 23, 2025
credit : social media
हायब्रीड स्ट्रॅटेजीचा अवलंब, भारताची ‘स्मार्ट डिप्लोमसी’
पाकिस्तानसारख्या देशावर लष्करी कारवाई टाळून, दहशतवाद्यांच्या मूळ स्रोतांना लक्ष्य करणे हीच सर्वश्रेष्ठ रणनीती आहे. भारताने ‘हायब्रीड स्ट्रॅटेजी’ राबवण्याचा विचार करावा – ज्यात थेट लष्करी टकराव टाळून पार्श्वभूमीतील पाकिस्तानी तंत्रज्ञान, लॉजिस्टिक आणि आर्थिक पाठबळावर प्रहार केला जाईल. पहलगाम हल्ल्याचा उद्देश केवळ काश्मीरमधील पर्यटनाला हानी पोहोचवणे नव्हता, तर तो आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्याचा पाकिस्तानचा कट होता. भारताने या सापळ्यात न अडकता, अत्यंत शहाणपणाने आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Persona Non Grata : भारताकडून पाकिस्तानला राजनैतिक झटका, पाक राजदूतांना ‘नॉन ग्राटा’ नोट
भारत आता कठोर भूमिकेत
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जी धोरणात्मक पावले उचलली आहेत, ती फक्त तात्कालिक प्रतिक्रियेसाठी नाहीत, तर पाकिस्तानला कायमस्वरूपी दहशतवादाच्या पाठींब्यापासून परावृत्त करण्यासाठी आहेत. ही रणनीती भारताच्या जागतिक कूटनीतिक प्रभावाला वाढवणारी असून, पाकिस्तानवर सर्वदिशांनी दबाव निर्माण करणारी ठरणार आहे – आर्थिक, राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही.