
india us venezuela oil trade marco rubio visit controversy
Marco Rubio India Visit 2026 : जागतिक राजकारणात आणि ऊर्जा क्षेत्रात सध्या मोठी खळबळबळ उडाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या आगामी भारत दौऱ्यापूर्वी त्यांनी केलेल्या एका दाव्याने आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात नवा वाद पेटवला आहे. अमेरिका भारताला हवी तेवढी ऊर्जा आणि तेल पुरवण्यास तयार असल्याचे सांगतानाच, रुबियो यांनी व्हेनेझुएलाच्या (Venezuela) हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येत असल्याचा मोठा खुलासा केला. विशेष म्हणजे, भारत किंवा व्हेनेझुएला या दोन्ही देशांनी या दौऱ्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. अमेरिकेने भारताच्या परराष्ट्र धोरणा संदर्भातील गुप्त माहिती आधीच उघड केल्यामुळे भारतातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
या संपूर्ण घडामोडींमागे अमेरिकेचे केवळ व्यापारी हित नसून एकाच वेळी अनेक जागतिक आणि भू-राजकीय (geopolitical) उद्दिष्टे साध्य करण्याचा मोठा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे होर्मुझ सामुद्रधुनीच्या (Strait of Hormuz) संकटामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली असताना, दुसरीकडे रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलाला शह देण्यासाठी अमेरिका ही खेळी खेळत आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे लवकरच भारताच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर येत असून ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात नवी दिल्ली येथे ‘क्वाड’ (Quad) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठकही होणार आहे. या दौऱ्यापूर्वी मियामी येथे पत्रकारांशी बोलताना रुबियो यांनी भारताला अमेरिकेचा एक ‘उत्तम भागीदार’ आणि ‘विश्वासू मित्र’ म्हटले. ते म्हणाले, “अमेरिका सध्या आपल्या उत्पादनाच्या ऐतिहासिक पातळीवर आहे आणि भारत जितके तेल किंवा वायू खरेदी करेल, तितका पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mount Everest Record: चीनच्या ‘एका’ चुकीमुळे एव्हरेस्टवर गर्दीचा पूर! 274 जणांनी एकाच वेळी रोवला झेंडा; मोडला अनेक वर्षांपूर्वीचा
सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटामुळे भारताला आपल्या तेल आयातदारांच्या यादीत विविधता आणणे गरजेचे झाले आहे. नेमकी हीच संधी साधून अमेरिका भारताच्या एकूण ऊर्जा बाजारात आपला वाटा वाढवू पाहत आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते अमेरिकेचे हे तेल जागतिक बाजारपेठेत रशिया आणि आखाती देशांच्या तुलनेत खूप महाग आहे, ज्यामुळे भारताच्या तिजोरीवर आर्थिक भार पडू शकतो.
जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप सुरूच आहे. रशिया या युद्धासाठी लागणारा पैसा आपल्या तेल विक्रीतून उभारत असल्याचा आरोप अमेरिकेने वारंवार केला आहे. भारत सध्या रशियाकडून सर्वात जास्त प्रमाणावर तेल आयात करतो, ज्यामुळे अमेरिका नाराज आहे. अमेरिकेने भारताला यापूर्वी अनेकदा अप्रत्यक्ष धमक्या दिल्या होत्या आणि २५% आयात शुल्कही लादले होते, जे नंतर हटवण्यात आले.
BREAKING: “We want to sell India as much energy as they can buy. There are also opportunities around oil from Venezuela. In fact, I believe the interim President of Venezuela is travelling to India next week,” announces US Secretary of State Rubio pic.twitter.com/Aaoe1meQQa — Shashank Mattoo (@MattooShashank) May 21, 2026
credit – social media and Twitter
आता अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंधांमधून भारताला मिळालेली एक महिन्याची सूट वाढवली आहे. मात्र, त्या बदल्यात भारताने रशियाऐवढी तेल आयात कमी करून ती अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून करावी, अशी वॉशिंग्टनची अट आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर तेथील तेल व्यापारावर अमेरिकेचे थेट नियंत्रण आले आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाचे तेल भारताला विकून अमेरिका स्वतःचा फायदा करून घेण्यासोबतच रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा दुहेरी उद्देश साध्य करत आहे.
केप्लरच्या (Kpler) ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात व्हेनेझुएलाने अमेरिका आणि सौदी अरेबियाला मागे टाकत भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनण्याचा मान मिळवला आहे. व्हेनेझुएलाने या महिन्यात भारताला दररोज तब्बल ४,१७,००० बॅरल तेलाचा पुरवठा केला आहे, जो एप्रिल महिन्यात केवळ २,८३,००० बॅरल प्रति दिवस होता. गेल्या नऊ महिन्यांपासून व्हेनेझुएलाकडून होणारी आयात पूर्णपणे ठप्प होती, परंतु जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यामुळे आणि रिलायन्ससारख्या भारतीय कंपन्यांकडे व्हेनेझुएलाच्या जड तेलावर प्रक्रिया करण्याचे विशेष तंत्रज्ञान असल्यामुळे भारताने पुन्हा एकदा तिथून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fazlur Rehman: ‘भारतासोबतचे संबंध बिघडले, जर उद्या मला ठार मारले तर…’, छाती बडवत ‘या’ पाकिस्तानी नेत्याने थेट आसिम मुनीरना घेरले
रिलायन्स इंडस्ट्रीजकडे असलेल्या अत्याधुनिक रिफायनरींमुळे व्हेनेझुएलाचे स्वस्त कच्चे तेल भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. मात्र, या संपूर्ण व्यापारावर अमेरिकेची बारीक नजर असून, भारताने व्यापारी हितासोबतच त्यांच्या भू-राजकीय दबावाला बळी पडू नये, असे आव्हान भारतासमोर असणार आहे.
मार्को रुबियो यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्याची माहिती आधीच जाहीर केल्याने भारतात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी यावर तीव्र आक्षेप घेत विचारले आहे की, “भारतीय परराष्ट्र धोरणाबाबत अमेरिकेला आधीच कसे काय कळते?” यापूर्वीही अमेरिकेने भारताच्या अशाच काही धोरणात्मक निर्णयांची घोषणा आधीच केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज या भारतात आयोजित ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ (IBCA) च्या बैठकीसाठी येणार होत्या, परंतु आता या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील या दौऱ्याचे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत, भारताची ऊर्जा सुरक्षा ही बाजारपेठेतील अर्थशास्त्र आणि देशाच्या हितावर अवलंबून राहील, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले, तरी अमेरिकेचा हा वाढता हस्तक्षेप भारताच्या परराष्ट्र धोरणाची मोठी परीक्षा घेणारा ठरेल.
Ans: रुबियो यांनी भारत किंवा व्हेनेझुएलाने अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्याचे गुपित उघड केले, ज्याला काँग्रेसने भारतीय परराष्ट्र धोरणातील अमेरिकेचा हस्तक्षेप म्हणत आक्षेप घेतला आहे.
Ans: मे महिन्यात व्हेनेझुएलाने अमेरिका आणि सौदी अरेबियाला मागे टाकत भारताला दररोज ४,१७,००० बॅरल तेल पुरवून तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनण्याचा मान मिळवला आहे.
Ans: भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे बंद करून ते अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून घ्यावे, जेणेकरून रशियाची आर्थिक कोंडी होईल अशी अमेरिकेची इच्छा आहे, परंतु भारत स्वतःच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत आहे.