
Indian man dies in Saudi Arabia between crossfire of cops and smugglers
Indian Man killed in Saudi : रियाध : एक मोठी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियात (Saudi Arabia) एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस आणि गुंडांच्या चकामकी दरम्यान ही घटना घडली असल्याचे रियाधमधील भारतीय दूतावासाने सांगितले आहे. तसेच भारतीय दूतावासाने या घटनेवर शोक व्यक्त करत पीडीताच्या कुटुंबियांना सर्वोतपरी महत करण्याचे म्हटले आहे.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, सौदीर अरेबियात काम करण्यासाठी गेलेल्या एका भारतीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदीच्या डुमरी येथे पोलिस आणि गुंडांमध्ये चकामक सुरु होती. या चकामकी दरम्यान तरुण ठार झाला आहे. तरुणाची ओळख २६ वर्षीय, विजय कुमार महातो अशी पटवण्यात आली आहे.
विजय झारखंडच्या गिरीडीह येथील रहिवासी आहे. सौदी अरेबियात विजय काम करण्यासाठी गेला होता. यावेळी तो एका कारखान्याजवळून जात असताना ही घटना घडली. पोलिस आणि गुंडांच्या चकामकीत एक गोळी चुकून विजयला लागली आणि तो जागीच ठार झाला. या घटनेने विजयच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भारतीय दूतावासाची प्रतिक्रिया
दरम्यान या घटनेची माहित देताना भारतीय दूतावासाने म्हटले की, सध्या त्यांनी सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. तसेच या घटनेच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.त. या शिवाय भारतीय दूतावासाने पीडिताच्या कुटुंबाप्रतील संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौदीचे पोलिसांना अवैध दारु व्यापाराबाबत टीप मिळाली होती. यावेळी पोलिस चौकशीसाठी घटनास्थळी आले होते. दरम्यान यावेळी पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये गोळीबार सुरु झाला आणि याच वेळी तिथूनच जात असलेल्या भारतीय तरुण विजय महातो याला गोळी लागली.
🇸🇦💔 Jharkhand Man Killed in Saudi Crossfire — A Heartbreaking Story Vijay Kumar Mahato (27) from Giridih, Jharkhand, working with Hyundai Engineering in Saudi Arabia, was tragically shot dead after being caught in a police–gang crossfire near Jeddah. Before dying, he sent a… pic.twitter.com/ob2mSZa8qk — Anwar Muloor (@AnwarMuloor) October 31, 2025