 
        
        इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा विनाशाला सुरूवात; 2 इस्रायली सैनिकांच्या बदल्यात ३० पॅलेस्टिनींचे मृतदेह
Israel and Hamas war: इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदी आणि संघर्ष हा केवळ एक खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. दोन्ही देश एकमेकांविरुद्ध धोरणात्मक खेळी करताना दिसत आहेत. गाझाने दोन मृत बंधकांचे मृतदेह इस्रायलला दिले असताना, इस्रायलने आता ३० पॅलेस्टिनींचे मृतदेह हमासला सोपवले आहेत. त्यामुळे इस्त्रायल आणि हमासमध्ये बाजूंमधील तणाव वाढला असून आता विध्वंसाचा खेळ सुरू झाला आहे. दोन्ही बाजूंमधील हे एक नवीन “प्रेतयुद्ध” म्हणून पाहिले जात आहे.
‘मला मृत्यूदंड सुनावला तरी…’; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ; विद्यमान सरकारवर देखील डागली तोफ
हमासने बंधकांना परत करण्यास विलंब केल्यानंतर अलिकडेच इस्रायली सैन्याने गाझावर मोठा हल्ला केला. शेकडो लोक मारले गेले. त्यानंतर, गाझा युद्धबंदी भंग झाली. इस्रायलने हमासवर जाणीवपूर्वक बंधकांना परत करण्यास विलंब केल्याचा आरोप केला. नंतर गुरुवारी, इस्रायलने गाझामध्ये दुसऱ्यांदा युद्धबंदी जाहीर केली. हमास आता बहुतेक बंधकांना मृत किंवा त्यांच्या अवशेषांमध्ये परत करत आहे. यामुळे इस्रायल संतप्त झाले आहे.
इस्रायलने २ सैनिकांच्या बदल्यात ३० पॅलेस्टिनींचे मृतदेह हमासला सोपवले आहेत. गाझा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे गाझामध्ये तणाव वाढला आहे. गाझामधील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी दोन ओलिसांचे अवशेष इस्रायलला सोपवल्यानंतर एका दिवसात हे मृतदेह सोपवण्यात आले. अवशेषांची ही देवाणघेवाण युद्धबंदीनंतर झाली. १० ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धबंदीचा उद्देश इस्रायल आणि हमास अतिरेकी गटामधील आतापर्यंतच्या सर्वात घातक आणि सर्वात विनाशकारी युद्धाचा अंत करणे आहे.
इस्रायलच्या कठोर कारवाई आणि कडक भूमिकेमुळे अखेर हमासला माघार घ्यावी लागली आहे. गुरुवारी हमासने रेड क्रॉसच्या माध्यमातून दोन मृत इस्रायली बंधकांच्या अवशेषांसह शवपेट्या इस्रायली सैन्याकडे सुपूर्द केल्या. हे अवशेष ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यात ओलीस ठरलेल्या दोन इस्रायली नागरिकांचे असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी झालेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यांच्या दबावाखाली हमासने ही पावले उचलली. या घडामोडीनंतर डळमळीत झालेल्या युद्धबंदीला काहीशी बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने काल रात्री उशिरा पुष्टी केली. हे अवशेष सहर बारुच आणि अमिरम कूपर यांचे आहेत, ज्यांचे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यात अपहरण करण्यात आले होते. या हल्ल्यापासून इस्रायलने गाझावर अनेक हल्ले सुरू केले आहेत, ज्यामध्ये ६५,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत.
युद्धबंदी सुरू झाल्यापासून हमासने १७ बंधकांचे मृतदेह परत केले आहेत. इस्रायलने १९५ पॅलेस्टिनींचे मृतदेह गाझा अधिकाऱ्यांना सोपवले आहेत, परंतु त्यांची ओळख उघड केलेली नाही. हे लोक ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात मारले गेले होते, इस्रायली कोठडीत मरण पावले होते की युद्धादरम्यान सैनिकांनी त्यांना परत मिळवले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डीएनए किटच्या कमतरतेमुळे गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.
सहार बारुच ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू करण्याच्या तयारीत होती, तेव्हाच तिचे किबुत्झ बेअरी येथून अपहरण करण्यात आले. त्याच हल्ल्यात तिचा भाऊ इदान ठार झाला. तीन महिन्यांनंतर, वयाच्या केवळ २५ व्या वर्षी, एका अयशस्वी बचाव मोहिमेदरम्यान सहारचा मृत्यू झाला. दरम्यान, किबुत्झ निर ओझचे संस्थापक सदस्य आणि ८४ वर्षीय अर्थशास्त्रज्ञ अमिरम कूपर यांचे त्यांच्या पत्नी नुरित यांच्यासह अपहरण करण्यात आले होते. नुरित यांची १७ दिवसांनी सुटका करण्यात आली. मात्र, जून २०२४ मध्ये इस्रायली अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की कूपर यांचा गाझामध्ये मृत्यू झाला होता.






