Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार

Indian Navy: भारतीय विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्यातील जहाजे, मोहीम सुरू होताच तात्काळ पाकिस्तानच्या मकरान किनाऱ्याकडे रवाना झाली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 10, 2026 | 02:38 PM
indian navy operation sindhu 2 0 karachi port pakistan blockade 2026

indian navy operation sindhu 2 0 karachi port pakistan blockade 2026

Follow Us
Follow Us:
  • नौदलाचा हाय-अलर्ट
  • कराची बंदर पुन्हा निशाण्यावर
  • पंतप्रधानांचे सूचक वक्तव्य

Operation Sindhu 2.0 Indian Navy : भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासात नौदलाने नेहमीच शांत राहून शत्रूला पाणी पाजले आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून अरबी समुद्रात ज्या हालचाली सुरू आहेत, त्या पाहता ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ आता केवळ चर्चा राहिलेली नाही, तर तो एक अटळ इशारा बनला आहे. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या दोन महाकाय विमानवाहू युद्धनौकांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाचा पश्चिम ताफा पाकिस्तानच्या मकरान किनाऱ्याजवळ तळ ठोकून आहे. १९७१ मध्ये ज्याप्रमाणे कराची बंदर सात दिवस जळत होते, तशीच काहीशी परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर

विनाशकारी शस्त्रांची चाचणी आणि शत्रूचा थरकाप

गेल्या काही तासांत भारतीय नौदलाने मकरान किनाऱ्याजवळ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसह अनेक घातक शस्त्रास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे. विक्रांत कॅरियर बॅटल ग्रुपची (CBG) ही तैनात केवळ सराव नसून, शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून दिलेला इशारा आहे. उपग्रह प्रतिमांनुसार (Satellite Imagery), भारतीय नौदलाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानी नौदलाची जहाजे कराची बंदर सोडून ग्वादरच्या दिशेने पळाली आहेत, तर काही इराणी सागरी हद्दीत लपण्याचा प्रयत्न करत आहेत.

THREAD🧵 Operation Sindoor: Unfolding of events, Minute by Minute Day 3: May 9, 2025 – The Drone Duels and Maritime Posturing The third day was characterized by intense “drone duels” and the forward deployment of the Indian Navy to enforce a strategy of maritime compellence.… https://t.co/OnFLK336M0 — Netram Defence Review (@NetramDefence) May 9, 2026

credit – social media and Twitter

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द आणि नौदलाची जिद्द

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्याशी साधलेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “यावेळी आम्ही तुमच्या तोंडातील घास हिसकावून घेतला, पण तुम्हाला दुसरी संधी नक्की मिळेल,” असे मोदींनी म्हटले होते. हे विधान नौदलासाठी एक ऊर्जा देणारे ठरले आहे. व्हाईस ॲडमिरल प्रमोद सिंग यांनीही स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने पुन्हा कुरापत केली, तर यावेळी हवाई दल नाही, तर नौदल पहिले आक्रमण करेल आणि यावेळी केवळ तळे नाही, तर संपूर्ण बंदरे जळून खाक होतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर

१९७१ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

पाकिस्तानला भारतीय नौदलाची भीती वाटण्यामागे ऐतिहासिक कारणे आहेत. १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पाकिस्तानची रसद तोडली होती. चित्तगोंग आणि कॉक्स बाजार उद्ध्वस्त केल्यानंतर नौदलाने कराचीच्या केमारी तेल विहिरींना लक्ष्य केले होते. तोच आक्रमकपणा आजच्या आधुनिक नौदलात दिसून येत आहे. सध्या नौदलाच्या ताफ्यात निलगिरी-श्रेणीच्या फ्रिगेट्स आणि अरिधमन ही अणु-पाणबुडी सामील झाल्यामुळे भारताची ताकद अनेक पटींनी वाढली आहे.

पाकिस्तानी नौदलाची हतबलता

पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणि त्यांच्या नौदलाची मर्यादित क्षमता यामुळे ते भारताच्या ‘ड्युअल कॅरियर’ (दोन विमानवाहू जहाजे) धोरणासमोर टिकू शकत नाहीत. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात केलेली नाकेबंदी इतकी कडक आहे की, पाकिस्तानला आपले इंधन आणि व्यापार वाचवण्यासाठी युद्धविरामाची याचना करावी लागली होती. तज्ज्ञांच्या मते, जर ऑपरेशन सिंदूर २.० सुरू झाले, तर पाकिस्तानचा समुद्रमार्ग पूर्णपणे बंद होईल, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था काही दिवसांतच कोलमडून पडेल.

Web Title: Indian navy operation sindhu 2 0 karachi port pakistan blockade 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Indian Navy

संबंधित बातम्या

INS Trishul : फ्रान्समध्ये दाखल झाली आयएनएस त्रिशूल, ‘वरुण’ युद्धसरावात दिसणार भारतीय नौदलाची ताकद
1

INS Trishul : फ्रान्समध्ये दाखल झाली आयएनएस त्रिशूल, ‘वरुण’ युद्धसरावात दिसणार भारतीय नौदलाची ताकद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.