Indian ship sinks in Pakistani waters Pakistani Navy rescues 12 Indian crew members
Indian Cargo Ship drown in Pakistan : पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय जहाज बुडाले. त्यानंतर पाकिस्तानने बुडालेल्या भारतीय जहाजाच्या क्रू मेंबर्सचे प्राण वाचवले. पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी (PMSA) ने बुधवारी (4 डिसेंबर) सागरी बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. MSV AL पिनानीपीर हे भारतीय मालवाहू जहाज बुडाल्याने 12 भारतीय समुद्राच्या मध्यभागी अडकून पडले होते. भारतीय मालवाहू जहाज पाकिस्तानच्या पाण्यात बुडाल्यानंतर पाकिस्तानी नौदल आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी ऑपरेशन करून सर्व क्रू मेंबर्सचे प्राण वाचवले.
PMSA ने बुधवारी (डिसेंबर 4) एक निवेदन जारी केले, असे म्हटले आहे की, “द मरीन रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (MRCC) ला मुंबई MRCC, भारताकडून ईमेल प्राप्त झाला. ज्यामध्ये बुडालेल्या जहाजातून वाचलेल्यांना शोधून काढण्यासाठी मदतीची विनंती करण्यात आली होती.” जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय मालवाहू जहाज पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात बुडाले, ज्याचे १२ क्रू सदस्य समुद्राच्या मध्यभागी अडकले होते.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळ आणि चीनमधील जवळीक आणखी वाढली; केला ‘हा’ मोठा करार, जाणून घ्या भारताला काय धोका?
भारताच्या विनंतीवरून पाकिस्तानने बचावकार्य सुरू केले
भारताच्या विनंतीवरून, पाकिस्तान मेरीटाईम एजन्सीसह इतर अनेक एजन्सींनी बचाव कार्य सुरू केले. पीएमएसएने वाचलेल्यांना शोधण्याची जबाबदारी एका जहाजावर सोपवली. त्याच वेळी, स्थानिक सागरी क्षेत्रातील इतर व्यावसायिक जहाजांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांना बचावकार्यात मदत करण्याची विनंतीही करण्यात आली.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आगीचा भयावह गोळा’ आदळला पृथ्वीवर, जो होता सूर्यापेक्षाही तेजस्वी; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
समुद्रात अडकलेल्या सर्व 12 जणांची सुटका करण्यात आली
PMSA ने निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘त्वरित प्रतिसाद आणि प्रभावी समन्वयाचा परिणाम म्हणून, भारतीय मालवाहू जहाजावरील सर्व 12 जणांना वाचवण्यात आले. जे PMSA ची आंतरराष्ट्रीय SAR दायित्वे राखण्यासाठी आणि प्रादेशिक सहकार्याला चालना देण्यासाठी बांधिलकी दर्शवते. “हे ऑपरेशन PMSA ची तत्परता आणि राष्ट्रीयत्वाची पर्वा न करता समुद्रातील आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी व्यावसायिक कौशल्य दाखवते.”