Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

US Iran War : मध्यपूर्वेतील युद्ध आता दक्षिण आशियाच्या दरवाज्यात येऊन पोहचेल आहे. अमेरिकेने इराणच्या श्रीलंकेच्या समुद्रातील युद्धनौका उद्ध्वस्त केली आहे. यामुळे भारताच्या शेजारीही युद्ध पेटण्याची शक्यात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 03:56 PM
US Iran War Iran's warship IRIS Dena sinking near Sri Lanka’s southern coast India

US Iran War Iran's warship IRIS Dena sinking near Sri Lanka’s southern coast India

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणचा गेम ओव्हर
  • भारताच्या शेजारी इराणची IRIS Dena समुद्रात बुडाली
  • अमेरिकेने केला प्रहार
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता दक्षिण आशियाच्या दिशेने वळत आहे. अमेरिका (America) आणि इराणमध्ये गेल्या चार दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या शेजारी श्रीलंकेच्या समुद्रात इराणचा मोठा गेम झाला आहे. इराणची विनाशकारी युद्धनौका समुद्रात बुडाली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून हा इराणला दक्षिण आशियात मोठा झटका मानला जात आहे.

Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी(04 मार्च 2026) इराण(Iran) ची विनाशकारी युद्धनौका IRIS Dena श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बुडाली आहे. या घटनेची श्रीलंकेच्या नौदलाने पुष्टी केली आहे. तसेच  एका मोठ्या बचाव मोहिमेनंतर 30 नाविकांना वाचवण्याच यश आले असल्याचे श्रीलंकेने म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (04 मार्च 2026) पहाटे पाचच्या सुमारास IRIS Dena या जहाजाकडून त्यांना आपत्कालीन संदेश मिळाला होता. हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिणेकडे गाले बंदापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर बुडाले असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळताच श्रीलंकेची दोन बचाव जहाचजे आणि हवाई दलाचे एक विमान तातडीने दाखल झाले होते. जहाजावर एकूण 180 कर्मचारी होती, यातील 30 जणांनाच वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेने केला हल्ला?

ही घटना अशा वेळी घडली आहे. जेव्हा अमेरिकेने इराणचे 17 जहाजे समुद्रात गाडल्याचा दावा केला आहे. अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले होते. अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी अमेरिकेच्या नौदलाने इराणची 17 जहाजे आणि 1 पाणबुडी समुद्रात गाडली असल्याचा दावा केला आहे. यामुळे अमेरिका-इस्रायल या हल्ल्याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अद्याप जहाज बुडण्याचे अधिकृत कारण समोर आलेले नाही.

इराणनेही केला अमेरिकेचा गेम

याच वेळी इराणने देखील अमेरिकेवर मोठा प्रहार केला आहे. इराणने मध्य आखाती देशांमध्ये अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहेत. इराणने 500 हून अधिक क्षेपणास्त्रे, 2000 हून अधिक ड्रोन्स डागले आहेत. बहरीन, कुवेत, कतार येथील लष्करी तळे नष्ट केली आहेत. याशिवाय कतारमधील सर्वात शक्तीशाली डिफेन्स रडारही नष्ट केले आहे. यामुळे हे युद्ध अधिक भडकले आहे.

जागतिक स्तरावर परिणाम

सध्या या युद्धाचा जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहे. होमुर्झ सामुद्रधुनी बंद असल्याने तेल व्यापार थांबला आहे. ज्यामुळे जागतिक तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचा भारतावरही परिणाम होत आहे. अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यानेही मोठा गोंधळ उडाला आहे.

Iran US War : ५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताच्या शेजारी इराणचे कोणती आणि कुठे बुडाली युद्धनौका?

    Ans: भारताच्या शेजारी इराणची विनाशकारी युद्धनौका IRIS Dena श्रीलंकेच्या सागरी हद्दीत गाले बंदापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर बुडाले असल्याचे वृत्त आहे.

  • Que: इराणच्या विनाशकारी युद्धनौका बुडण्यात अमेरिकेचा हात आहे का?

    Ans: सध्या इराणची विनाशकारी युद्धनौका IRIS Dena चे समुद्रात बुडण्यामागचे अधिकृत कारण स्पष्ट नाही. परंतु ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा अमेरिकेने इराणची 17 युद्ध जहाजे आणि 1 पाणबुजी समुद्रात गाडली असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Us iran war america destroys iran warship iris dena near india in shrilankan sea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
1

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार
2

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’
3

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’

Global Crisis: ‘इराणी युरेनियमच कारण!’ ऊर्जा युद्धात रशिया छुपा योद्धा; दिमित्री म्हटले, ‘ट्रम्पना डावलून पुतिन भारतासाठी…’
4

Global Crisis: ‘इराणी युरेनियमच कारण!’ ऊर्जा युद्धात रशिया छुपा योद्धा; दिमित्री म्हटले, ‘ट्रम्पना डावलून पुतिन भारतासाठी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.