Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेन सोडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आता रशियात शिक्षण पुर्ण करण्याची संधी!

भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेनं स्वस्त असल्यांच सांगणयात येतं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी युक्रेनला पसंती असते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 11, 2022 | 11:40 AM
indian students in ukraine

indian students in ukraine

Follow Us
Close
Follow Us:

रशिया : रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे (Ukraine Russia war)भारतातील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मध्येच सोडाव लांगलं होतं. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आता या विद्यार्थ्यांना त्यांच शिक्षण पुर्ण करण्यासाठी रशिया मदत करणार आहे. रशियाच्या साहाय्याने आता भारतीय विर्द्यार्थ्यांच (Indian Students) शिक्षण पुर्ण होणार आहे.

[read_also content=”पुणेकरांनो आता घरात मांजर पाळायचं असेल तर आधी महापालिकेची परवानगी घ्या! https://www.navarashtra.com/maharashtra/for-keeping-cat-at-home-permission-from-the-municipal-corporation-is-mandatory-nrps-343522.html”]

शिक्षणासाठी भारताबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिका, रशिया, जर्मनी मध्ये जातात. युक्रेनमध्येही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी जातात. मात्र गेल्या काही महिण्यापासून युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक विद्यार्थांना त्यांच शिक्षण अर्धवट सोडून यावं लागलं. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आलं. युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत असलेले हजारो विद्यार्थी भारतात सुखरुप परतले पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. आता रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑफर दिली आहे.

[read_also content=”वर्धा येथील दुर्घटना; ऑनड्युटी वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडले https://www.navarashtra.com/crime/accident-at-wardha-on-duty-traffic-police-officers-were-ripped-apart-by-trucks-nrgm-343520.html”]

नुकतीच रशियन कॉन्सुल जनरल ओलेग अवदीव यांनी भारताला भेट दिली. चेन्नईमध्ये आले असता त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत महत्वाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. युक्रेन सोडणारे भारतीय विद्यार्थी रशियामध्ये त्यांचे शिक्षण सुरू पूर्ण करु शकतात असं सांगितलं. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच शिक्षण पुर्ण करण्याची संधी मिळाली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला पंसती

 

भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इतर अभ्यासक्रम भारताच्या तुलनेनं स्वस्त असल्यांच सांगणयात येतं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी युक्रेनला पसंती असते. तर,  भारतात खासगी महाविद्यालयामधून  वैद्यकीय  शिक्षण घेण्यासाठी लाखाेंचा खर्च असतो.  त्याऐवजी युक्रेनमध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेणं पसंत करतात.

Web Title: Indian students who left ukraine now have a chance to complete their education in russia nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 11:40 AM

Topics:  

  • medical student
  • Russia
  • ukraine
  • Ukraine Russia War

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
2

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
3

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.