India's-Greece missile deal creates tension in Turkey
नवी दिल्ली : सध्या भारत आणि ग्रीसच्या धोरणात्मक संबंधांची मोठी चर्चा होत आहे. तुर्कीच्या माध्यमांनी दावा केला आहे की, भारताने ग्रीसला लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूझ मिसाईल (LR-LACM)ची ऑफर दिली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे या कराराची चर्चा सुरु असल्याचे तुर्कीच्या माध्यमांनी म्हटले आहे. परंतु अद्याप भारताने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
परंतु तुर्कीच्या टीआरहॅबरने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि ग्रीसमध्ये LR-LACM वर चर्चा सुरु आहे. ही चर्चा तुर्कीसाठी धोका मानली जात आहे. अहवालात म्हटले आहे की, तुर्कीच्या पाकिस्तानला पाठिंब्यामुळे भारत ग्रीससोबत धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
सध्या भारताच्या ग्रीसला LR-LACM देण्याच्या विचाराने देखील तुर्कीमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेल आहे. या क्षेपणास्त्राच्या अचूक हल्ला आणि हवाई संरक्षण प्रणालीला चकमा देण्याची क्षमता आहे. भारताची ही शक्ती तुर्कीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करु शकते. तुर्कीच्या S-400 हवाई प्रणालीला देखील नष्ट करण्याची ताकद या क्षेपणास्त्रामध्ये आहे. तुर्कीच्या माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, जर ग्रीसला भारताकडून हे क्षेपणास्त्र मिळाल्यास तुर्कीवर हल्ला होण्याची शक्यता आहे. सध्या यामुळे तुर्कीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुर्कीच्या टीआरहॅबरने अहवालात दावा केला आहे की, भारत आणि ग्रीसमध्ये सध्या संरक्षण करारांवर चर्चा सुरु आहेत. गेल्या महिन्यात भारतीय हवाई दल प्रमुख ए.पी, सिंह यांनी अथेन्सला भेट दिली होती. शिवाय भारताने अथेन्समध्ये झालेल्या संरक्षण प्रदर्शनामध्ये LR-LACM चे प्रदर्शन देखील केले होते. याकडे तुर्कीच्या माध्यमांनी ग्रीस आणि भारतातील संरक्षण करारचे संकेत म्हणून पाहिले आहे. ग्रीक हवाई दलाच्या प्रमुखांची त्यांनी भेट घेतली होती.
सध्या भारत आणि ग्रीसमधील या चर्चा तुर्कीसाठी धोकादायक मानल्या जात आहेत.अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारताचे हे पाऊल प्रादेशिक रणनीतीची एक भाग आहे. यामुळे तुर्कीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. अहवालानुसार, भारताचे ग्रीस आणि सायप्रयाससोबतचे संबंध तुर्कीसाठी धोकादायक आहेत.