Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे GSAT-20 उपग्रह स्पेस एक्सच्या मदतीने यशस्वीरित्या लॉंच; आता विमानांमध्ये इंटनरेट सुविधा उपलब्ध होणार

भारताचे GSAT 20 सर्वात प्रगत उपग्रह आज यशस्विरित्या प्रक्षेपित करण्यात आले. यासाठी भारताने Space X ची मदत घेतली. स्पेस एक्सच्या Falcon 9 रॉकेटच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 19, 2024 | 04:33 PM
भारताचे GSAT-20 उपग्रह स्पेस एक्सच्या मदतीने यशस्वीरित्या लॉंच; आता विमानांमध्ये इंटनरेट सुविधा उपलब्ध होणार

भारताचे GSAT-20 उपग्रह स्पेस एक्सच्या मदतीने यशस्वीरित्या लॉंच; आता विमानांमध्ये इंटनरेट सुविधा उपलब्ध होणार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताचे GSAT 20 सर्वात प्रगत उपग्रह आज यशस्विरित्या प्रक्षेपित करण्यात आले. यासाठी भारताने Space X ची मदत घेतली. स्पेस एक्सच्या Falcon 9 रॉकेटच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. स्पेस एक्स हे इलॉन मस्क यांच्या मालकीचे आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा केप कॅनवेरल येथून हा उपग्रह प्रक्षेपित करण्याता आला. यामुळे आता भारताला विमानांमध्ये इंटनेट सेवा उप्लब्ध होईल. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

उपग्रहाचे काम काय असेल?

GSAT N-2 हा उपग्रह दुर्गम भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा आणि प्रवासी विमानांना विमानामध्ये इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी कार्य करणार आहे.  हा उपग्रह 32 युजर बीमने सुसज्ज आहे. या उपग्रहामध्ये ईशान्येकडील आठ अरुंद स्पॉट बीम आणि उर्वरित भारतातील 24 रुंद स्पॉट बीम आहेत.

सर्व 32 बीम भारतातील हब स्थानकांवरून समर्थित असेल. तसेच हे उपग्रह विमानात इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मदत करतील.या उपग्रहाच्या लॉंचिंगचा एक व्हिडिओ देखील स्पेस एक्स ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली युकेच्या स्टार्मर यांची भेट; तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सुरक्षा संबंध दृढ करण्यावर चर्चा

Deployment of @NSIL_India GSAT-N2 confirmed pic.twitter.com/AHYjp9Zn6S — SpaceX (@SpaceX) November 18, 2024

भारताने SpaceX ची मदत का घेतली?

मिळालेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन 4700 किलो आहे. तसेच या उपग्रहाचे वजन उचलण्यासाठी त्या योग्य रॉकेट भारताकडे नाही. भरताकडे असलेल्या रॉकेट्सची क्षमता 4700 किलोचे वजन उचलण्याची नसल्याने स्पेसएक्सची मदत घेण्यात आली. भारताकडे असलेले रॉकेट ‘द बाहुबली’ किंवा प्रक्षेपण वाहन मार्क-3 हे अंतराळ कक्षेत जास्तीत जास्त 4000 ते 4100 किलो वजन वाहून नेऊ शकते. तसेच युक्रेनमधील संघर्षामुळे रशिया आपली रॉकेट व्यावसायिक प्रक्षेपणासाठी देऊ शकला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची बायडेन यांच्यावर टिका; म्हणाले, “रशिया-युक्रेन युद्ध…”

भारतासाठी हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे

भारताच्या या प्रक्षेपणामुळे Space X आणि ISRO मधील न्यू स्पेस इंडिया लिमिडेडद्वारे महत्त्वाचे पहिले पाऊल उचलले आहे. KA बँड वारंवारता असलेला हा इस्त्रोने बनवलेला पहिला उपग्रह भारताने वापरला आहे. यामुळे भारतातील विविध क्षेत्रांमध्ये  ब्रॉडबँड सेवांची कार्यक्षमता आणि व्याप्ती वाढेल असे म्हटले जात आहे.

Web Title: Indias gsat 20 satellite successfully launched with the help of spacex nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • elon musk
  • india
  • ISRO

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.