फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: डोनाल्ड ट्रम्पच्या मित्रपक्षांनी बायडेन यांच्यावर टिका केली आहे. यागामगचे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला अमेरिकन पुरवठा केलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे रशियाविरूद्ध वापरण्यास परवानगी दिली आहे. यामुळे रशिया-युक्रेन संघर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली आहे. त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध बायडेन यांच्यामुळे अधिक धोकादायक झाल्याचा असून या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र टीका केली आहे.
बायडेन यांचा निर्णय रशिया- युक्रेन युद्ध पेटवणारा
मीडिया रिपोर्टनुसार, जो बायडेन यांचा हा निर्णय युद्ध अधिक पेटवणारा असल्याचा आरोप केला आहे. बायडेन यांचा कार्यकाळ दोन महिन्यांचा राहिला असताना त्यांनी हा निर्णय घेतला. बायडेन यांनी रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनच्या दीर्घकालीन मागणीसाठी मोठा धोरणात्मक बदल केला. मात्र, हा निर्णय ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनासाठी आव्हान निर्माण करणारा ठरणार आहे.
जो बायडेन यांचा हा निर्णय राजकीय हेतूने घेतला असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सहकारी करत आहेत. “या काळात युद्धाला नवा वळण देण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ट्रम्प यांच्या निवडलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्झ म्हटले आहे. युक्रेनने दिलेल्या लष्करी साहाय्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या ट्रम्प यांनी याआधीच युद्ध थांबवण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु त्यासाठीची रणनीती अद्याप उघड केलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रीया
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकन काँग्रेसला भेट देऊन साहाय्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. रशियाने जर या क्षेपणास्त्रांचा वापर रशियन भूभागावर केला, तर योग्य प्रतिसाद देऊ, असे जाहीर केले आहे. तसेच, उत्तर कोरियन सैनिक युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी तैनात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रशिया युद्धाला चिघळवत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या या निर्णयावर टीका करत म्हटले आहे की, “जो बायडेन हे युद्ध अधिक पेटवत आहेत. माझ्या वडिलांना शांतता निर्माण करण्यापूर्वीच हा निर्णय तिसऱ्या महायुद्धाला प्रोत्साहन देत आहे.” डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, “फक्त ट्रम्पच या युद्धातील दोन्ही बाजू एकत्र आणू शकतात आणि शांततेकडे वाटचाल करू शकतात.” युद्धाच्या 1,000 व्या दिवशी जो बायडेन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जगातील राजकीय तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
तिसरे महायुद्ध होऊ शकते का?
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी युक्रेनला रशियामधील हल्ल्यांसाठी सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसीएमएसचा वापर युक्रेनकडून यापूर्वीही केला जात होता, परंतु हा वापर सीमावर्ती भागांपुरता मर्यादित होता. परंतु आता अमेरिकेने रशियाच्या आतही हल्ल्यासाठी सामरिक क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. रशिया-युक्रेन युद्धावर याचा व्यापक परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.