
India’s nuclear doctrine is a bluff warns Dr. Zaheer Kazmi fear Gen. Dwivedi
Zaheer Kazmi warning India deterrence : पाकिस्तानच्या अणु कमांडचे माजी प्रमुख आणि निवृत्त ब्रिगेडियर डॉ. झहीर काझमी यांनी भारताच्या अणु धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी भारताच्या “नो फर्स्ट यूज” (NFU) किंवा “प्रथम वापर न करण्याच्या” अणु धोरणाला केवळ एक मिथक आणि राजकीय दिखावा असे संबोधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारत प्रत्यक्षात आक्रमक आणि पूर्वसूचक युद्धाची तयारी करत आहे आणि त्याचे अणु सिद्धांत लढाईच्या परिस्थितीनुसार बदलत आहेत.
डॉ. काझमी पुढे म्हणतात की, भारत आपल्या अणु तंत्रज्ञान, क्षेपणास्त्रे, AI-आधारित वारफेअर आणि ड्युअल-यूज सिस्टीमवर जोर देत आहे. अग्नि-V, मल्टी लेयर्ड मिसाईल सिस्टम, कॅनिस्टर-बेस्ड लॉन्च सिस्टीम आणि एकात्मिक युद्ध गट (IBGs) हे याच धोरणाचे प्रतिबिंब असल्याचे ते सांगतात. त्यांच्या मते, भारताचे सिद्धांत आता “प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांपासून प्री-एम्प्टिव स्ट्राईक” म्हणजेच पूर्वसूचक अणु हल्ल्याच्या दिशेने वळले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकत्याच झालेल्या चाणक्य डिफेन्स संवादात विधान केले की, “ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर होता आणि भारत दीर्घकालीन युद्धासाठी सज्ज आहे.” हे विधान पाकिस्तानमध्ये चिंता वाढवणारे ठरले आहे. पाकिस्तानच्या लष्करी विश्लेषकांच्या मते, हे केवळ युद्धातील आत्मविश्वास नव्हे तर भारताच्या बदलत्या युद्ध सिद्धांताचे संकेत आहेत.
या पार्श्वभूमीवर डॉ. काझमी लिहितात की, ऑपरेशन सिंदूरला पाकिस्तानकडून जोरदार उत्तर मिळाल्यानंतर ८८ तासांत ते संपले असले तरीही भारतात ते लष्करी शक्तीचे उदाहरण म्हणून मांडले जात आहे. त्यांच्या मते, हे उदाहरण चुकीच्या अर्थाने वापरले जात आहे आणि अशा प्रकारच्या मर्यादित युद्धांतून अणु तणाव अचानक वाढू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
डॉ. काझमींचे मत आहे की, भारत दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी करत असल्याचा दावा करतो चीन आणि पाकिस्तान पण प्रत्यक्षात भारतीय सैन्याची तैनाती पाकिस्तानाला लक्ष करूनच केली जाते. त्यांनी लिहिले की
“भारत कोणत्याही भागीदारासाठी चीनसमोर झुकणार नाही, पण पाकिस्तानविरोधातील जलद हल्ला रणनीती हे त्यांचे खरे लक्ष्य आहे.”
भारतीय संरक्षण धोरणातील बदलांचे समर्थन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे माजी सल्लागार शिवशंकर मेनन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडील विधानांमध्ये केले असून यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत वाढ झाली आहे. काझमींच्या मते, या अस्पष्ट पण आक्रमक धोरणामुळे दक्षिण आशियात संकट व्यवस्थापनासाठी उपलब्ध वेळ अतिशय कमी झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे भारत-पाक संबंधांमध्ये तणाव वाढत असून जागतिक सुरक्षा तज्ञांना दक्षिण आशियातील अणु परिस्थितीबाबत वाढत्या चिंतेचे संकेत दिसत आहेत.
Ans: भारताची घोषणा की तो अण्वस्त्राचा प्रथम वापर करणार नाही.
Ans: पाकिस्तानचा दावा की भारताचे धोरण बदलले असून ते पूर्वसूचक हल्ल्याशी सुसंगत आहे.
Ans: भारत-पाकिस्तानमधील सुरक्षा तणाव वाढू शकतो.