'सर, मला तुम्हाला भेटायचे आहे'; इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा डोेनाल्ड ट्रम्प यांना फोन
जकार्ता: इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो सध्या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये होणार आहेत. सध्या राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत आहेत. त्यांनी वॉश्गिंटनमध्ये पोहोचल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना फोन तरून 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रबोवो यांनी ट्रम्प यांच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांच्या फोनवरील संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“सर, मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल- इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो
यामध्ये प्रबोवो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबाद साधताना म्हटले आहे की. “सर, मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल. तुम्ही जिथे असाल तिथे मी येईन.” यावर होनाल्ड ट्रम्प यांनी या विनंतीला प्रतिसाद देत म्हटले आहे की, “तुम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही भेटू”. त्यांनी आपल्या विजयाबद्दल अबिमानही व्यक्त केला आणि गेल्या शतकातील हे यश उत्तम असल्याचे सांगितले.
या संवादा दरम्यान प्रबोवो यांनी ट्रम्प यांच्यावर निवडणुक प्रचारावेळी झालेले हल्ले आणि हत्येच्या प्रयत्नाबद्दल चिंता आणि आश्चर्य व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तरात स्वतःला भाग्यवान मानत असे म्हटले की, “मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो, त्यामुळे आज मी जिवंत आहे.”
Glad to be connected directly with President Elect @realDonaldTrump to extend my heartfelt congratulations on his election as the 47th President of the United States.
I am looking forward to enhance the collaboration between our two great nations and to more productive… pic.twitter.com/KfSVUsZSGc
— Prabowo Subianto (@prabowo) November 11, 2024
या देशांच्या दौऱ्यावर देखील जाणार
प्रबोवो यांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात चीन, पेरू, ब्राझील, यूके आणि मध्य पूर्वेतील काही देशांचा समावेश आहे. पेरूमध्ये ते आशिया पॅसिफिक कोऑपरेशन फोरममध्ये सहभागी होणार आहेत. तसेच प्रबोवो ब्राझीलमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेत दक्षिणपूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करमार असल्याची माहिती आहे. यूकेमधील लंडनमध्ये ते ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी चर्चा करतील. या चर्चेतील मुख्य मुद्दे बहुधा आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील.
दौरा जागतिक स्तरावर इंडोनेशियाचे संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने
जकार्ताहून निघण्यापूर्वी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांनी आपल्या दौऱ्यात मध्य पूर्वेतील थांबे असल्याचे सांगितले, पण नेमक्या कोणत्या देशांना ते भेट देणार आहेत याबाबत त्यांनी काही स्पष्ट केलेले नाही. प्रबोवो यांचा हा दौरा इंडोनेशियाच्या परराष्ट्र धोरणात एक नवा आणि महत्वाचा अध्याय उघडून आणणार असल्याचे म्हटले जात आहे. हा दौरा जागतिक स्तरावर त्यांचे संबंध बळकट करण्याच्या दिशेने आहे.