Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Defense Deal : फिलीपिन्सनंतर जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश विकत घेणार ‘BrahMos’; ‘या’ देशाचे संरक्षण मंत्री स्वतः करणार करार

Indonesia BrahMos deal : फिलीपिन्सनंतर जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश चिनी युद्धनौकांवर ब्राह्मोस तैनात करणार. या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संरक्षण मंत्री भारतात येत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 20, 2025 | 12:50 PM
Indonesia to buy Brahmos Big deal with India to deter Chinese warships

Indonesia to buy Brahmos Big deal with India to deter Chinese warships

Follow Us
Close
Follow Us:
  • फिलीपिन्सनंतर इंडोनेशिया ‘ब्राह्मोस’ खरेदीसाठी अंतिम टप्प्यात; कराराची किंमत $600–800 दशलक्ष!
  • इंडोनेशियन संरक्षण मंत्री 26-28 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली दौऱ्यावर; ब्राह्मोस करारावर शिक्कामोर्तब शक्य.
  • ब्राह्मोसच्या वेग, अचूकता आणि ऑपरेशन ‘सिंदूर’मधील यशामुळे अनेक देश रांगेत; भारताचा शस्त्रास्त्र निर्यातीत मोठा टप्पा.

Indonesia BrahMos deal : फिलीपिन्सनंतर (Philippines) आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम देश इंडोनेशिया (Indonesia) भारताकडून सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’(BrahMos) खरेदी करण्याच्या मार्गावर आहे. या मोठ्या कराराचे वजन फक्त आर्थिक नाही, तर त्यामागे आशिया-पॅसिफिकच्या बदलत्या भू-राजकारणाचे स्पष्ट संकेत दडलेले आहेत. इंडोनेशियाचा हा निर्णय दक्षिण चीन समुद्रातील वाढती तणावपूर्ण परिस्थिती, चिनी नौदलाची घुसखोरी आणि वाढती सामरिक आव्हाने यांच्याशी थेट जोडलेला आहे.

महत्वाचा दिल्ली दौरा: करार होण्याची शक्यता प्रबळ

वृत्तानुसार, इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री सजाफरी सजामसोद्दीन हे 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दिल्लीला भेट देत आहेत. या तीन दिवसांच्या दौर्‍यात ते भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार असून, याच बैठकीत ब्रह्मोस खरेदीकरारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची मोठी शक्यता आहे. जर हा करार झाला, तर कराराचा अंदाजित आकार $600 ते $800 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दरम्यान असेल. फिलीपिन्सनंतर इंडोनेशिया हा भारताचा दुसरा आग्नेय आशियाई ग्राहक ठरेल.

India–Indonesia BrahMos deal is finalized, pending only technical approval expected by year-end. The $590M deal comes after Op Sindoor, where India used just 14 BrahMos missiles with pinpoint accuracy to wipe out Pakistani hangars,command center, ADS & nuclear storage. (Sources) pic.twitter.com/EU6mR6I6kg — Baba Banaras™ (@RealBababanaras) November 20, 2025

credit : social media

ब्राह्मोसची मागणी वाढवणारी कारणे

भारत आणि रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानातून विकसित झालेले ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आज जगातील सर्वात अचूक, जलद आणि बहुआयामी क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक मानले जाते.

  • जमिनीवरून,
  • समुद्रावरून,
  • हवाई प्लॅटफॉर्मवरून,
    ते सहज प्रक्षेपित करता येते, ही याची मोठी ताकद.

अलीकडेच पाकिस्तानमध्ये झालेल्या ऑपरेशन ‘सिंदूर’ मध्ये ब्रह्मोसने दाखवलेल्या अचूक आणि धडाकेबाज क्षमतेमुळे या क्षेपणास्त्राबद्दल जागतिक स्तरावर रस प्रचंड वाढला आहे. जगातील एकही हवाई संरक्षण प्रणाली ब्रह्मोसला थांबवू शकत नाही, असे ब्रह्मोस एरोस्पेसचे शास्त्रज्ञ डॉ. अतुल राणे यांनी सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US Deal : अमेरिकेचे भारताला मोठे संरक्षण समर्थन; इंडो-पॅसिफिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘Mega Defense Pact’

भौगोलिक परिस्थितीने इंडोनेशियाला ‘ब्रह्मोस’ची गरज वाढवली

इंडोनेशिया मलाक्का सामुद्रधुनीजवळ वसलेले आहे, जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि व्यस्त सागरी मार्गांपैकी एक. या मार्गावर चीनचे वाढते सैनिकी प्रभाव, दक्षिण चीन समुद्रातील तणाव, तसेच इंडोनेशियाचे स्वतःचे समुद्री हितसंबंध यामुळे जकार्ताला अधिक मजबूत सागरी सुरक्षा आवश्यक आहे. ब्रह्मोस कोस्टल डिफेन्स बॅटरी इंडोनेशियासाठी गेम-चेंजर ठरू शकते. चीनकडून मिळणाऱ्या धोकााला उत्तर देण्यासाठी हे क्षेपणास्त्र त्यांना अचूक, जलद आणि प्राणघातक प्रतिकारक्षमता देईल.

‘मेक इन इंडिया’ला जागतिक गती

भारताने अलीकडेच लखनौमध्ये ब्रह्मोसची नवीन उत्पादन लाइन सुरू केली आहे. यामुळे क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य होणार असून जागतिक मागणी पूर्ण करण्याची क्षमता भारताकडे निर्माण झाली आहे. उत्पादन वाढल्याने खर्च कमी होणार आणि निर्यातीत वेग येणार, ज्याचा फायदा थेट भारताच्या संरक्षण उत्पादन आणि ‘मेक इन इंडिया’ मिशनला होणार आहे. सध्या भारत-इंडोनेशिया यांच्यात गरुड शक्ती (सेना) आणि समुद्र शक्ती (नौदल) यांसारखे लष्करी सरावही नियमितपणे होतात. दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यासाठी हा करार भविष्यातील सामरिक भागीदारीचा मजबूत पाया ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Tariffs: ‘अमेरिका भारतावर लादणार होती 350% कर…’, अघटित घडण्यापासून थांबवले; Donald Trumpचा खुलासा

करार जाहीर होण्याची वाट जग पहात आहे

अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, हा करार जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि इंडोनेशियन संरक्षण मंत्र्यांच्या दिल्ली भेटीदरम्यानच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता जास्त आहे. हा करार झाला, तर आशिया-पॅसिफिकमधील सामरिक समीकरणांमध्ये भारताची भूमिका अधिक प्रभावशाली बनेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंडोनेशिया भारताकडून ब्राह्मोस का खरेदी करत आहे?

    Ans: दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या चिनी आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी.

  • Que: ब्राह्मोस कराराची किंमत किती असू शकते?

    Ans: हा करार $600 ते $800 दशलक्ष दरम्यान असू शकतो.

  • Que: ब्राह्मोस क्षेपणास्त्राची खासियत काय आहे?

    Ans: हे जगातील सर्वाधिक वेगवान आणि अचूक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक असून कोणतीही हवाई संरक्षण प्रणाली ते रोखू शकत नाही.

Web Title: Indonesia to buy brahmos big deal with india to deter chinese warships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • China
  • Defence Sector
  • Indonesia
  • International Political news

संबंधित बातम्या

US Tariffs: ‘अमेरिका भारतावर लादणार होती 350% कर…’, अघटित घडण्यापासून थांबवले; Donald Trumpचा खुलासा
1

US Tariffs: ‘अमेरिका भारतावर लादणार होती 350% कर…’, अघटित घडण्यापासून थांबवले; Donald Trumpचा खुलासा

Epstein Files : Donald Trump मुळे अखेर अमेरिकेची गुपिते जगासमोर उघड होणार; ‘हे’ गुप्त दस्तऐवज 30 दिवसांत सार्वजनिक करणार
2

Epstein Files : Donald Trump मुळे अखेर अमेरिकेची गुपिते जगासमोर उघड होणार; ‘हे’ गुप्त दस्तऐवज 30 दिवसांत सार्वजनिक करणार

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट
3

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट

Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’
4

Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.