Indonesia : इंडोनेशियातील मध्य जावामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू, २१ जण बेपत्ता ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
1. इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतात मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन; २ जणांचा मृत्यू, २१ जण बेपत्ता.
2. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू; स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन दल, सैन्य, SAR टीम आणि स्वयंसेवकांचा संयुक्त बचाव प्रयत्न.
3. याच दरम्यान जकार्तातील नौदल संकुलातील मशिदीत स्फोट; ५४ जखमी प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटचा अंदाज.
Landslide in Indonesia : मध्य जावा येथे मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन. इंडोनेशियामध्ये (Indonesia) नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण अत्यंत जास्त असून हवामानातील बदलांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. गुरुवारी रात्री मध्य जावा प्रांतातील सिलाकॅप रीजन्सी येथे मुसळधार आणि सलग बरसणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन(Landslide) झाले. या भूस्खलनाने सिबुन्यिंग गावातील सिबुयुत आणि तारुखान या वस्त्यांना थेट फटका बसला. काही क्षणांत घरे मातीखाली गाडली गेली आणि लोकांना पळता-पळता ही अवस्था आली. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन आणि शमन संस्थेचे (BPBD) आपत्कालीन प्रमुख मोहम्मद चोमसुल यांनी शुक्रवारी सकाळी माहिती दिली की, या भूस्खलनात २ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे २१ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. ते ढिगाऱ्याखाली असू शकतात किंवा पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
घटना घडल्यानंतर प्रशासनाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेमध्ये
1. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन संस्थेची पथके
2. SAR शोध व बचाव दल
3. इंडोनेशियन सैन्य
4. सरकारी संस्थांचे कर्मचारी
5. शेकडो स्वयंसेवक
अवजड यंत्रसामग्री, जेसीबी, क्रेन आणि माती काढण्याची साधने घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्य अधिक अवघड झाले आहे. ढिगाऱ्याखाली हवेची जागा कमी होत असल्याने वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. बचावदलांचे म्हणणे आहे की, पुढील काही तास बेपत्ता नागरिकांच्या जीवासाठी निर्णायक ठरणार आहेत.
🇮🇩 Two people were found dead, three others injured, and 21 remained missing after #landslides struck #Indonesia‘s Central Java province on Thursday night, an official said on Friday morning. pic.twitter.com/4NHiTVFhXI — CCTV Asia Pacific (@CCTVAsiaPacific) November 14, 2025
credit : social media
भूस्खलनाच्या काहीच दिवस अगोदर, इंडोनेशियाच्या राजधानी जकार्ता येथील नौदल संकुलातील मशिदीत नमाजदरम्यान भीषण स्फोट झाला होता. शुक्रवारी झालेल्या या स्फोटात ५४ लोक जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटानंतर मशिदीत धुराचे दाट लोट पसरले आणि श्रद्धाळूंमध्ये मोठी भीती पसरली. प्रारंभी हा दहशतवादी हल्ला असू शकतो असा संशय व्यक्त झाला होता. मात्र, नंतर शिन्हुआ न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार स्फोटाचे कारण बहुधा इलेक्ट्रॉनिक उपकरणातील बिघाड किंवा शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून स्फोट झालेल्या खोलीचा तपास सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा
नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि नागरी भागातील अपघात यामुळे इंडोनेशिया सतत संकटांना सामोरे जात आहे.
सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचना तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






