
Internet will be shut down in Pakistan's Balochistan
काही दिवांसापूर्वी पाकिस्तानने खैबर पख्तुनख्वामध्ये देखील इंटरनेट बंद केले होते. याअंतर्गत मोठी कारवाई केली होती. पाकिस्तानने दहशतवाद्यांना मारण्यासाठी खैबर पख्तुनख्वामध्ये इंटरनेट बंद केले होते. परंतु या कारावईत अनेक नागरिकांचा देखील बळी गेला होता. दरम्यान आता बलुचिस्तानमध्येही कारवाई करण्यात येणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.
‘Tarrif King’, ट्रम्पच्या सल्लागारांची भारतावर तीव्र टीका; रशियन तेल खरेदीवरुन केले गंभीर आरोप
बलुचिस्तान हा अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. येथे अनेक भागांमध्ये दहशतवाद्यांचे मोठे अड्डे आहेत. यामुळे गेल्या काही महिन्यात बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवदी हल्ले घडले आहेत. आतापर्यंत सुमारे २८६ दहशवादी हल्ले घडल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये ७०० हून अधिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, तहरीक-ए-तालिबानचे दहशतवादी बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. यासाठी एक केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहे. तसेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फोर्स या संघटना देखील येथे सक्रिय आहेत. सुमारे ५ हजार सैन्य बलुचिस्तानमध्ये आहे.
इंटरनेट नेमकं का बंद?
सध्या सर्वत्र पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा नेमकी का बंद करण्यात आली आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर पाकिस्तानी मीर यार बलोच याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, बलुचिस्तानमध्ये लढाऊ सैनिकांनी रेल्वे मार्गांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बलुचिस्तानमध्ये सध्या युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच पाकिस्तान सरकार जगाला त्याची क्रूर बाजू दाखवून इच्छित नाही. यामुळे सरकारने सामान्यांच्या स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. बलुचिस्तानमधील सामाजिक कार्यकर्त्यांना फसवले जात असल्याचा आरोप मीर यार बलोचने केले आहे. सध्या बलुचिस्तानमध्ये लष्कर आणि बलुच आर्मीमध्ये चकामक होण्याची शक्यता आहे. याचे व्हिडिओ बनवले जाऊ नयेत यासाठी इंटनेट बंद ठेवण्यात आले आहे.