
iran army chief amir hatami warning to trump locked and loaded threat protests 2026
Amir Hatami threat to US 2026 : मध्यपूर्वेतील तणाव आता एका अशा वळणावर आला आहे जिथे ठिणगी पडली तर महायुद्धाचा भडका उडू शकतो. इराणमध्ये (Iran) सुरू असलेल्या अंतर्गत निदर्शनांच्या आगीत अमेरिकेने तेल ओतण्याचे काम केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणमधील आंदोलकांना पाठिंबा देत लष्करी हस्तक्षेपाची धमकी दिली आहे. यावर संताप व्यक्त करताना इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अमीर हतामी (Amir Hatami) यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी जगाला हादरवणारा इशारा दिला. “कोणीही परदेशी शक्ती इराणला धमकावू शकत नाही. जर कोणी हल्ला करण्याचे धाडस केले, तर त्याचे हात कापले जातील,” अशा कडक शब्दांत हतामी यांनी ट्रम्प यांना उत्तर दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ पोस्टमध्ये इराणला थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, “जर इराणच्या सरकारने शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार केला किंवा त्यांना हिंसकपणे मारले, तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल. आम्ही ‘Locked and Loaded’ (शस्त्रांसह सज्ज) आहोत.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराणच्या सत्तेच्या वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी तर एक पाऊल पुढे टाकत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना मारण्याची उघड धमकी दिली आहे, ज्यामुळे तेहरानमध्ये युद्धाची तयारी सुरू झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे
इराण सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इराणचे चलन ‘रियाल’ मातीमोल झाले असून महागाईने ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. फासा (Fasa) शहरात आंदोलकांनी राज्यपालांच्या कार्यालयाला आग लावली असून पोलीस आणि जनता यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी लष्कराने मात्र या आंदोलनामागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचा दावा केला आहे.
No one doubts the enmity of Trump and Netanyahu toward the Iranian nation — Iranian Army commander-in-chief Amir Hatami ‘They dare to interfere in our internal affairs’ ‘Just in the past 6–7 months, they have killed over a thousand of this nation’s children’ pic.twitter.com/IFxzVjDbEy — RT (@RT_com) January 7, 2026
credit : social media and Twitter
जनरल हतामी यांनी आपल्या भाषणात जून २०२५ मध्ये इस्रायलसोबत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धाचा उल्लेख केला. या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले होते. “आमचे लष्कर आता जून २०२५ पेक्षा अधिक सज्ज आहे. शत्रूने जर पुन्हा तीच चूक केली, तर इराणचा प्रतिसाद कल्पनेपलीकडे असेल,” असे हतामी यांनी लष्करी विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केले. इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांनीही सोशल मीडियावर “अमेरिकेने आपल्या सैनिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी” असा सूचक इशारा दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Tension: ‘ट्रम्प तुला मारून टाकतील!’ अमेरिकन सिनेटरची इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना उघडपणे धमकी, जगावर युद्धाचे सावट
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणमधील निदर्शनांचे स्वागत केले आहे. “इराणी जनता आता त्यांचे भविष्य स्वतःच्या हातात घेत आहे,” असे म्हणत त्यांनी इराणी नागरिकांच्या ‘स्वातंत्र्याच्या लढ्याला’ पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे इराणच्या लष्कराला भीती वाटत आहे की, अंतर्गत अस्वस्थतेचा फायदा घेऊन अमेरिका आणि इस्रायल पुन्हा एकदा इराणवर मोठा हल्ला करू शकतात.
Ans: हतामी यांनी म्हटले की, जर अमेरिकेने इराणमध्ये हस्तक्षेप केला किंवा लष्करी कारवाई केली, तर इराण शत्रूचे 'हात कापून टाकेल' आणि अधिक कठोर प्रत्युत्तर देईल.
Ans: ट्रम्प यांनी इशारा दिला की जर इराणी सुरक्षा दलांनी शांततापूर्ण निदर्शकांची हत्या केली, तर अमेरिका 'Rescue' (बचाव) करण्यासाठी सज्ज आणि सक्षम आहे.
Ans: इराणमध्ये वाढती महागाई, बेरोजगारी आणि इराणी चलन 'रियाल'चे झालेले अवमूल्यन यामुळे सामान्य जनतेत असंतोष पसरला आहे.