'डोनाल्ड ट्रम्प तुला मारून टाकतील,' अमेरिकन सिनेटरची इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना उघडपणे धमकी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Lindsey Graham threat to Ayatollah Khamenei : जगाच्या पाठीवर सध्या युद्धाचे ढग दाटून आले आहेत. व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या धडाकेबाज कारवाईनंतर आता अमेरिकेचा मोर्चा इराणकडे वळल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे प्रभावशाली सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. “जर तुम्ही स्वतःच्याच देशातील निदर्शकांना मारणे थांबवले नाही, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) तुम्हाला संपवण्याचे आदेश देतील,” अशा कडक शब्दांत ग्राहम यांनी इराणला सुनावले आहे.
इराणमध्ये गेल्या आठवड्यापासून महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या ढासळत्या चलनामुळे जनक्षोभ उसळला आहे. हा वणवा आता केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातही पसरला आहे. आंदोलक आता थेट खामेनेई यांच्या विरोधात “हुकूमशहाचा अंत व्हावा” अशा घोषणा देत आहेत. आंदोलने दडपण्यासाठी इराणी सुरक्षा दलांनी आंदोलकांवर थेट गोळीबार सुरू केला असून, आतापर्यंत ३५ निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये इराणमधील भीषण परिस्थिती दिसून येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
एका टेलिव्हिजन मुलाखतीदरम्यान ग्राहम यांनी इराणच्या राजवटीला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “तेहरानच्या नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हलक्यात घेऊ नये. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये जे केले, तेच ते इराणमध्येही करू शकतात. जर तुम्ही चांगल्या जीवनाची मागणी करणाऱ्या तुमच्याच जनतेवर गोळ्या झाडणे सुरू ठेवले, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.” ग्राहम यांनी इराणला स्पष्ट केले की, अमेरिका आता केवळ निषेध नोंदवून शांत बसणार नाही, तर लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारेल.
⚠️ SIGNIFICANT STATEMENT – U.S. Senator Says Trump Would Kill Khamenei if Iran Keeps Gunning Down Protesters A senior U.S. senator is openly warning Iran’s leadership that continued lethal repression could trigger consequences at the very top, as nationwide protests intensify… pic.twitter.com/p1nIOn4Zqy — Jewish Breaking News (@JBreakingNews) January 7, 2026
credit : social media and Twitter
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना एका गुप्त मोहिमेद्वारे अटक करून अमेरिकेत आणले. या घटनेमुळे इराणच्या इस्लामिक राजवटीत भीतीचे वातावरण आहे. लिंडसे ग्राहम यांनी या कारवाईचा उल्लेख करत सांगितले की, अमेरिकन इच्छाशक्ती काय आहे, हे जगाने मादुरोच्या उदाहरणावरून पाहिले आहे. इराणमध्येही जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर अमेरिकन सैन्य थेट खामेनेईंना लक्ष्य करू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे
इराणमधील अब्दानान आणि इतर शहरांमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी स्वतःचे गणवेश उतरवून आंदोलकांमध्ये सामील होत असल्याचे दावे केले जात आहेत. जर इराणचे लष्कर आणि पोलीसच जनतेच्या बाजूने उभे राहिले, तर खामेनेई यांची सत्ता धोक्यात येऊ शकते. या अंतर्गत बंडाळीचा फायदा घेऊन अमेरिका इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ans: इराणमध्ये सुरू असलेल्या शांततामय आंदोलनांवर सुरक्षा दले गोळीबार करत असल्याने आणि त्यात नागरिकांचा मृत्यू होत असल्याने अमेरिकेने ही धमकी दिली आहे.
Ans: वाढती महागाई, बेरोजगारी आणि इराणच्या चलनाची झालेली घसरण यामुळे संतप्त झालेली जनता रस्त्यावर उतरली आहे.
Ans: अमेरिकेने नुकतीच व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना अटक केली आहे. तशीच लष्करी कारवाई इराणमध्येही होऊ शकते, हे दर्शवण्यासाठी हे उदाहरण दिले.






