Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Strike on Mossad : मोसादचा खेळ खल्लास, तेल अवीवमधील मुख्यालय उडवलं; इराणचा मोठा दावा

इराण आणि इस्रायलकडून गुप्तचर संस्थांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलची लष्करी गुप्तचर संस्था आणि मोसादचे ऑपरेशन सेंटर नष्ट केल्याचा दावा केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 17, 2025 | 07:28 PM
मोसादचा खेळ खल्लास, तेल अवीवमधील मुख्यालय उडवलं; इराणचा मोठा दावा

मोसादचा खेळ खल्लास, तेल अवीवमधील मुख्यालय उडवलं; इराणचा मोठा दावा

Follow Us
Close
Follow Us:

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध अत्यंत धोकादायक मोडवर पोहोचलं आहे. दोन्ही देशांच्या राजधानीत भीतीदायक सायरन वाजतायेत, क्षेपणास्त्र डागली जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान दोन्ही देशांकडून गुप्तचर संस्थांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलची लष्करी गुप्तचर संस्था आणि मोसादचे ऑपरेशन सेंटर नष्ट केल्याचा दावा केला आहे.

G -7 Summit : काय आहे G-7? कसं चालतं काम? भारत सदस्य नसताना दरवेळी आमंत्रण का? वाचा सविस्तर

इराणच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, IRGC ने मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे इस्रायलची सर्वात शक्तिशाली एजन्सी मोसादचा ऑपरेशनल बेस उडवून दिला. इस्रायली मिलिटरी इंटेलिजेंस डायरेक्टरेटवरही (अमान) हल्ला केल्याचा दावाही करण्यात आला आहे. युद्धाच्या दरम्यान इस्रायलला कमकुवत करण्यासाठी आणि त्याची गुप्तचर शक्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

इराणचा दावा आहे की हा क्षेपणास्त्र हल्ला तेल अवीवमध्ये करण्यात आला आहे. तेल अवीवमध्ये मोसादचा एक प्रमुख तळ होता. मात्र या हल्ल्याबद्दल इस्रायलकडून अधिकृतपणे कोणतीही पुष्टी मिळालेली नाही, परंतु सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये तेल अवीवमधील स्फोटांनंतर धुराचे ढग दिसत होते. इराणने याला आमचं प्रत्युत्तर असं म्हटलं आहे.

इस्रायलचं मात्र मौन

या हल्ल्यावर इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु जर मोसादवरील हल्ला यशस्वी झाला तर इस्रायलच्या गुप्तचर क्षमतेला मोठा धक्का ठरू शकतो, अशी भीती रक्षातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि युरोपीय देश या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक देशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केलं आहे.

Israel Iran War : ‘खामेनींच्या हत्येने संघर्ष संपेल’; इराणशी युद्धादरम्यान इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचे खळबळजनक विधान

युद्ध आता निर्णायक वळणावर

इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष आता केवळ मर्यादित लष्करी कारवाई राहिलेला नाही, तर तो गुप्तचर संस्था आणि राजधानी शहरांवर केंद्रित युद्ध बनला आहे. जर परिस्थिती सामान्य झाली नाही तर हा संघर्ष एका व्यापक प्रादेशिक युद्धात बदलू शकतो, ज्यामध्ये अमेरिका, रशिया आणि इतर अनेक देशांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका दिसून येण्याची शक्यता आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण हल्ला केल्यानंतर या संघर्षाला तोंड फूटलं आहे.

Web Title: Iran army claim missile strike on israel mossad headquarters latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Iran Attack
  • Iran-Israel War
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
1

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
2

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इराणचे अणु स्वप्न भंगणार? युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायलने वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची केला होती हत्या
3

इराणचे अणु स्वप्न भंगणार? युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायलने वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची केला होती हत्या

इस्रायल, अमेरिका नव्हे… ‘या’ तीन देशांच्या धमकीने थरथरला इराण; अणु चर्चा पुन्हा सुरु करण्यास दर्शवली सहमती
4

इस्रायल, अमेरिका नव्हे… ‘या’ तीन देशांच्या धमकीने थरथरला इराण; अणु चर्चा पुन्हा सुरु करण्यास दर्शवली सहमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.