Israel Iran War : 'खामेनींच्या हत्येने संघर्ष संपेल'; इराणशी युद्धादरम्यान इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचे खळबळजनक विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi : जेरुसेलम: इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता चांगलेच भडकले आहे. दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत आहे. अशातच इस्रायलकडून इराणमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरु आहे.याच युद्धादरम्यान इस्रायलचे पतंप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे मोठे खळबळजनक विधान समोर आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर युद्ध थांबेल असे नेतन्याहूंनी म्हटले आहे.
एबीसी न्यूजच्या मुलाखतीदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना लक्ष्य करण्याची शक्यता नाकारण्यात आली होती. त्यांनी इराण त्यांना जे करायचे आहे ते करेल आणि आम्ही जे करायचे आहे ते करु असे त्यांनी म्हटले होते. या मुलाखतीदकम्यान त्यांना युद्धबंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
यावेळी नेतन्याहूंनी म्हटले “मी अधिक काही बोलणार नाही, परंतु सर्वोच्च अणुशास्त्रज्ञांना आम्ही ठार केले आहे. इराणला अणु शस्त्रे बनवण्यापासून रोखण्याचा आमचा उद्देश आहे.” तसेच खामेनींना संपवण्याबाबतच्या इस्रायलच्या योजनेबाबत विचारले असता नेतन्याहूंनी, अशी कोणतीही योजना आखण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले. परंतु त्यांनी हेही स्पष्ट केले की, खामेनींच्या हत्येने संघर्ष वाढणार नाही, तर थांबेल.
याच वेळी युद्धात अमेरिकेच्या सहभागाबद्दल विचारले असता नेतन्याहूंनी इराण अमेरिका आणि इस्रायलसाठी धोकादायक असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, इराण अमेरिका आणि इस्रायलबाबत खोट्या बातम्या पसरवत आहे. तसेच इस्रायल मुर्दाबाद, अमेरिका मुर्दाबादचे नारे इराणमध्ये दिले जात आहे. अशा वेळी अमेरिका आपल्यासाठी आणि मित्र देशांसाठी मदतीस पुढे येणारच असे नेतन्याहूंनी म्हटले. सध्या अमेरिकेने एकाच वेळी इस्रायलला लढाऊ विमानांना इंधन देणारी 28 टँकर विमानांची मदत पुरवली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबशळ उडाली आहे.
याच वेळी दुसरीकडे रशिया आणि चीनने इराणला पाठिंबा दर्शवला आहे. चीन आणि रशियाने युद्धात मध्यस्थीची ऑफर दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींकडे युरेनियमच्या साठ्याची मागणी केली आहे. अद्याप या प्रस्तावामागील रशियाचा हेतू स्पष्ट झालेला नाही, परंतु यामुळे युद्ध अधिक भडकण्याची शक्यत आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये अणुयुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी 13 जून रोजी इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर, तसेच संरक्षण मुख्यालयांवर आणि लष्करी कमांड सेटंर्सवर लढाऊ विमानांचा हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले. इराणचे 20 हून अधिक लष्करी अधिकारी, तसेच आण्विक शास्त्रज्ञ हल्ल्यात मारले गेले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तारात इराणने देखील इस्रायलव हल्ले करण्यास सुरुवात केली. सध्या दोन्ही देशांत गेल्या पाच दिवसापासून लष्करी संघर्ष सुरु आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धात आता रशियाची एन्ट्री; पुतिन यांनी खामेनींना दिली मोठी ऑफर