Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Spill: जगावर इंधन संकट! इराणने पार केल्या सर्व मर्यादा; इराकच्या हद्दीत घुसून अमेरिकन जहाजांवर स्फोटकांचा पाऊस, VIDEO VIRAL

Operation Epic Fury: इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पलीकडे आणि संपूर्ण पर्शियन आखातात हल्ले वाढवत आहे, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलवर दबाव वाढत आहे. जाणून घ्या काय आहे सध्याचे अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 12, 2026 | 08:23 AM
iran attacks us oil tankers near iraq border operation epic fury marathi

iran attacks us oil tankers near iraq border operation epic fury marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • समुद्रात आगीचा तांडव
  • ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’
  • जागतिक इंधन संकट

Basra Port Explosion 2026 : मध्यपूर्वेतील संघर्ष (US-Israel Iran War) आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. इस्रायल आणि हमास युद्धाच्या ठिणगीने आता संपूर्ण आखाती देशांना आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. ११ तारखेला घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेत, इराणने इराकच्या (Iraq Border) सीमेजवळ (इराकी जलक्षेत्रात) उभ्या असलेल्या दोन अमेरिकन तेल टँकरवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आगीच्या ज्वालांनी संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. इराणने आता केवळ इस्रायलला नव्हे, तर अमेरिकेच्या जागतिक व्यापारी हितसंबंधांना थेट आव्हान दिले आहे.

नेमके काय घडले बसरा बंदरात?

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, इराकी बंदर अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की कुवैत सीमेजवळील इराकच्या ‘बसरा’ बंदरात नांगरलेल्या दोन महाकाय तेल टँकरना लक्ष्य करण्यात आले. हे दोन्ही टँकर माल्टा आणि मार्शल बेटांवर नोंदणीकृत होते, परंतु त्यांचा थेट संबंध अमेरिकन तेल वाहतुकीशी होता. मध्यरात्रीच्या सुमारास इराणी जहाजांनी या टँकरवर स्फोटकांचा मारा केला. या भयानक हल्ल्यात एका परदेशी क्रू मेंबरचा (कर्मचाऱ्याचा) जागीच मृत्यू झाला, तर सुदैवाने ३८ जणांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. आग लागली तेव्हा दोन्ही जहाजे एकमेकांच्या अगदी जवळ होती, त्यामुळे आग वेगाने पसरली आणि दोन्ही जहाजे जळून खाक झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ड्रॅगनच्या दारात भारताचे ‘यमदूत’! BrahMos आणि Akashच्या जोडीने फिलीपिन्स अभेद्य; चीनच्या नौदलाला पळता भुई थोडी

पर्यावरणाचा विनाश आणि आर्थिक फटका

हा हल्ला केवळ लष्करीदृष्ट्या भयंकर नाही, तर पर्यावरणासाठीही विनाशकारी ठरला आहे. स्फोटानंतर दोन्ही टँकरमधील हजारो लिटर कच्चे तेल थेट समुद्रात मिसळले गेले आहे. यामुळे पर्शियन आखातातील सागरी जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घटनेनंतर इराकी अधिकाऱ्यांनी तातडीने बसरा बंदरातून होणारी कच्च्या तेलाची सर्व वाहतूक थांबवली आहे. बसरा बंदर हे पर्शियन आखातातील सर्वात खोल ठिकाण आहे आणि येथून होणारी वाहतूक ठप्प झाल्याचा थेट परिणाम जागतिक तेलाच्या किमतींवर (Oil Prices) होणार आहे.

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आणि इराणचा वाढता दबदबा

तज्ज्ञांच्या मते, हा हल्ला इराणच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) चा एक भाग आहे. आतापर्यंत इराणचा प्रभाव केवळ ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुरता मर्यादित मानला जात होता. पण बसरा बंदर होर्मुझपासून सुमारे ८०० किलोमीटर दूर आहे. याचा अर्थ इराणने आता आपले हल्ले संपूर्ण पर्शियन आखातात विस्तारले आहेत. अमेरिका आणि इस्रायलवर दबाव आणण्यासाठी इराण आता थेट त्यांच्या जागतिक पुरवठा साखळीवर (Supply Chain) वार करत आहे.

ईरान ने अमेरिका के दो आयल शिप पर हमला किया।
pic.twitter.com/nWs8oEYNF7
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) March 12, 2026

credit – social media and Twitter

इराकच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन

हा हल्ला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात नसून थेट ‘इराकी जलक्षेत्रात’ झाला आहे. इराकी लष्करी अधिकाऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, हे इराकच्या सार्वभौमत्वाचे थेट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. दोन देशांमधील राजकीय संबंध यामुळे अधिकच ताणले जाण्याची शक्यता आहे.

इराणच्या हल्ल्यांची मालिका: ओमानपासून जपानपर्यंत धडकी

इराण केवळ येथेच थांबलेला नाही. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायल, थायलंड आणि जपानच्या चार परदेशी जहाजांवरही हल्ला केल्याचा दावा केला आहे. जहाजांनी नौदलाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे कारण IRGC ने दिले आहे. याव्यतिरिक्त, इराणने ओमानमधील ‘सलालाह’ बंदरातील इंधन साठवण टाकीवर ‘शाहेद ड्रोन’ने (Shahed Drone) हल्ला केला. यामुळे तिथेही मोठी आग लागली असून ती विझवण्यासाठी ओमानी अधिकाऱ्यांची शर्थीची झुंज सुरू आहे. तसेच, दक्षिण इराकमधील सर्वात मोठ्या ‘मजनून तेल क्षेत्रावर’ही ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : THAAD Defence: युद्धात इराणला पहिलं यश! इराणच्या धाकाने दक्षिण कोरियाचं ‘कवच’ हिसकावलं; किम जोंग-उनला मोठी संधी

इराणचा अमेरिकेला खुला इशारा

इराणची सर्वोच्च लष्करी समन्वय संस्था असलेल्या ‘खातम अल-अंबिया सेंट्रल मुख्यालयाने’ सरकारी टीव्हीवरून एक अतिशय गंभीर निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, “अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या मालकीचे असलेले किंवा त्यांच्यासाठी तेल वाहून नेणारे जगातील कोणतेही जहाज आता आमचे ‘कायदेशीर लक्ष्य’ (Legitimate Target) असेल.” हा इशारा म्हणजे थेट जागतिक अर्थव्यवस्थेला दिलेली धमकी आहे. जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली किंवा व्यापारी जहाजांवर असेच हल्ले सुरू ठेवले, तर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडतील आणि महागाईचा आगडोंब उसळेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने हल्ला केलेले तेल टँकर कुठे उभे होते?

    Ans: हे दोन तेल टँकर इराक आणि कुवैतच्या सीमेजवळ असलेल्या इराकच्या 'बसरा' बंदरात नांगरलेले होते.

  • Que: 'ऑपरेशन एपिक फ्युरी' काय आहे?

    Ans: होर्मुझच्या सामुद्रधुनीपलीकडे जाऊन पर्शियन आखातात अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांना व इंधन तळांना लक्ष्य करण्याच्या इराणच्या आक्रमक मोहिमेला हे नाव दिले गेले आहे.

  • Que: या हल्ल्याचा जागतिक परिणाम काय होईल?

    Ans: समुद्रात तेलगळती झाल्याने पर्यावरणीय नुकसान तर झालेच आहे, पण बसरा बंदरातील वाहतूक थांबल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होऊन इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Iran attacks us oil tankers near iraq border operation epic fury marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Football विश्वात खळबळ! इराणची FIFA World Cup 2026 मधून माघार; अमेरिकेसोबतच्या तणावामुळे टोकाचा निर्णय
1

Football विश्वात खळबळ! इराणची FIFA World Cup 2026 मधून माघार; अमेरिकेसोबतच्या तणावामुळे टोकाचा निर्णय

Iran-Israel War: मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणकडून बँका व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करण्याचा इशारा 
2

Iran-Israel War: मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणकडून बँका व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करण्याचा इशारा 

LPG Supply Shortage: गॅस टंचाईमुळे मोबाईल नेटवर्क गायब होणार? ५ मार्चपासून टॉवर कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद
3

LPG Supply Shortage: गॅस टंचाईमुळे मोबाईल नेटवर्क गायब होणार? ५ मार्चपासून टॉवर कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार
4

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.