
Iran ban visa free entry for Indians over misuse by criminal elementary
Iran Suspends Visa Free Entry to India : नवी दिल्ली/तेहरान : एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणने (Iran) भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्री (Visa free Entry) बंद केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बनावट नोकऱ्या, फसवणूक आणि अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ नोव्हेंबरपासून भारतीयांना इराणमध्ये व्हिसा-फ्री एन्ट्री बंद होणार आहे.
इराणने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्री निलंबित केली आहे. बनावट नोकऱ्या, बेकायदेशीर प्रवास, तसेच नोकरीचे अमिष दाखवून भारतीयांच्या अपहरणाच्या घटाना वाढत चालल्या आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत निवदेन जारी केले आहे. या अधिकृत निवेदनानुसार, गुन्हेगारी नेटवर्कचा वाढता गैरवापर रोखण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, २२ नोव्हेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. सामान्य भारतीय पासपोर्ट धारकांना इराणमध्ये प्रवेश घेण्यासाठी व्हिसाची आवश्यकता लागणार आहे. विना व्हिसा कोणत्याही परिस्थिती भारतीयांना इराणमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि व्हिसा-फ्री प्रवास टाळण्याचा. तसेच नोकरीच्या अमिषापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी देखील भारताने अनेक वेळा हा इशारा जारी केला होता.
MEA issues advisory on suspension of visa waiver facility extended to Indian nationals travelling to Iran “The attention of Government has been drawn to several incidents of Indian nationals being lured to Iran on false promises of employment or with assurances of onward transit… pic.twitter.com/lRUgKnX6LC — ANI (@ANI) November 17, 2025
यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये नोकरीचे अमिष दाखवून भारतीयांच्या अपहरणाची घटना समोर आली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यांनुसार, मध्य पूर्वेतील किंवा इतर देशांमधील लोक भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवतात, त्यांना नोकरीसाठी बोलावतात. यानंतर त्यांना ओलिस ठेवले जाते. त्यांच्याकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून संबंधित व्यक्तीला सोडण्यासाठी पैशाच्या मागणी केली जाते. काही प्रकरणांमध्ये पैसे घेतल्यानंतर व्यक्तीला सोडले जात नाही, किंवा त्याची हत्या केली जाते. या घटनांमध्ये गेल्या काही काळात प्रचंड वाढ झाली होती.
गुजरातमधील अजयकुमार, चौधरी, प्रियाबेन चौधरी, अनिलकुमार चौधरी आणि निखिलकुमार चौधरी या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना बंधक बनवण्यात आले होते. एका एजंटमार्फत त्यांना बँकॉक, दुबईमार्गे त्यांना बोलवण्यात आले होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांकडून २ कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. सुदैवाने सरकारला याची माहिती मिळाली आणि या तरुणांची सुटका करण्यात आली. या घटनांमुळे भारतीय सरकारने व्हिसा-फ्री प्रवेश बंद केला असल्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारताचा इराण-इस्रायलशी आहे ‘इतका’ मोठा व्यवसाय! युद्ध वाढले तर काय होईल?
Ans: गेल्या काही काळात बनावट नोकऱ्या, फसवणूक आणि अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे इराणने भारतीयांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश बंद केला आहे.
Ans: इराणने भारतीयांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश बंद केला असून २२ नोव्हेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे.
Ans: भारत सरकारने नागरिकांना कोणत्या परदेशात प्रवास करण्यापूर्वी अधिकृत आणि विश्वासहार्य माध्यमांचा वापर करण्याचा, तसेच कोणत्या संशयास्पद किंवा नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या एजंटवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देऊ नये.