Sheikh Hasina : बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangaldesh News in Marathi : ढाका : बांगलादेशात सध्या तणावाचे वातावरण आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवामी लीगने याला विरोध केला असू देशव्यापी बंदाची हाक दिली आहे. ढाकातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) च्या निर्णायाला अवामी लीगने तीव्र विरोध केला आहे
‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण
बांगलादेशच्या (Bangladesh) ICT-BD न्यायाधिकरणाने हसीना यांना जुलै २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलानात झालेल्या हिंसाचारास उकसवण्याच्या आणि हत्येचा आदेश देण्याच्या निर्णायाविरोधात दोषी ठरवले आहे. याअंतर्गत हसीना यांना फाशी देण्यात आली आहे. पण याविरोधात अवामी लीगच्या पक्षाने बंड पुकारला आहे.
अवामी लीग पक्षाने अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. अवामी लीगचे नेते जहांगीर कबीर यांच्या फेसबुकवर पक्षाच्या पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये म्हणण्यात आले आहे की, ICT-BD चा निर्णय हा राजकीय हेतून प्रेरित आणि सूडबुद्धाचा आहे.
याशिवाय अवामी लीगने न्यायालयाच्या प्रक्रियेवरीही प्रश्न उपस्थित केले आहे. अवामी लीगने आरोप केला आहे की, १४ ऑग्सट रोजी सुरु झालेल्या खटल्यावर १७ नोव्हेंबर रोजी निकाल गेम्यात आला. न्यायालयाने केवळ २० दिवसांत सुनावणी घेतली. तसेच ८४ साक्षीदारांपैकी केवळ ५४ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. मुख्य न्यायाधीशही एका महिन्यासाठी अनुउपस्थित होते आणि निकाल देण्यात आला.
हसीनांवरील आरोप
हसीना यांच्यावर १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर पोलिस आणि सुरक्षा दलांना प्राणघातक कारवाई करण्याचे आदेशच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या आंदोलनात १,४०० हून अधिक मृत्यू झाले होते. त्यांच्या हत्येचा आरोप हसीना यांच्यावर करण्यात आला होता. एकूणच हसीना यांच्यावर हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आणि लोकांना मारहाण केल्याचा आरोप होते. हसीनांवरील हे आरोप सिद्ध झाले असून त्यांना फाशीची शिक्षा ICT-BD ने सुनावली आहे.
हसीना यांच्या शिक्षेवर भारताची प्रतिक्रिया
दरम्यान भारताने हसीना यांच्या शिक्षेवर प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. भारताच्या निवेदनानुसार, बांगलादेशातील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष आहे. ICT च्या निर्णयानंतर बांगलादेशात निर्माण होणारे राजकीय वातावरण, वेगवेगळ्या गटांमधील संवाद आणि राष्ट्रातील शांतता याबाबत भारताची चिंता व्यक्त केली आहे.
Ans: ICT-BD न्यायाधिकरणाने हसीना यांना जुलै २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलानात झालेल्या हिंसाचारास उकसवण्याच्या आणि हत्येचा आदेश देण्याच्या निर्णायाविरोधात दोषी ठरवले आहे. यामुळे त्यांना पाच गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Ans: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात त्यांच्याच अवामी लीग पक्षातील कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आहे.






