Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MQ9 Reaper: समुद्रात कोसळलं अमेरिकेचं ‘F-16’? US वायुदलाचं कंबरडं मोडलं; वाचा इराणच्या IRGCच्या ‘या’ VIRAL दाव्यामागचं सत्य

Iran-US War News: इराणच्या आयआरजीसीने अमेरिकेचे एक एफ-१६ लढाऊ विमान आणि एक एमक्यू-९ रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या 'माहिती युद्धा'मधील तणाव वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 29, 2026 | 02:28 PM
iran claims us f16 fighter jet mq9 drone shot down pentagon alert 2026

iran claims us f16 fighter jet mq9 drone shot down pentagon alert 2026

Follow Us
Follow Us:
  • इराणचा सर्वात मोठा प्रहार
  • पेंटागॉनमध्ये खळबळ
  • माहिती युद्धाचा भडका

Iran claims US F-16 shot down 2026 : मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता सर्वात भयानक वळण घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनी घायाळ झालेल्या इराणने आता थेट अमेरिकेच्या वायुदलावरच निशाणा साधला आहे. इराणचे निमलष्करी दल ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) ने असा दावा केला आहे की, त्यांनी अमेरिकेचे एक ‘F-16’ लढाऊ विमान आणि एक ‘MQ-9’ रीपर ड्रोन पाडले आहे. या बातमीने जागतिक राजकारणात आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

शिराझ शहरावर थरार: कसा झाला हल्ला?

इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण इराणमधील ‘शिराझ’ शहराच्या आकाशात अमेरिकन ड्रोन आणि विमानांची हालचाल दिसून आली होती. यावेळी IRGC च्या हवाई संरक्षण यंत्रणेने सक्रिय होत हल्ला चढवला. इराणचा दावा आहे की, त्यांनी अमेरिकेचे सर्वात भरवशाचे मानले जाणारे ‘MQ-9’ रीपर ड्रोन यशस्वीपणे पाडले. इतकेच नाही तर, एका ‘F-16’ लढाऊ विमानावरही अचूक मारा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे विमान समुद्रात कोसळले की इराणच्या हद्दीत, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO: जगाच्या विनाशाचे संकेत? इस्रायलच्या आकाशात पसरलं काळं सावट; हजारो कावळ्यांनी सोडलं शहर; कॅमेऱ्यात कैद झाले थरारक क्षण

पेंटागॉनचे ‘मौन’ आणि माहिती युद्धाचा पेच

इराणच्या या दाव्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’मध्ये तातडीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, अमेरिकेने अद्याप या विमानाबाबत किंवा ड्रोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्करी तज्ज्ञांच्या मते, सध्या दोन्ही देश ‘माहिती युद्ध’ (Information Warfare) लढत आहेत. इराण आपल्या देशातील जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी असे दावे करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, जर खरोखरच अमेरिकेचे F-16 विमान पाडले गेले असेल, तर हा अमेरिकेसाठी गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा लष्करी धक्का ठरेल.

ANOTHER US MQ‑9 DRONE WORTH OVER $30+ MILLION SHOT DOWN BY IRAN — Tasnim pic.twitter.com/gDihzqVcaX — RT (@RT_com) March 10, 2026

credit – social media and Twitter

बदल्याची आग: इराणचा इशारा

IRGC ने आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, “आमच्या नागरिक आणि औद्योगिक क्षेत्रांवर अमेरिकेने जे हल्ले केले, हा त्याचाच बदला आहे.” इराणने केवळ विमानेच नाही, तर ‘व्याप्त प्रदेशां’मधील अमेरिकन आणि इस्रायली लष्करी तळांनाही क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे आखाती देशांमध्ये हाय-अलर्ट घोषित करण्यात आला असून, जागतिक ऊर्जा बाजारपेठेतही (तेल पुरवठा) भीतीचे वातावरण पसरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Protest: अमेरिकेत ट्रम्पविरोधात ‘दुसरं स्वातंत्र्ययुद्ध’? 50 राज्यांत ‘नो किंग’चा एल्गार; ‘या’ VIRAL VIDEO मुळे समजलं सत्य

जगावर युद्धाचे सावट

F-16 सारखे अत्याधुनिक विमान पाडणे ही साधी गोष्ट नाही. जर या दाव्यात तथ्य असेल, तर अमेरिका इराणवर यापूर्वी कधीही न झालेला इतका भीषण हल्ला करू शकते. दुसरीकडे, जर हा केवळ इराणचा प्रचार असेल, तर अमेरिकेची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष पेंटागॉनच्या अधिकृत निवेदनाकडे आणि उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या फोटोंकडे लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेचे कोणते लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे?

    Ans: इराणच्या IRGC ने अमेरिकेचे 'F-16' लढाऊ विमान आणि 'MQ-9' रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.

  • Que: हा हल्ला कुठे झाला?

    Ans: इराणच्या दाव्यानुसार हा हल्ला दक्षिण इराणमधील 'शिराझ' शहराच्या आकाशात आणि परिसरात झाला आहे.

  • Que: अमेरिकेची यावर काय प्रतिक्रिया आहे?

    Ans: अमेरिकेने अद्याप या दाव्याला दुजोरा दिलेला नाही किंवा फेटाळलेलेही नाही. पेंटागॉन सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

Web Title: Iran claims us f16 fighter jet mq9 drone shot down pentagon alert 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
2

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
3

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात
4

Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.