Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran US Ceasefire: ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘अशा’ अशक्य अटींचा डोंगर

Iran Demands: इराणच्या या मागण्या पूर्ण करणे अमेरिका आणि इस्रायलसाठी केवळ कठीणच नाही, तर अशक्यही आहे. आर्थिक भरपाईचा विचार करा. जरी इराणने अद्याप अधिकृतपणे कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 25, 2026 | 10:57 AM
iran demands 500 billion dollar ceasefire jd vance pakistan visit trump conflict 2026

iran demands 500 billion dollar ceasefire jd vance pakistan visit trump conflict 2026

Follow Us
Follow Us:
  • इराणची ‘इम्पॉसिबल’ खेळी
  • ट्रम्प यांची कोंडी
  • पाकिस्तान ठरणार रणांगण

JD Vance Pakistan visit Iran ceasefire : जग ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स (JD Vance) शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला रवाना होत आहेत. मात्र, त्यांच्या विमानाने पाकिस्तानात लँडिंग करण्यापूर्वीच इराणने (Iran) अशा अटी मांडल्या आहेत, ज्या वाचून व्हाईट हाऊसमध्ये खळबळ उडाली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, केवळ युद्ध संपवणे पुरेसे नाही; तर अमेरिकेला आता विनाशाची किंमत मोजावी लागेल. या अटी म्हणजे शांततेचा प्रस्ताव नसून अमेरिकेला झुकवण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इराणच्या ७ स्फोटक अटी: ज्या मान्य करणे आहे ‘अशक्य’!

इराणने मांडलेल्या मागण्यांची यादी कोणत्याही महासत्तेसाठी अपमानकारक ठरू शकते. इराणने पहिली मागणी केली आहे की अमेरिकेने पर्शियन आखात आणि पश्चिम आशियातील आपले सर्व लष्करी तळ कायमचे बंद करावेत. दुसरी सर्वात मोठी अट म्हणजे ‘आर्थिक भरपाई’. युद्धादरम्यान झालेल्या नुकसानीसाठी इराणने तब्बल ५०० अब्ज डॉलर्सची (अब्जावधी रुपये) मागणी केली आहे. इतकेच नाही, तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून ‘टॅक्स’ वसूल करण्याचा अधिकारही इराणला हवा आहे. याव्यतिरिक्त, इराणने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकासावर कोणतेही निर्बंध मान्य करण्यास नकार दिला असून, लेबनॉनमधील हिजबुल्लाहवरील इस्रायली हल्ले त्वरित थांबवण्याची अट घातली आहे. या अटी पाहता, इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या आशेवर पाणी फेरल्याचे दिसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट

डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी डोकेदुखी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना जागतिक धोका मानले आहे. आता इराण म्हणत आहे की ते क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरूच ठेवणार. मग ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू करून नक्की काय साध्य केले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर ट्रम्प यांनी इराणच्या अटी मान्य केल्या, तर तो अमेरिकेचा जागतिक स्तरावर सर्वात मोठा पराभव मानला जाईल. तसेच, सौदी अरेबियासारखी मित्र राष्ट्रे स्वतःला असुरक्षित समजतील आणि अमेरिकेचा या प्रदेशातील प्रभाव कायमचा संपुष्टात येईल.

JUST IN: 🇮🇷🇺🇸 Iran tells the United States it does not want to resume talks with Witkoff and Kushner, prefers negotiating with Vice President JD Vance instead, CNN reports. pic.twitter.com/WRbdbPFz2y — BRICS News (@BRICSinfo) March 24, 2026

credit – social media and Twitter

पाकिस्तानमध्ये काय घडणार? जे.डी. व्हान्स आणि इराण समोरासमोर

इस्लामाबादमध्ये होणारी ही बैठक ऐतिहासिक ठरू शकते. जे.डी. व्हान्स यांच्याकडे ट्रम्प यांचा विशेष संदेश असला तरी, इराणच्या अटींमधील ‘भरपाई’ आणि ‘लष्करी माघार’ या दोन मुद्द्यांवरच चर्चा फिस्कटण्याची शक्यता ९०% आहे. भारतीय भू-राजकीय तज्ज्ञ सुशांत शारीन यांच्या मते, इराणकडे आता गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही. त्यांच्याकडे आता अधिक शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा स्थितीत इराण कोणतीही तडजोड करेल, असे वाटत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘आम्ही या नाटकात नाही’ इस्रायलचा ट्रम्पला घरचा आहेर; अमेरिकेच्या ’15 कलमी’ चक्रव्यूहात अडकणार इराण?

युद्धविराम की नव्या युद्धाची नांदी?

पाकिस्तानमध्ये होणारी शांतता चर्चेची पहिली फेरी यशस्वी होण्याची शक्यता धूसर आहे. इराणने मांडलेल्या अटी म्हणजे ट्रम्प प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा एक ‘मास्टरप्लॅन’ आहे. आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे किंमत मोजून शांतता विकत घ्यायची की इराणचा हा ‘अहंकार’ लष्करी ताकदीने चिरडायचा? येत्या २४ तासांत पाकिस्तानच्या भूमीवरून जगाचा इतिहास लिहिला जाणार आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेकडे किती आर्थिक भरपाई मागितली आहे?

    Ans: अधिकृत आकडा जाहीर नसला तरी, अहवालानुसार इराणने युद्धाच्या नुकसानीपोटी ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची मागणी केली आहे.

  • Que: जे.डी. व्हान्स पाकिस्तानला का जात आहेत?

    Ans: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स इराणसोबतच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी आणि शांतता चर्चेच्या पहिल्या फेरीसाठी पाकिस्तानला भेट देत आहेत.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून काय वाद आहे?

    Ans: इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जागतिक व्यापारी जहाजांकडून शुल्क (टॅक्स) आकारण्याचा अधिकार हवा आहे, ज्यामुळे जागतिक तेलाच्या किमती इराणच्या नियंत्रणात येतील.

Web Title: Iran demands 500 billion dollar ceasefire jd vance pakistan visit trump conflict 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Donald Trump
  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
4

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.