
iran deploys persian gulf dolphin submarines strait of hormuz us conflict 2026
Iran Persian Gulf Dolphin Submarine : जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) सध्या अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या तेलवाहू जहाजांना रोखल्यानंतर, इराणने आता आपला सर्वात मोठा ‘गुप्त’ पत्ता बाहेर काढला आहे. इराणने आपल्या स्वदेशी बनावटीच्या ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’ या हलक्या पाणबुड्या होर्मुझमध्ये तैनात केल्या असून, यामुळे अमेरिकन नौदलाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
इराणचे नौदल कमांडर रिअर ॲडमिरल शहराम इराणी यांनी या तैनातीची अधिकृत घोषणा केली आहे. ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’ या केवळ नावापुरत्या डॉल्फिन नसून, त्या पाण्याखालून शत्रूचा काळ ठरू शकतात. या पाणबुड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वजन कमी असल्याने त्या उथळ पाण्यातही अत्यंत वेगाने प्रवास करू शकतात. या पाणबुड्या समुद्रतळावर कित्येक दिवस शांतपणे पडून राहू शकतात, ज्यामुळे शत्रूच्या रडारला (Radar) त्यांना शोधणे अशक्य होते. येथूनच त्या अमेरिकन जहाजांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवतील आणि आदेश मिळताच क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यास सक्षम असतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची ‘लाईफलाईन’ मानली जाते. जगातील एकूण तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने या मार्गावरील वाहतूक रोखण्याचा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली नाकेबंदी अधिक कडक केली आहे. दोन्ही देशांच्या या हट्टापायी आता जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने दक्षिण आशियाई देशांमध्ये, विशेषतः भारतात इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Iran’s Navy Commander, Rear Admiral Shahram Irani: Iran’s domestically built light submarines—known as dolphins of the Persian Gulf—are being deployed and expanded in the Strait of Hormuz based on threats, capabilities, and operational needs, remaining on alert and ready for… pic.twitter.com/h3CfKLQgDj — Iran in India (@Iran_in_India) May 10, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर
अमेरिका आणि इराणमध्ये कागदोपत्री युद्धविराम असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवर आणि समुद्रात मात्र परिस्थिती वेगळी आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे हा युद्धविराम केवळ नावापुरता उरल्याचे चित्र दिसत आहे. इराणच्या या पाणबुड्या पाण्याखाली गस्त घालत असून, ‘देना’ या विनाशिकेच्या स्मरणार्थ इराणने आपली लष्करी ताकद जगाला दाखवून दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात होर्मुझच्या समुद्रात कधीही मोठ्या युद्धाचा भडका उडू शकतो, अशी भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.