
iran lavan island oil refinery attack after us ceasefire announcement 2026
Iran oil refinery attack Lavan Island 2026 : जागतिक राजकारणात जेव्हा जेव्हा शांततेच्या गप्पा मारल्या जातात, तेव्हा तेव्हा काहीतरी विपरीत घडते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अमेरिकेने इराणसोबत ‘सशर्त युद्धविराम’ (Conditional Ceasefire) जाहीर करून जगाला दिलासा दिला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावान बेटावरील एका महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर (Oil Refinery) भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती देशात पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने ‘एपी’ (AP) या वृत्तसंस्थेचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार १०:०० वाजता लावान बेटावर एकामागून एक भीषण स्फोट झाले. हे स्फोट इतके भयानक होते की, परिसरातील आकाशात धुराचे काळे लोट पसरले. लावान बेट हे इराणच्या तेल उत्पादनाचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते आणि तिथेच हा हल्ला झाल्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेच्या नाडीवर घाला घातला गेल्याचे बोलले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Aatmanirbhar Bharat: शत्रूचा नायनाट करण्यासाठी ‘ड्रोन आर्मी’ आणि ‘अणु-पाणबुड्या’ सज्ज; ‘अशी’ आखली जातेय भारताची नवी संरक्षण रणनीती
इराणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या हल्ल्यामुळे रिफायनरीचे तांत्रिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून तेल शुद्धीकरणाचे काम ठप्प झाले आहे. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आता इराणसमोर आहे.
BREAKING: Heavy airstrikes hit Iran’s Lavan oil refinery on Lavan Island in Persian Gulf pic.twitter.com/VXYxW9zlUs — Rapid Report (@RapidReport2025) April 8, 2026
credit – social media and Twitter
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेने शस्त्रसंधीची घोषणा केल्यावर हा हल्ला झाला आहे. यामुळे हा शांतता करार केवळ दाखवण्यासाठीच होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इराणी अधिकाऱ्यांनी अद्याप या हल्ल्यासाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही, परंतु ज्या वेळेत हा हल्ला झाला आहे, तो पाहता हा जाणीवपूर्वक केलेला कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराणमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट असून, लष्कर आता हाय अलर्टवर आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House Protest: इराण युद्धाला 15 दिवसांचा ‘विश्राम’! ट्रम्प यांच्या निर्णयाने वॉशिंग्टन पेटलं; व्हाईट हाऊसला आंदोलकांचा वेढा
लावान बेटावरील या हल्ल्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटण्यास सुरुवात झाली आहे. आधीच होर्मुझच्या नाकेबंदीमुळे त्रस्त असलेल्या जगाला आता या नव्या हल्ल्यामुळे इंधन दरवाढीचा सामना करावा लागू शकतो. भारतासारख्या देशांसाठी, जो ऊर्जेसाठी आखाती देशांवर अवलंबून आहे, ही बातमी चिंताजनक आहे. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर अमेरिकेने जाहीर केलेल्या युद्धविरामाला काहीही अर्थ उरणार नाही.
Ans: इराणच्या लावान बेटावरील (Lavan Island) एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हा भीषण हल्ला झाला आहे.
Ans: अमेरिकेने सशर्त युद्धविराम (Ceasefire) जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच, बुधवारी सकाळी १० वाजता हा हल्ला झाला.
Ans: इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही, केवळ मालमत्तेचे नुकसान झाले आहे.