
iran official statement india chabahar port us sanctions deadline april 2026
Chabahar Port India Iran relations 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील मैत्रीची जगभरात चर्चा असली तरी, इराणमधील चाबहार बंदर (Chabahar Port) हा मुद्दा सध्या दोन्ही देशांच्या संबंधांची कसोटी पाहणारा ठरत आहे. अमेरिकेच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारताला मोठी साथ दिली आहे. “भारत आणि इराणचे संबंध ऐतिहासिक आहेत आणि जगातील कोणतीही ताकद या मैत्रीला हानी पोहोचवू शकत नाही,” अशा शब्दांत इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे सदस्य सलार वेलायतमदार यांनी आरटी टीव्हीशी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले की, “ट्रम्प यांच्या कृतीमुळे जगभरात अस्थिरता पसरली आहे. मात्र, चाबहार बंदर हे भारत आणि इराणमधील केवळ एक व्यापार केंद्र नसून ते आमच्या परस्पर हिताचे आणि सांस्कृतिक बंधांचे प्रतीक आहे.” वेलायतमदार यांनी स्पष्ट केले की, इराण आणि भारतातील भाषा, संस्कृती आणि परंपरांमध्ये कमालीचे साम्य असून काही तात्पुरत्या निर्बंधांमुळे हा पाया डळमळीत होणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Mr President, F*** Off…’ युरोपियन संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! डॅनिश खासदाराने Trumpची काढली खरडपट्टी; पहा VIDEO
भारतासाठी चाबहार बंदर हे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट व्यापार करण्यासाठी भारताने या बंदरात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मात्र, अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमधून भारताला दिलेली विशेष सूट २६ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. जर ही मुदत वाढली नाही, तर भारतीय कंपन्यांना अमेरिकेच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. ट्रम्प यांनी नुकताच असा इशारा दिला आहे की, जे देश इराणशी व्यापार करतील त्यांच्यावर २५% अतिरिक्त शुल्क (Tariff) लादले जाईल.
QUESTION : Will India exit #ChabaharPort in #Iran due to #US sanctions ?
MEA : The US issued a sanctions waiver until April 2026. We remain engaged with the US side on this. pic.twitter.com/3z0NjubACe — IDU (@defencealerts) January 16, 2026
credit – social media and Twitter
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट केले आहे की, भारत आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी वॉशिंग्टनच्या सतत संपर्कात आहे. भारताची ही संतुलित भूमिका इराणला मान्य आहे. वेलायतमदार म्हणाले की, “भारतीय अधिकाऱ्यांची भूमिका वाजवी आहे. शत्रूच्या प्रक्षोभक कृत्यांचा या भागीदारीवर परिणाम होऊ नये, हे दोन्ही देशांना समजते.” इराणमधील अंतर्गत निदर्शने हा परदेशी कट असल्याचा दावा करत, आता देशात पूर्णपणे शांतता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा; रशियन तेलाच्या मुद्द्यावर ‘या’ देशाला शिकवणार धडा
सध्या अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी इराणला ‘पृथ्वीवरून पुसून टाकण्याची’ धमकी दिली आहे, तर इराणने ‘मदत करणाऱ्यांचे हात कापण्याचे’ विधान केले आहे. अशा तणावाच्या स्थितीत भारत आपली गुंतवणूक कशी वाचवतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. चाबहार हे केवळ भारतासाठी नाही, तर रशियाशी जोडणाऱ्या INSTC (International North-South Transport Corridor) साठी देखील महत्त्वाचा दुवा आहे.
Ans: पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तान, रशिया आणि युरोपशी व्यापार करण्यासाठी चाबहार हे भारताचे एकमेव सागरी प्रवेशद्वार आहे.
Ans: अमेरिकेने भारताला दिलेली निर्बंधांची सूट २६ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणशी व्यवहार करणाऱ्या कोणत्याही देशावर २५% अतिरिक्त टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची धमकी दिली आहे.