Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Qatar Warns Iran: ‘आता पाणी डोक्यावरून गेलंय!’ इराणच्या हल्ल्यांनी कतारचा संयम सुटला; आखाती देशांची युद्धात उडी घेण्याची तयारी

Iran Attacks Gulf : कतारने इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे आणि म्हटले आहे की त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्यांच्या सार्वभौमत्वावर झालेल्या हल्ल्यांनंतर, आखाती देश आता बदला घेण्यासाठी तयार आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 04, 2026 | 03:12 PM
qatar warns iran gulf countries ready for war middle east conflict updates

qatar warns iran gulf countries ready for war middle east conflict updates

Follow Us
Close
Follow Us:
  • कतारचा संताप
  • सार्वभौमत्वावर घाला
  • GCC ची आपत्कालीन बैठक

Gulf countries entering Iran-Israel conflict : पश्चिम आशियातील संघर्षाने आता अशा एका वळणावर येऊन ठेपला आहे, जिथे शांततेचे सर्व दोर तुटताना दिसत आहेत. इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केल्यानंतर, आतापर्यंत तटस्थ राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कतारने आपला संयम सोडला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणला सडेतोड शब्दांत सुनावले असून, “आमच्या सार्वभौमत्वावर होणारे हल्ले आता खपवून घेतले जाणार नाहीत,” असे ठणकावून सांगितले आहे. यामुळे आता केवळ इराण-इस्रायलच (Iran-Israel conflict) नाही, तर संपूर्ण अरब जगतात महायुद्धाची ठिणगी पडली आहे.

कतारचा ‘सडेतोड’ इशारा आणि सार्वभौमत्वाचा प्रश्न

कतारचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल-अन्सारी यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत इराणच्या वाढत्या आक्रमकतेवर कडाडून टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, इराण ज्या प्रकारे कतारच्या हद्दीत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागत आहे, ते आंतरराष्ट्रीय नियमांचे सरळ उल्लंघन आहे. “इराणने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आमच्या निवासी भागांना आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धोका निर्माण झाला असून, याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,” असे अन्सारी यांनी म्हटले आहे. कतारसारख्या देशाने असा आक्रमक पवित्रा घेतल्याने इराणच्या राजनैतिक अडचणी वाढल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

आखाती देशांची अर्थव्यवस्था आणि सुरक्षेला धोका

दुबई, दोहा आणि रियाध ही शहरे जागतिक व्यापार, पर्यटन आणि आर्थिक उलाढालीची मुख्य केंद्रे आहेत. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दुबईच्या ‘जेबेल अली’ बंदरासारख्या जगातील महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांना धोका निर्माण झाला आहे. जर हे हल्ले सुरूच राहिले, तर जागतिक तेल पुरवठा आणि व्यापार पूर्णपणे कोलमडून पडेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इराणला असे वाटते की या हल्ल्यांमुळे अरब देश अमेरिकेवर दबाव आणतील, परंतु प्रत्यक्षात या रणनीतीने अरब देश आता अमेरिकेच्या अधिक जवळ जात आहेत.

🇺🇸🇬🇧 Urgent evacuations out of Qatar are sending a serious signal. The United States and United Kingdom are quietly pulling staff from key facilities and this is not a routine safety drill. It looks like real preparation for a potential strike on Iran and reports claim the orders… pic.twitter.com/Ws0MKU1xPE — WAR (@warsurv) January 14, 2026

credit – social media and Twitter

अरब जगताची एकजुट: GCC ची आपत्कालीन बैठक

या संकटाच्या पार्श्वभूमीवर, ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’ (GCC) च्या सहा सदस्य राष्ट्रांनी – सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, यूएई, कतार आणि बहरीन – एक हाय-लेव्हल आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत इराणच्या आक्रमकतेला एकत्रितपणे कसे तोंड द्यायचे, यावर चर्चा होणार आहे. सर्व देशांनी एकमुखाने सांगितले आहे की, “आमच्यापैकी एकाही देशावर झालेला हल्ला हा संपूर्ण अरब जगतावर झालेला हल्ला मानला जाईल.” या एकात्मतेमुळे इराण आता एकाकी पडण्याची चिन्हे आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Allegations: मध्यपूर्वेच्या युद्धाचा फायदा घेऊन भारत पाकिस्तानला संपवणार? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा गंभीर आरोप

राजनैतिक तोडगा की महायुद्ध?

यूएईचे वरिष्ठ सल्लागार अन्वर गर्गाश यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इराणने आपल्या शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधांचे भान ठेवावे. चिथावणीखोर कृत्यांमुळे इराण स्वतःचेच नुकसान करून घेत आहे.” मात्र, परिस्थिती इतकी बिघडली आहे की जर इराणने आपले हल्ले थांबवले नाहीत, तर आखाती देशांना नाईलाजाने या युद्धात आघाडीवर उतरावे लागेल. या संघर्षाचा परिणाम केवळ आशियावरच नाही, तर संपूर्ण जगावर होणार आहे, कारण आखाती देशांतील युद्धाचा अर्थ म्हणजे जागतिक महागाईचा आणि इंधनाच्या टंचाईचा भडका!

💡

Frequently Asked Questions

  • Que: कतारने इराणला इशारा का दिला आहे?

    Ans: इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर आणि निवासी क्षेत्रांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केल्यामुळे कतारने हा इशारा दिला आहे.

  • Que: GCC आपत्कालीन बैठकीचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: इराणच्या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी आणि सर्व आखाती देशांच्या सुरक्षेसाठी एकत्रित रणनीती आखणे, हा या बैठकीचा उद्देश आहे.

  • Que: या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

    Ans: आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Qatar warns iran gulf countries ready for war middle east conflict updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • iran
  • Oil Prices
  • Qatar
  • World War 3

संबंधित बातम्या

Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ
1

Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

Pakistan Allegations: मध्यपूर्वेच्या युद्धाचा फायदा घेऊन भारत पाकिस्तानला संपवणार? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा गंभीर आरोप
2

Pakistan Allegations: मध्यपूर्वेच्या युद्धाचा फायदा घेऊन भारत पाकिस्तानला संपवणार? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा गंभीर आरोप

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य
3

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन
4

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.