
Iran prepared for war with Israel Araghchi says
Middle East War : तेहरान : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची चिन्हे दिसू लागली आहे. नुकतेच जुलै २०२५ मध्ये इस्रायल आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष (Israel Iran War) झाला होता. १२ दिवसांसाठी हा संघर्ष सुरु होता. दरम्यान आता पुन्हा हे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी खळबळजनक विधान केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा कॅनडावर नाराज! ‘या’ कारणावरुन उसळला वाद ; लावला १०% अतिरिक्त कर
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी म्हटले आहे की, त्यांचे सैन्य कोणत्याही संभाव्य धोक्याला समोरे जाण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सज्ज आणि सतर्क आहे. आम्ही युद्धाची तयारी करत नसलो तर आमची शत्रू देशाला हाणून पाडण्याची क्षमता आहे. इराण आणि इस्रायलमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली होती. या युद्धबंदीच्या चार महिन्यानंतर अराघची यांचे हे विधान आले आहे. यामुळे पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण युद्ध सुरु होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अराघची यांनी अमेरिकेचा पक्षकार दारियश सज्जादी याला दिलेल्या मुलाखतती म्हटले की, इराणची युद्ध तयारीची क्षमता सध्या पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की, युद्धासाठी तयार असणे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्हाला कोणते युद्ध करायचे आहे. पण आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही शांत राहणार नाही. आम्ही भूतकाळातील घटना पुन्हा होऊ देणार नाही.
अणु कार्यक्रमावर चर्चा
दरम्यान याच वेळी इराणच्या अणु प्रकल्पाबाबतही सध्या चिंतेचे वातावरण आहे. इस्रायलशी युद्धामुळे आणि संघर्षात अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे इराणने अणु प्रकल्पावर वाटाघाटी चर्चा बंद केली होती. सध्या ही चर्चा पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांकडून पुन्हा निर्बंध लादण्याचीही चर्चा सुरु आहे. संयुक्त राष्ट्राने यापूर्वी लागलेल्या निर्बंधांची मुदत संपुष्टात आली आहे. यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा सुरु करण्यासाठी इराणला ६० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून अद्यापही दोन्ही देशात चर्चा सुरु झालेली नाही. यामुळे ट्रम्प यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. परंतु इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी याची खिल्ली उडवली असून ट्रम्प इराणला किंवा त्यांच्या अणु प्रकल्पाला उद्ध्वस्त करण्याचे केवळ स्वप्नच पाहू शकतात असे म्हटले आहे.