Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही भारताचा नकाशा बदलू…’ ; पाकिस्तानची पुन्हा युद्धाची धमकी; दहशतवाद्यांसह असीम मुनीरचा नवा डर्टी प्लॅन उघड

Asim Munir : असीम मुनीरच्या पुन्हा एकदा भारतविरोधी कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांशी हात मिळवणी करुन भारताचा नकाशा बदलण्याची धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 26, 2026 | 09:30 PM
Asim Munir and Hafiz Saeed

Asim Munir and Hafiz Saeed

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानची पुन्हा भारताला धमकी
  • लष्कराने केली दहशतवाद्यांशी हातमिळवणी?
  • धक्कादायक अहवाल समोर
Pakistan Threatens India : इस्लामाबाद : भारताकडून ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) चपराक बसूनही पाकिस्तान (Pakistan) सुधारलेला नाही. यानंतरही सतत भारताला बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली जात आहे. पाकिस्तान लष्कर आणि दहशतवाद्यांकडून या धमक्या मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायाक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी हातमिळवणी केली असून भारतावर हल्ल्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी गुप्त बैठकांचे आयोजनही केले जात आहे. या अहवालामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sindoor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO

दहशतवाद्यांशी लष्कराची हातमिळवणी

अहवालानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) ने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जमात-उद-दावा (JuD) यांसारख्या संघटनांशी हातमिळवणी केली आहे. या संघटनांसोबत मिळून असीम मुनीरने भारविरोधी कुरघोड्या सुरु केल्या आहे. या संघटना गेल्या काही काळापासून असीम मुनीर यांच्यासोबत गुप्त बैठका घेत आहे. तसेच महिला आणि मुलांना दहशतवादाचे प्रशिक्ष दिले जात आहे. या दहशतवादी संघटानांनी भारतविरोधी विष ओकायला सुरुवात केली आहे.

दहशतवाद्यांच्या खुल्या धमक्यांना लष्कराकडून पाठिंबा

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दहशतवादी अताउल्लाह घिलजईने भारतला थेट धमकी दिली होती. त्याने भारताचा नकाशा बदलून टाकू, अतंर्गत सीमांपर्यंत पोहोचू अशी चिथावणीखोर धमकी दिली होती. शिवाय दहशतवादी हाफिज सईदने देखील अनेक गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व दहशतवाद्यांची सभांना लष्कराकडून खतपाणी दिले जात आहे. स्वत:हा लष्करप्रमुख मुनीर देखील भारतविरोधी दहशतवाद्यांच्या पाठिशी उभे आहेत.

लष्कर-ए-तैयबाच्या एका बैठकीदरम्यान टॉप कमांडर सैफुल्लाह कसून याने देखील लष्कराकडे थेट मागणी केली होती. त्याने म्हटले होते की, आम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर्सची गरज नाही, शरीयत कायदा लागू करा, तालिबान शैलीच्या लढाऊंची आम्हाला गरज आहे. अहवालानुसार, कसून पाकिस्तानच्या राजकारणातही सक्रिय होऊ लागला आहे. हे पाकिस्तानच्या लोकशाही जनतेसाठीच नव्हे, तर भारतासाठी देखील एक मोठे संकट मानले जात आहे.

भारतावर हल्ला करणार पाकिस्तान

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान सध्या अंतर्गत युद्धात, आर्थिक संकटात अडकलेला आहे. तसेच पाकिस्तानच्या जनतेमध्ये सरकार आणि लष्कराविरोधातही रोष वाढत आहे. या समस्यांवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठीच जाणीवपूर्वक भारत आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. दहशतवाद्यांना लष्कराचे संरक्षणही दिले जात आहे. यामुळे हल्ल्याची शक्यता देखील तितकीच वाढली आहे. सध्या याच पार्श्वभूमीवप भारतीय लष्कर सतर्क झाले असून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.

पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक

Web Title: Pakistan army terrorism jaish e mohmmad lashkar e taiba threat to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Operation Sindoor
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Finger On Trigger : समुद्रात रक्ताचा पूर अन्…, इराणच्या ‘त्या’ पोस्टरने अमेरिकेची झोप उडवली,  तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर?
1

Finger On Trigger : समुद्रात रक्ताचा पूर अन्…, इराणच्या ‘त्या’ पोस्टरने अमेरिकेची झोप उडवली, तिसरे महायुद्ध उंबरठ्यावर?

Republic Day Global Celebration : तिरंग्याच्या रंगात न्हाली दुनिया! दुबई ते न्यूझीलंड मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन भारतीय दूतावास
2

Republic Day Global Celebration : तिरंग्याच्या रंगात न्हाली दुनिया! दुबई ते न्यूझीलंड मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन भारतीय दूतावास

Mexico Shooting : मेक्सिकोत मृत्यूचे तांडव! फुटबॉल मैदानावर अंदाधुंद गोळीबारात ११ ठार, अनेक जखमी
3

Mexico Shooting : मेक्सिकोत मृत्यूचे तांडव! फुटबॉल मैदानावर अंदाधुंद गोळीबारात ११ ठार, अनेक जखमी

Operation Sindoor: पाकिस्तानची ‘ती’ काळी रात्र! राफेलपुढे इस्लामाबादची शरणागती, कमांड सेंटर्स केले उद्ध्वस्त; जागतिक अहवाल सादर
4

Operation Sindoor: पाकिस्तानची ‘ती’ काळी रात्र! राफेलपुढे इस्लामाबादची शरणागती, कमांड सेंटर्स केले उद्ध्वस्त; जागतिक अहवाल सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.