Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण घेणार खामेनेईंच्या हत्येचा बदला; ट्रम्प, नेतन्याहूंसह जगातील ‘हे’ 13 नेते ‘किल लिस्ट’मध्ये

इस्त्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 09:42 AM
खामेनेईंच्या हत्येचा बदला

खामेनेईंच्या हत्येचा बदला

Follow Us
Follow Us:

तेहरान : अमेरिका-इराण यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाही. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लक्ष्य केल्या जाणाऱ्या व्यक्तींची यादी एका इराणी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. या यादीत अमेरिका, इस्त्रायल आणि युरोपीय देशांतील नेत्यांचा समावेश आहे.

वृत्तपत्राने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इतर प्रमुख नेत्यांची छायाचित्रे असलेले एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. ही यादी इराणच्या राजधानीतील प्रशासनाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘हमशहरी’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. या चित्रासोबत ‘अचानक मृत्यूसाठी तयार रहा’ असा मथळा होता. त्यात मोजतबा खामेनेई यांचे एक निवेदनही होते, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, बदला घेणे ही आमच्या राष्ट्राची इच्छा आहे आणि तो घेतलाच पाहिजे. मोजतबा यांनी हे निवेदन त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीनंतर दिले होते.

रुबियो, स्टारमर, रुबियोचाही समावेश

वृत्तपत्राच्या छायाचित्रांसहित यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, संरक्षण सचिव पीट हेगसेथ, इस्त्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांचा समावेश आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येसाठी वृत्तपत्राने या सर्व नेत्यांना जबाबदार धरले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहील आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका स्वीकारेल असे म्हटले. परंतु यासाठी या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांकडून २०% टोल वसूल केला जाईल. तसेच इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची जहाजे मात्र अडवली जातील अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.

होर्मुझमध्ये पुन्हा वाढला तणाव

इराण आणि अमेरिका या देशातील संबंध ताणले गेल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहे. याला इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. असे असताना आता होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून जात असताना ‘मोम्बासा’ आणि ‘अल बहिया’ या दोन राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर इराणच्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात ‘मोम्बासा’ जहाजावरील एक भारतीय कर्मचारी ठार झाला. इतर आठ जण जखमी झाले आहेत.

Iran-US War : होर्मुझमध्ये पुन्हा वाढला तणाव; इराणकडून UAE च्या तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

Web Title: Iran to avenge khameneis killing kill list publish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Iran-US War
  • Mojtaba Khamenei

संबंधित बातम्या

Iran-US War : होर्मुझमध्ये पुन्हा वाढला तणाव; इराणकडून UAE च्या तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू
1

Iran-US War : होर्मुझमध्ये पुन्हा वाढला तणाव; इराणकडून UAE च्या तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा तणाव; अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याने हादरले इराण, होर्मुझमधील जहाजावर…
2

Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा तणाव; अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याने हादरले इराण, होर्मुझमधील जहाजावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.