Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : महायुद्ध अटळ! ‘इराणने इस्रायलसाठी नरकाचे दरवाजे उघडले’; प्रचंड क्षेपणास्त्र हल्ल्याने तणाव शिगेला

Iran launches missiles on Tel Aviv : इस्रायलच्या अणुविरोधी कारवाईनंतर इराणने इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तरात्मक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून जगाला हादरवून सोडले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 16, 2025 | 03:15 PM
Iran unleashes hell Israel under massive missile fire

Iran unleashes hell Israel under massive missile fire

Follow Us
Close
Follow Us:

Iran launches missiles on Tel Aviv : इस्रायलच्या अणुविरोधी कारवाईनंतर इराणने इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तरात्मक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करून जगाला हादरवून सोडले आहे. इराणने एकाचवेळी २०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले असून, यामध्ये १५० पेक्षा अधिक मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे होती. त्यातील काही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेला भेदून गेली असून, देशांतर्गत मोठा विनाश झाला आहे. इराणने अनेक वर्षांपासून विकसित केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेचा हा परिणाम असून, इस्रायलसाठी हे युद्ध ‘नरकाचे दरवाजे’ उघडणारे ठरत आहे.

इराणने आपल्या लष्करी सामर्थ्याचा सर्वात महत्त्वाचा आधार असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर गेल्या ३० वर्षांत विशेष भर दिला आहे. फतेह-११०, झुल्फिकार, शहाब-३, खोरमशहर यांसारख्या क्षेपणास्त्रांद्वारे इराण आता इस्रायलवर उच्च-परिशुद्धतेने आघात करू शकतो. इस्रायली सैन्याने यातील बहुतेक क्षेपणास्त्रे पाडली असली, तरी ५ ते ७ क्षेपणास्त्रे संरक्षण रेषा ओलांडून देशात घुसली आणि मोठ्या प्रमाणावर हानी केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shehbaz Sharif Wives: ‘मॉडेल ते लेखक…’ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे लग्न का बनले आहेत चर्चेचा विषय?

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) खुलासा केला आहे की, इस्रायलवर १००० क्षेपणास्त्रे डागण्याची त्यांच्या कडे तयारी होती, पण इस्रायली हल्ल्यामुळे त्यात अडथळा आला. या खुलाशामुळे इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेचा खतरनाक स्तर अधोरेखित होतो. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, जगात कोणतीही हवाई संरक्षण यंत्रणा एका वेळी १००० क्षेपणास्त्रांचा सामना करू शकत नाही.

इराणने गेल्या काही वर्षांत शेकडो कमी, मध्यम व लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे साठवली आहेत. त्यांच्या क्षेपणास्त्रांमध्ये आता फक्त पारंपरिकच नव्हे तर अण्वस्त्र नेण्याची क्षमता असलेल्या ICBM (इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स) चा देखील समावेश आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार, इराणकडे सुमारे ३००० क्षेपणास्त्रे आहेत आणि त्यांचा क्षेपणास्त्र साठा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा आहे.

इस्रायलच्या आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग, अ‍ॅरो-२, अ‍ॅरो-३ व पॅट्रियट संरक्षण यंत्रणेमुळे मोठे नुकसान टळले असले तरी, काही क्षेपणास्त्र यशस्वीपणे घुसल्याने त्यांचे अपरिहार्य परिणाम दिसून येत आहेत. इस्रायलने जरी इराणचा अणुप्रकल्प वर्षभर मागे फेकण्याची क्षमता सिद्ध केली, तरी इराणने इस्रायलला मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक व मनोवैज्ञानिक नुकसान पोहोचवले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंनी कुटुंबासह सोडले घर; वाचा नेमकं कारण काय?

संरक्षण विश्लेषकांच्या मते, हे युद्ध अल्पकालीन न राहता दीर्घकाळ चालू शकते. इस्रायलकडे तांत्रिक व सामरिक प्रावीण्य आहे, पण इराणची क्षेपणास्त्र शक्ती आणि आत्मघातकी जिद्द ही चिंता वाढवणारी बाब आहे. तज्ज्ञांच्या मते, शेवटी अमेरिका या युद्धात उडी घेण्यास भाग पडेल. दुसरीकडे, इराणच्या आताच्या नेतृत्वावर संभाव्य हल्ला होऊन सत्तांतराचा मार्गही मोकळा होऊ शकतो. हे युद्ध केवळ दोन देशांपुरते न राहता संपूर्ण मध्यपूर्वेत भडका उडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Iran unleashes hell israel under massive missile fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • international news
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
2

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
3

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
4

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.