Imran Khan marriage controversy : पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ हे केवळ त्यांच्या राजकीय भूमिकेमुळेच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामुळेही सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या विवाहांचे आणि नातेसंबंधांचे अनेक पदर पाकिस्तानी समाजमाध्यमांपासून ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी आतापर्यंत अधिकृतपणे चार वेळा लग्न केले असून, या विवाहांभोवती अनेक गुप्तता, गोंधळ आणि वाद आहेत.
पहिले लग्न – चुलत बहिण नुसरत बटसोबत
शाहबाज शरीफ यांनी १९७३ मध्ये वयाच्या २२व्या वर्षी त्यांच्या चुलत बहिणी नुसरत बटसोबत लग्न केले. या विवाहातून त्यांना दोन मुले आणि दोन जुळ्या मुली झाली. मात्र, हे लग्न केवळ २० वर्षे टिकले आणि १९९३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात नुसरत बट यांचेही नाव समोर आले होते आणि त्या न्यायालयात हजरही झाल्या होत्या.
दुसरे लग्न – मॉडेल आलिया हनी
शाहबाज यांचे दुसरे लग्न पाकिस्तानी मॉडेल आलिया हनीशी झाले, जे पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले होते. हे लग्न त्यावेळी झाले, जेव्हा ते पंजाबचे मुख्यमंत्री होते, आणि ‘हनी ब्रिज’ या पुलामुळे मोठा वाद निर्माण झाला. आरोप असा होता की, हा पूल त्यांच्या पत्नीच्या घरापर्यंत जाण्यासाठी बांधण्यात आला होता. हे नाते फार काळ टिकले नाही, आणि १९९९ मध्ये ते विभक्त झाले. याच काळात नवाज शरीफ यांची हद्दपारी झाली आणि शाहबाजही सौदी अरेबियाला गेले. नंतर आलिया हनीचा मृत्यू झाला, ज्याला अनेकांनी ‘गूढ’ म्हटले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंनी कुटुंबासह सोडले घर; वाचा नेमकं कारण काय?
तिसरे लग्न – नर्गिस खोसा
त्याच वर्षी शाहबाज शरीफ यांनी नर्गिस खोसाशी तिसरे लग्न केले, जी पाकिस्तानच्या FIA चे माजी महासंचालक तारिक खोसा यांची बहीण होती. मात्र, शाहबाज यांचे कुटुंब या नात्याला विरोध करत होते, आणि त्यामुळे हे नाते फार काळ टिकू शकले नाही.
चौथे लग्न – लेखिका तेहमीना दुर्रानी
२००३ मध्ये शाहबाज यांनी प्रसिद्ध लेखिका तेहमीना दुर्रानी यांच्याशी चौथे लग्न केले. हे लग्नही अत्यंत गुप्त पद्धतीने झाले. तेहमीना आणि शाहबाज यांचे आठ वर्षांचे रिलेशनशिप विवाहात रूपांतरित झाले, मात्र इतक्या गुप्तपणे की कुटुंबीयांनाही त्याची कल्पना नव्हती. दुबईमध्ये आयोजित लग्न समारंभात ही बातमी अनेक पक्ष नेत्यांसाठी धक्कादायक ठरली. तेहमीना या ‘My Feudal Lord’ या पुस्तकाच्या लेखिका आहेत आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे माजी गव्हर्नर उल्लाह दुर्रानी यांची मुलगी आहेत. त्या आजही शाहबाज शरीफ यांची पत्नी आहेत.
नवाज शरीफ आणि शाहबाज शरीफ – वैयक्तिक आयुष्यातील फरक
शाहबाज शरीफ यांच्या विवाहित आयुष्याची सतत नवाज शरीफ यांच्या स्थिर जीवनाशी तुलना केली जाते. नवाज शरीफ यांनी फक्त एकच विवाह केला असून त्यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांच्याशी ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले. दुसरीकडे शाहबाज यांच्या अनेक विवाह आणि गुप्त नातेसंबंधामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलची ‘F-35I Adir’ लढाऊ विमाने सज्ज; 2000 किमीपर्यंत मारा करूनच परतले मायदेशी
शाहबाज शरीफ यांचे वैवाहिक जीवन
शाहबाज शरीफ यांचे वैवाहिक जीवन हे राजकीय चर्चांइतकंच वादग्रस्त आणि रंगतदार ठरले आहे. त्यांच्या व्यक्तिगत निर्णयांनी त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला अनेकदा धक्का दिला असून, त्यांच्या चार विवाहांची कथाही पाकिस्तानच्या राजकारणात एक वेगळेच प्रकरण बनली आहे. या सर्व घटनांमुळे एक बाब निश्चितपणे अधोरेखित होते. शाहबाज शरीफ यांचे खाजगी आयुष्य जसे गूढ आहे, तसेच ते राजकीय दृष्टिकोनातूनही अनेक रहस्ये पांघरून आहे.