
Iran vs Israel-USA War 2026,Missile Attack Attack on Khamenei Residence,
दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर आता इराणनेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणकडून इस्रायल आणि अमेरिकेवर ३० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराणवरील हल्ल्यानंतर इराणने आपणदेखील असे हल्ले करू की कोणी कल्पनाही केली नसेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर इराणने यामुळे इस्रायल-अमेरिका इराणमधील वातावरण चांगलेच तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र
मध्य पूर्वेतील सध्याच्या युद्धाच्या ठिणगीमागे इराणचा अणुप्रकल्प हे सर्वात मोठे आणि जुने कारण आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या मते, इराणचा ऊर्जा निर्मितीचा दावा हा केवळ एक मुखवटा असून, त्याआड अण्वस्त्रे विकसित करण्याची त्यांची मोठी योजना आहे. अण्वस्त्र तयार करण्यासाठी लागणारे युरेनियम एका विशिष्ट मर्यादेपलीकडे (अंदाजे ९०%) संवर्धित करणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) अहवालानुसार, इराणने या मर्यादेच्या अत्यंत जवळ मजल मारली आहे, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलचे धाबे दणाणले आहेत.
इराणने ‘फोर्डो’ आणि ‘नतांझ’ सारख्या ठिकाणी जमिनीखाली खोलवर अणू प्रयोगशाळा उभारल्या आहेत. इस्रायलचा असा दावा आहे की, या प्रयोगशाळांवर हवाई हल्ले करूनही त्या नष्ट करणे कठीण आहे, म्हणूनच इराण अण्वस्त्र संपन्न होण्याआधीच त्यांना रोखणे इस्रायलला आवश्यक वाटते. इराणचे वाढते अस्तित्तव आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका असल्याची इराणची भुमिका आहे. इराणच्या हाती अणुबॉम्ब लागणे म्हणजे जगाचा विनाश ओढवून घेणे आहे,” अशी भूमिका इस्रायलने वारंवार मांडली आहे.
इराणने यापूर्वीही अशाच प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात युरेनियम जमा झाले आहे, ज्याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी केला जातो. म्हणूनच जून २०२५ मध्ये इराणवर हल्ला करण्यात आला, परंतु इराण अढळ राहिला. पण अमेरिका आणि इस्रायल या देशांना इराणवर हल्ला करून त्याचा अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे थांबवण्याचा मानस आहे. इराणने पुन्हा कधीच अणुशक्ती बनण्याचा विचारही करू नये, या उद्देशाने इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर प्राणघातक हल्ला केला आहे.
रक्तरंजित संघर्षाचे एक कारण म्हणजे इराण इराक/सीरियामधील हिजबुल्लाह (लेबनॉन), हमास (गाझा), हुथी (येमेन) आणि शिया मिलिशियांना पाठिंबा देतो. २०२३-२०२४ च्या गाझा युद्धादरम्यान या गटांनी अमेरिका आणि इस्रायलवर हल्ला केला. अमेरिका आणि इस्रायलमध्ये इराणबद्दल द्वेष निर्माण करण्याचे हे देखील एक कारण आहे.
गेल्या काही काळापासून, अमेरिकेने इराणवर त्याचा अणुऊर्जा प्रकल्प सोडून देण्यासाठी आणि सर्व समृद्ध युरेनियम सोपविण्यासाठी आणि त्याचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि प्रॉक्सी गटांना (हिजबुल्लाह, हमास आणि हुथी) पाठिंबा देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. इराणने या अटी मान्य करण्यास नकार दिल्याने, डोनाल्ड ट्रम्प यांनी “यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही, थेट कारवाई करणार.” असा इशारा दिला होता.