Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

Israel आणि Iran यांच्यातील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे बाजाराची सुरुवात नकारात्मक होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. शुक्रवारी मोठी घसरण होऊन नुकसान झालं होतं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 04:03 PM
Israel आणि Iran

Israel आणि Iran

Follow Us
Follow Us:
  • इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका
  • शेअर बाजारावर काय होणार परिणाम?
  • ट्रम्प यांनी काय दिला इशारा?
Indian Stock Market:इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू झाले आहे. या तणावपूर्ण वातावरणामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दबाव येण्याची शक्यता आहे. शुक्रवारीही शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली होती. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे अंदाजे १५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे त्यामुळे आता सोमवारी नेमकं बाजार कशा पद्धतीने रिअॅक्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगामध्ये बदलणार ‘ही’ योजना; जाणून घ्या…

तज्ज्ञ का सांगतात?

वेल्थमिल सिक्यरिटीजच्या इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट क्रांती बाथिनी सांगतात, वाढत्या भू-राजकीय तणावामुळे बाजारात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. विक्रीचा दबावही वाढणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे बाजाराची सुरुवातच  नकारात्मक होण्याची शक्यता आहे. त्या पुढे सांगतात की या युद्धाचं रुपांतरण हे दीर्घकालीन होईल की अल्पकालीन लष्करी कारवाई असेल याचा अंदाज सध्या बाजार घेणार आहे. त्यानुसार त्याचे परिणाम कशा प्रकारचे असतील हे लक्षात येतील. यावरुन युद्धाचे परिणाम किती व्यापक स्वरुपाचे असतील याचा अंदाज येईल.

पूर्वनियोजित हल्ला

इराणवर पूर्वनियोजित हल्ला केल्याने इस्त्रायलने देशभरात तात्काळ आणीबाणीची घोषणा केली आहे. इस्त्रायलच्या पूर्वनियोजित हल्ल्यांनंतर देशभरात सायरन बाजू लागले आहे. सायरन वाजल्यास इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) च्या होम फ्रंट कमांडने नागरिकांना बॉम्ब निवारा केंद्रांजवळ राहण्याचा इशारा दिला आहे. होम फ्रंट कमांडच्या संदेशात म्हटले आहे की, परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांनी सुरक्षित निवारा केंद्र त्यांच्या जवळ कुठे आहे याची खात्री करावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा.

ट्रम्प यांची घोषणा

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितलं की, इस्रायलने हल्ले केल्यानंतर अमेरिकेने इराणविरुद्ध मोठ्या प्रमाणात युद्ध मोहीम सुरू केली आहे. ट्रम्प यांनी कबूल केले की इराणच्या हल्ल्यात अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात. युद्धात असं बऱ्याचदा घडतं. ट्रम्प यांनी इराणी जनतेला सरकारची सत्ता स्वतःच्या हातात घेण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी दावा केला की इराण अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्याची योजना आखत आहे.

शुक्रवारी किती नुकसान?

गेल्या शुक्रवारी बाजारातील तीव्र घसरणीनंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹4.98 ट्रिलियनची घट झाली आहे. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचं बाजार भांडवल एका दिवसात ₹498,603.42 कोटींनी घसरून ₹46,350,671.27अब्ज म्हणजे 5.10ट्रिलियन इतकं झालं.

सेन्सेक्स आणि निफ्टी

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवल बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आणि जागतिक जोखीम घेण्याची क्षमता वाढल्याने जागतिक बाजारपेठेत कमकुवतपणा आल्याने सेन्सेक्स एक टक्क्यांहून अधिक घसरला. बीएसई सेन्सेक्स 961.42 अंकांनी किंवा1.17 टक्क्यांनी घसरून 81,287.19 वर बंद झाला. दिवसभरात तो 1,089.46 अंकांनी घसरला होता. त्याचप्रमाणे, NSEचा 50 शेअर्सचा बेंचमार्क निफ्टी 317.90 अंकांनी किंवा 1.25 टक्क्यांनी घसरून 25,178.65 वर बंद झाला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार बाजारात विक्रेते राहिले. त्यांनी शुक्रवारी 7,536.36 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

AI ची जादू! Nano Banana 2 मुळे त्वरित बनवा 4K इमेजेस; फोटोंच्या बॅकग्राउंडमध्ये कमालीचे बदल…

Web Title: Israel iran tension may trigger selling pressure now indian stock market focus on monday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Attack
  • Donald Trump
  • Iran Attack
  • Iran News
  • Iran Vs America
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक
1

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक

तुफान बॉम्बिंग , अमेरिकेची इराणच्या चाबहार बंदरावर ऍक्शन . भारताला आले टेंशन
2

तुफान बॉम्बिंग , अमेरिकेची इराणच्या चाबहार बंदरावर ऍक्शन . भारताला आले टेंशन

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
3

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो
4

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.