Iran-Israel War: इराणचा 'अणु' माज उतरवणार? 'असे' आहे इस्रायल-अमेरिकेचे 'operation epic fury'; पाहा युद्धाचा भीषण चेहरा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Israel daylight strikes on Iran 2026 : युद्ध म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो रात्रीचा अंधार आणि आकाशात चमकणारी क्षेपणास्त्रे. मात्र, आज मध्यपूर्वेतील युद्धाने जगाला चकित करणारी एक वेगळीच दिशा घेतली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने (US Israel Operation Epic Fury)credit – social media and Twitter अत्यंत गुप्ततेने महिनाभरापासून आखलेली एक महाभयंकर योजना प्रत्यक्षात आणली आहे. यावेळी इराणला धक्का देण्यासाठी त्यांनी रात्रीच्या अंधाराची वाट पाहिली नाही, तर भरदिवसा दुपारी तेहरान, इस्फहान आणि कोम यांसारख्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. या “दिवसाच्या हल्ल्याने” (Daylight Strikes) इराणची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कोलमडली असून जगाचा श्वास रोखला गेला आहे.
सामान्यतः शत्रू जेव्हा गाफील असतो, तेव्हा रात्री हल्ले केले जातात. पण संरक्षण तज्ज्ञांच्या मते, दिवसा हल्ला करून इस्रायलने इराणला असा संदेश दिला आहे की, “आम्ही कधीही आणि कुठेही तुमच्या घरात घुसून मारू शकतो.” दिवसा हल्ले केल्यामुळे इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला (Air Defense System) प्रतिसादासाठी खूपच कमी वेळ मिळाला. तेहरानच्या रस्त्यांवर जेव्हा लोक दैनंदिन कामात व्यस्त होते, तेव्हा अचानक झालेल्या या महास्फोटांमुळे शहरात अभूतपूर्व भीती पसरली. शत्रूला आपली तयारी दाखवण्यासाठी आणि जास्तीत जास्त मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ही ‘डेलाईट स्ट्राईक’ रणनीती वापरण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: इराणचा सूर्य मावळणार? अमेरिकन शक्तीसह इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार; खामेनींचा राजवाडा, तेहरानही मातीमोल
हे केवळ एका दिवसाचे हवाई हल्ले नसून, हे चार दिवस चालणारे एक व्यापक लष्करी अभियान आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील इस्फहान आणि कोम येथील महत्त्वाच्या अणुसंशोधन केंद्रांना लक्ष्य केले आहे. या मोहिमेमुळे इराणच्या अणुशक्ती बनण्याच्या प्रयत्नांना किमान २० वर्षे मागे ढकलले जाण्याची शक्यता आहे. हल्ल्याच्या सुरुवातीलाच इराणमधील इंटरनेट आणि मोबाईल सेवा खंडित करण्यात आली, तसेच महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट हॅक करून इराणची संपर्क यंत्रणा निकामी करण्यात आली. यामुळे इराणला आपल्या सैन्याशी संपर्क साधणे कठीण झाले आहे.
There are singular, terrifying moments in history that do not merely turn the page—they set the entire book ablaze, forcing humanity to write the next chapter in the ashes of the old world order. Today, Saturday, February 28, 2026, is precisely such a moment. As sirens wail… pic.twitter.com/ixgOj5ShSk — Raj Malhotra (@Rajmalhotrachd) February 28, 2026
credit – social media and Twitter
या भीषण हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला उद्देशून एक महत्त्वाचे विधान केले. ट्रम्प म्हणाले की, “इराणला अणुबॉम्ब बनवण्याची संधी देणे म्हणजे संपूर्ण जगाला धोक्यात घालण्यासारखे आहे. आमचा उद्देश इराणला नष्ट करणे नाही, तर त्यांच्या विनाशकारी अणुकर्क्षमतेला संपवणे आहे.” ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेचा या युद्धात सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून, इराणवरील दबाव आता प्रचंड वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: जगाचा श्वास रोखला! Iranचा विजयोन्माद; 70 क्षेपणास्त्रांनी Israel चं आकाश फाडलं, जेरुसलेममध्ये मृत्यू तांडव
सतत उडणारी विमाने आणि कोसळणारी क्षेपणास्त्रे यामुळे तेहरानमधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे. इराणच्या अनेक शहरांमध्ये गनपाऊडरचा वास आणि धुराचे लोट दिसत आहेत. जर हे युद्ध असेच चालू राहिले, तर इराणची अवस्था युक्रेनसारखी होईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होत आहे. पायाभूत सुविधांचे होणारे नुकसान आणि वाढती जीवितहानी यामुळे इराण भविष्यात एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या युद्धाने मध्यपूर्वेतील शांततेचे सर्व प्रयत्न उधळून लावले आहेत.
Ans: शत्रूला आश्चर्यचकित करण्यासाठी आणि त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेला प्रतिसादासाठी वेळ न देण्यासाठी हा धोरणात्मक बदल करण्यात आला.
Ans: इराणची अणुकेंद्रे, लष्करी तळे आणि तेहरान, इस्फहान, कोम सारखी प्रमुख शहरे हे या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते.
Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणला अणुशक्ती बनण्यापासून रोखण्यासाठी आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई आवश्यक होती.






