Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran War : इस्रायलवर कतार संतापला; ‘युद्धाचा फायदा घेत संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले’

Iran War :इराणविरुद्धच्या युद्धाचा फायदा घेत इस्रायल संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले करत असल्याचा गंभीर आरोप कतारने केला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी हा दावा केला. पश्चिम आशियातील वाढता तणाव कमी करण्यासाठी कतार ओमान आणि पाकिस्तानसोबत मिळून राजनैतिक प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट केले .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 01, 2026 | 06:38 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • युद्धाच्या आडून हल्ले केल्याचा कतारचा आरोप
  • कतार ,ओमान आणि पाकिस्तान एकत्र तणाव कमी करण्याचा प्रयत्न
  • मध्यपूर्वेत संघर्ष वाढण्याची भीती
Iran War : इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे . या पार्श्वभूमीवर कतारने इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत . इराणाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धाचा फायदा घेत इस्रायल संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले करत असल्याचा दावा कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे . या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील अस्थिरता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे .

युद्धाच्या आडून हल्ले केल्याचा कतारचा आरोप

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल – अन्सारी यांनी इस्रायल वर थेट निशाणा साधला . इराण विरुद्धच्या संघर्षाचा फायदा घेत इस्रायल विविध ठिकाणी लष्करी कारवाया करत असल्याचा आरोप त्यांनी केला .

अल अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार या कारवायांमुळे केवळ इराण आणि इस्रायल मधील संघर्षापुरता परिणाम मर्यादित राहिलेला नाही . तर संपूर्ण पश्चिम आशियातील परिस्थितीवर त्याचा परिणाम होत आहे . त्यामुळे संघर्षाचा विस्तार होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीने राजनैतिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे संकेत कतारने दिले आहेत .

Russia-Ukraine War : कीव्हवरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू; रशिया-युक्रेन युद्धाची भारताला पुन्हा झळ

कतार ,ओमान आणि पाकिस्तान एकत्र तणाव कमी करण्याचा प्रयत्न

दरम्यान , वाढता तणाव कमी करण्यासाठी कतारने ओमान आणि पाकिस्तानसोबत समन्वय साधला आहे . तिन्ही देश राजनैतिक पातळीवर प्रयत्न करत असून संघर्ष आणखी भडकू नये यासाठी संवादाचा मार्ग खुला ठेवण्यावर भर दिला जात आहे . मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये कतार आणि ओमान यांची भूमिका यापूर्वीही महत्वाची राहिली आहे .

पाकिस्तानही या संकटात राजनैतिक तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे या तीन देशांच्या संयुक्त प्रयत्नांकडे आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे .

Indus Water Treaty : सिंधू जलसंधीबाबत हेगच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून स्वागत; भारताने निर्णय फेटाळला

मध्यपूर्वेत संघर्ष वाढण्याची भीती

इराण – इस्रायल संघर्षाचा थेट परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेच्या सुरक्षेवर होण्याची शक्यता आहे . आधीच अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना नव्या लष्करी कारवायांमुळे संघर्षाचा विस्तार होण्याची चिंता वाढली आहे . कतार कडून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आहे असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती किती लवकर नियंत्रणात येते हे महत्त्वाचे ठरणार आहे .

इराण इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्यास आखाती देश , तेल वाहतूक मार्ग आणि जागतिक ऊर्जा बाजारावरही त्याचे परिणाम होऊ शकतात . त्यामुळे कतार , ओमान आणि पाकिस्तानच्या राजनैतिक हालचालींना विशेष महत्व प्राप्त झाले आहे .

 

Web Title: Iran war qatar furious with israel lethal attacks across the entire region by exploiting the war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Gulf Countries
  • Iran Israel Conflict
  • Middle East War Impact
  • Qatar

संबंधित बातम्या

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला
1

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

Iran-Gulf Crisis : खामेनेईंचे आखाती देशांना आवाहन; अमेरिका-इस्रायलविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावे
2

Iran-Gulf Crisis : खामेनेईंचे आखाती देशांना आवाहन; अमेरिका-इस्रायलविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावे

Iran War : शाळेवरील हल्ल्याला सहा महिने; मुलांना गमावलेल्या पालकांचा शोक अजूनही कायम
3

Iran War : शाळेवरील हल्ल्याला सहा महिने; मुलांना गमावलेल्या पालकांचा शोक अजूनही कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.