Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War : इस्त्रायलचा इराणवर पुन्हा मोठा हल्ला; खामेनेई यांच्यानंतर आता सुरक्षाप्रमुखाचा मृत्यू

अयातुल्ला अली खामेनेई यांच्यानंतर लारीजानी हे सर्वात प्रभावी व्यक्ती मानले जातात. त्यांच्या मृत्यूच्या दाव्याला दुजोरा मिळाल्यास, खामेनेई यांच्यानंतर मारले गेलेले ते इराणचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी ठरतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2026 | 08:06 AM
इराणच्या सुरक्षा प्रमुखाला यमसदनी धाडले

इराणच्या सुरक्षा प्रमुखाला यमसदनी धाडले

Follow Us
Follow Us:

तेहरान : इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतरही इस्त्रायल-अमेरिकेकडून हल्ले सुरुच आहेत. आता इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी मारले गेल्याचे सांगण्यात आले आहे. याचसोबत इस्रायलने आणखी एका हल्ल्यात इराणच्या ‘बासिज’ दलाचे कमांडर घोलमरेझा सुलेमानी यांनाही ठार केले, असा दावा इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्झ यांनी केला आहे.

लारीजानी हे पूर्वी इराणचे अणू चर्चेतील मुख्य वार्ताकार होते आणि सध्या ते इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून कार्यरत होते. इराणच्या सत्तेत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यानंतर लारीजानी हे सर्वात प्रभावी व्यक्ती मानले जातात. त्यांच्या मृत्यूच्या दाव्याला दुजोरा मिळाल्यास, खामेनेई यांच्यानंतर मारले गेलेले ते इराणचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी ठरतील. इराणच्या सरकारी माध्यमांनी मंगळवारी लारीजानी यांच्या नावाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

हेदेखील वाचा : Donal Trump प्रशासनात मोठा भूकंप! “इस्रायलच्या दबावामुळे इराणवर युद्ध…”, अमेरिकन टॉप ऑफिसर यांचा खळबळजनक राजीनामा

निवेदनात म्हटले आहे की, ४७ वर्षांपूर्वी इराणच्या क्रांतीवेळी तत्कालीन राजवटीने गर्दीचा आवाज रेकॉर्ड केलेला असल्याचा दावा केला होता. आता ट्रम्प इराणमधील अमेरिका-विरोधी सभांच्या फोटोंना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’द्वारे तयार केलेले फोटो म्हणत आहेत. इराणच्या जनतेचा ऐतिहासिक विजय आता जवळ आहे.

सौदी अरेबियाच्या पूर्व भागात ड्रोन

दुबई आणि दोहामध्ये मिसाईल अलर्टनंतर स्फोटांचे आवाज ऐकू आले. सौदी अरेबियाने त्यांच्या पूर्व भागात ड्रोन पाडल्याचे सांगितले आहे. बगदाद विमानतळाजवळील अमेरिकन राजनैतिक केंद्राला रॉकेटने लक्ष्य करण्यात आले. यापूर्वी बगदादमधील अमेरिकन दूतावासावरही ड्रोन आणि मिसाइलने हल्ले झाल्याचे वृत्त आहे.

इस्त्रायलच्या दबावामुळे युद्ध

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष पेटलेला असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांना प्रशासनांतर्गत मोठ्या बंडाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी विभागाचे (NCTC) सर्वोच्च अधिकारी जो केंट यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. “इराणपासून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका नसताना केवळ इस्रायलच्या दबावाखाली हे युद्ध सुरू करण्यात आले आहे,” असा गंभीर आरोप करत केंट यांनी ट्रम्प यांच्या युद्धनीतीला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

Web Title: Irans security chief killed in israeli attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • international news
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
2

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.