
weapons
चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल ६ अब्जांचा दंड, प्रकरण काय?
इराणच्या सुरक्षा संस्थेने आणि गुप्तचर संस्था आयआरजीसीने पश्चिम अझरबैजान प्रांतात इराणविरोधी मोठा डाव रचला जाता होता असे म्हटले आहे. या दोन्ही संस्थांनी मिळून संयुक्तपण उर्मिया काउंटी सीमेवर छापा मारला. या छापादरम्यान अझरबैजानमार्गे देशात शस्त्रांची आणि स्फोटखांची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे.
यामध्ये १९८ स्फोटके, शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा असल्याचे आयआरजीसीच्या अहवालात नूमद करण्यात आले आहे. आयआरजीसीच्या हमझे सय्यद अल-शुहादा तळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिया काउंटी मार्गावर त्यांचे सैन्य पाळत ठेवून होता. गुप्त ट्रॅकिंग आणि ग्राउंड ऑपरेशन्सच्या मदतीने ही तस्करी थांबवण्यात आली आहे.
आयआरजीसीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, ही तस्करी सीमेपलीलकडील देशांमधून होत होती. याचा उद्देश इराणमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणणे होता, तोडफोड, इराणच्या सुरक्षा व्यवस्थेला अस्थिर करणे आणि त्याच्या अतंर्गत भागांमध्ये दहशतवाद परसवणे हा या तस्करीचा हेतू होता. परंचतु इराणच्या सुरक्षा व्यवस्थांनी हा मोठा कट रोखला आहे.
आयआरजीसीच्या माहितीनुसार, ही पहिलीच घटना नाही. इराणच्या आग्नेय प्रांतात सिस्तान आणि बुलचिस्तानमध्ये कुख्यात अन्सार अल-पुरकारन संघटना देखील मोठा डाव खेळत होती, जो सुरक्षा संस्थांनी वेळेत मोडीस काढला. इराणचे हे दोन्ही प्रदेश दहशवादी संघटनांच्या कारवायांसाठी आणित्यांच्या लपण्याचे हॉटस्पॉट मानले जाते. सध्या इराण पूर्व आणि पश्चिम सीमांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे.
इराणमध्ये २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात गोहरकोह मध्ये दहशवादी हल्ला झाला होता. या हल्लात इराणचे १० सैनिक शहीद झाले होते. कुख्यात दहशवादी संघटना जैश अल-अदलने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. हा सर्वा प्राणघात हल्ल्यापैकी एक मानला जातो. यापूर्वी देखील जैश अल-अदलने इराणमध्ये अनेक दहशवादी हल्ले केले आहेत. तसेच सीमा सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अपहरण, पोलिस चौक्यांवर हल्ला आणि नागरिकांवर हल्ल्याचेही आरोप या संघटनेवर आहे.या संघटनेने इराणमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरवली आहे.
Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
Ans: इराणची गुप्तचर संस्था आयआरजीसीच्या ग्राउंड फ्रोर्सेस आणि इंटेलिजेंस ऑर्गनायजेशनने अझरबैझान मार्गे होणाऱ्या शस्त्रास्त्रांची आणि स्फोटकांची तस्करी उघडकीस केली आहे.
Ans: इराणमध्ये २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात गोहरकोह मध्ये दहशवादी हल्ला झाला होता.