Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alireza Tangsiri : समुद्रात ‘अदृश्य युद्ध’! इस्रायलचा थेट इराणच्या ‘नौदल प्रमुखा’वर अचूक नेम; अलीरेझा तंगसिरी खल्लास

Alireza Tangsiri Killed : इस्रायलच्या अचूक हल्ल्यात आयआरजीसी नौदल प्रमुख लिरेझा तंगसिरी ठार झाले आहेत. बंदर अब्बास हे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ वसलेले आहे. याबाबत वाचा सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 26, 2026 | 02:39 PM
irgc navy chief alireza tangsiri killed israel strait of hormuz attack 2026

irgc navy chief alireza tangsiri killed israel strait of hormuz attack 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वात मोठा प्रहार
  • इराणच्या नाकेबंदीला धक्का
  • अमेरिकन सैन्याची एन्ट्री

Alireza Tangsiri Killed Israel : मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आता सर्वात भीषण वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात इस्रायलने आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला असल्याचा दावा केला जात आहे. इराणच्या सागरी शक्तीचा कणा मानले जाणारे आणि आयआरजीसी (IRGC) नौदलाचे सर्वेसर्वा अलीरेझा तंगसिरी यांना इस्रायलने एका प्राणघातक हल्ल्यात ठार केले आहे. हा हल्ला अशा ठिकाणी झाला आहे, जिथून जगाच्या अर्थव्यवस्थेची नाडी चालते ती म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी.

बंदर अब्बासजवळ मृत्यूचं तांडव!

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला दक्षिण इराणमधील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बंदर अब्बास या बंदराजवळ झाला. अलीरेझा तंगसिरी हे इराणच्या विशेष नौदल दलाचे नेतृत्व करत होते. इराणकडे दोन नौदले आहेत: एक अधिकृत सरकारी नौदल आणि दुसरे अधिक शक्तिशाली मानले जाणारे आयआरजीसी नौदल. तंगसिरी हे याच आयआरजीसीच्या ताफ्याचे प्रमुख होते. होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी बंद करण्यात आणि तिथे इराणची पकड मजबूत करण्यात तंगसिरी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: मला दुसरं काम आहे, युद्ध लवकर संपवा! ट्रम्पच्या एका फोनने सर्वांच्याच मनात उठले भीतीचे काहूर; नेमकी कशाची चाहूल?

का महत्त्वाचे होते अलीरेझा तंगसिरी?

तंगसिरी केवळ एक अधिकारी नव्हते, तर ते इराणच्या सागरी युद्धाचे ‘मास्टरमाइंड’ होते. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील २० टक्के तेल आणि वायू व्यापाराची ‘लाईफलाईन’ आहे. इराणने हा मार्ग रोखल्यामुळे जगातील अनेक देशांचे अर्थकारण संकटात आले होते. तंगसिरी यांच्या नेतृत्वाखालील आयआरजीसी नौदल सातत्याने अमेरिकन आणि पाश्चात्य जहाजांना या भागात आव्हान देत होते. त्यांच्या मृत्यूनंतर इराणसाठी हा मार्ग सुरक्षित ठेवणे आणि त्यावर नियंत्रण मिळवणे आता अशक्यप्राय होऊ शकते.

A strike killed the head of the Islamic Revolutionary Guard Corps’ Navy, Alireza Tangsiri, in Bandar Abbas, adjacent to the Strait of Hormuz, an Israeli official told The Jerusalem Post on Thursday.
Reporting by @AmichaiStein1 https://t.co/lrADJGJO0f
— The Jerusalem Post (@Jerusalem_Post) March 26, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकन मरीन कमांडोंची एन्ट्री आणि जागतिक युद्धछाय

तंगसिरी यांच्या कथित हत्येनंतर अमेरिकेने तातडीने मोठी हालचाल सुरू केली आहे. सुमारे ४,७०० मरीन कमांडो आणि दोन महाकाय युद्धनौका मध्य-पूर्वेकडे पाठवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या नौका होर्मुझजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा उद्देश स्पष्ट आहे – होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही परिस्थितीत खुली करणे. जर इराणने तंगसिरींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मोठे पाऊल उचलले, तर अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Slavery Reparations : ‘आम्ही पैसे देणार नाही!’ ब्रिटनचा आरडाओरडा; पण भारताच्या एका मताने ‘असं’ बदललं जगाचं चित्र

इराणची संशयास्पद शांतता

विशेष म्हणजे, इराणने अद्याप अलीरेझा तंगसिरी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केलेली नाही. यापूर्वी जानेवारी २०२६ मध्येही त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, ज्या इराणने फेटाळून लावल्या होत्या. मात्र, यावेळी इस्रायली अधिकाऱ्यांनी पुराव्यांसह दावा केल्यामुळे इराणच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. जर हा दावा खरा ठरला, तर इराणसाठी हा जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतरचा सर्वात मोठा लष्करी धक्का असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अलीरेझा तंगसिरी कोण होते?

    Ans: अलीरेझा तंगसिरी हे इराणच्या सर्वात शक्तिशाली लष्करी गटाच्या, म्हणजेच आयआरजीसी (IRGC) नौदलाचे प्रमुख होते आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणच्या नियंत्रणाचे मुख्य सूत्रधार होते.

  • Que: हा हल्ला नक्की कोठे झाला?

    Ans: हा हल्ला दक्षिण इराणमधील 'बंदर अब्बास' बंदराजवळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या जवळच्या परिसरात झाला.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी जगासाठी का महत्त्वाची आहे?

    Ans: जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायू व्यापारापैकी सुमारे २० टक्के व्यापार याच अरुंद जलमार्गातून होतो, त्यामुळे यावर ज्याचे नियंत्रण असेल तो जगाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकतो.

Web Title: Irgc navy chief alireza tangsiri killed israel strait of hormuz attack 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Slavery Reparations : ‘आम्ही पैसे देणार नाही!’ ब्रिटनचा आरडाओरडा; पण भारताच्या एका मताने ‘असं’ बदललं जगाचं चित्र
1

Slavery Reparations : ‘आम्ही पैसे देणार नाही!’ ब्रिटनचा आरडाओरडा; पण भारताच्या एका मताने ‘असं’ बदललं जगाचं चित्र

‘युद्ध नको, तेल…’ पाक संरक्षण मंत्री Khawaja Asif यांनी USच्या ‘शांती’ नाटकाची उडवली खिल्ली; इराणने 15-कलमी योजना फेटाळली
2

‘युद्ध नको, तेल…’ पाक संरक्षण मंत्री Khawaja Asif यांनी USच्या ‘शांती’ नाटकाची उडवली खिल्ली; इराणने 15-कलमी योजना फेटाळली

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ
3

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ

World War 3 : अमेरिकेचे ‘सुरक्षा कवच’ अयशस्वी! 6 अमेरिकन सैनिकांचा बळी; कुवेत ते कतारपर्यंत अमेरिकन तळांचे तोडले ‘असे’ लचके
4

World War 3 : अमेरिकेचे ‘सुरक्षा कवच’ अयशस्वी! 6 अमेरिकन सैनिकांचा बळी; कुवेत ते कतारपर्यंत अमेरिकन तळांचे तोडले ‘असे’ लचके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.