ट्रम्प यांच्या मनात इराण युद्धाचाच विचार घोळत आहे... अजून बरेच काम करायचे आहे असे सांगून त्यांनी एका अधिकाऱ्याला युद्ध लवकर संपवण्याचा आदेश दिला. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Donald Trump Iran War Deadline 2026 : जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या अत्यंत वेगवान हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (
Donald Trump) यांनी आता इराण युद्धाबाबत आपला सर्वात मोठा आणि अंतिम निर्णय घेतला आहे. “मला अजून बरेच काम करायचे आहे,” असे म्हणत ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आणि सल्लागारांना हे युद्ध येत्या ४ ते ६ आठवड्यांत संपवण्याचा कडक आदेश दिला आहे. ट्रम्प यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे केवळ इराणच नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष आता व्हाईट हाऊसकडे लागले आहे.
ट्रम्प यांना इराणसोबतचा हा संघर्ष का लांबवायचा नाहीये, यामागे एक मोठे राजनैतिक कारण आहे. मे महिन्याच्या मध्यात बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांची एक महत्त्वाची शिखर परिषद होणार आहे. या परिषदेपूर्वी इराणचे संकट पूर्णपणे दूर झालेले असावे, अशी ट्रम्प यांची जिद्द आहे. इराण युद्धावरून जगाचे लक्ष विचलित होत असल्याने, त्यांना आता आपल्या देशांतर्गत राजकीय अजेंड्यावर आणि चीनसोबतच्या व्यापारिक संबंधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
ट्रम्प यांच्या या घाईमागे अमेरिकेचे अंतर्गत नुकसान हे देखील एक मोठे कारण आहे. आतापर्यंत या संघर्षात सुमारे ३०० अमेरिकन सैनिक जखमी झाले असून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेसाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि आगामी निवडणुकांचे आव्हान पाहता, ट्रम्प यांना हे युद्ध परवडणारे नाही. “युद्ध लवकर संपवा, नाहीतर परिस्थिती गंभीर होईल,” असा सूचक इशारा व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनीही दिला आहे.
( @realDonaldTrump – Truth Social Post )
( Donald J. Trump – Mar 25 2026, 2:17 PM ET ) My meeting with the Highly Respected President of China, President Xi Jinping, which was originally postponed due to our Military operation in Iran, has been rescheduled, and will take place… pic.twitter.com/hCLJ6AZvS4 — Donald J Trump Posts TruthSocial (@TruthTrumpPost) March 25, 2026
credit – social media and Twitter
डोनाल्ड ट्रम्प केवळ युद्ध संपवण्याचा विचार करत नाहीत, तर त्यातून अमेरिकेचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, हे देखील पाहत आहेत. आपल्या सल्लागारांशी चर्चा करताना ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, जर एखादा करार झाला, तर अमेरिकेला इराणच्या तेल साठ्यांवर ताबा मिळवता येईल. जर असे झाले, तर जागतिक तेल बाजारात अमेरिकेची मक्तेदारी निर्माण होईल. मात्र, इराण या अटी मान्य करेल का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: मोठा दिलासा! अखेर इराणने होर्मुझचं दार उघडलं; भारत आणि ‘या’ देशांना LPG आणि Oil नेण्यासाठी फ्री एन्ट्री
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे सध्या जागतिक व्यापाराला मोठा फटका बसत आहे. इस्रायल आणि आखाती देश या संघर्षात स्वतःचे हित शोधत आहेत, तर काही मित्र राष्ट्रांना लष्करी कारवाई ऐवजी राजनैतिक तोडगा हवा आहे. इराणमध्ये सत्तापालट करावा की केवळ लष्करी तळांना लक्ष्य करावे, यावरून व्हाईट हाऊसमध्येही मतभेद आहेत. मात्र, ट्रम्प यांनी आता ४-६ आठवड्यांचा ‘काउंटडाऊन’ सुरू केल्याने लष्करी हालचालींना वेग आला आहे.
Ans: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ४ ते ६ आठवड्यांची कालमर्यादा दिली असून, मे महिन्यापर्यंत युद्ध संपवण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: मे २०२६ च्या मध्यात बीजिंगमध्ये चीन आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची शिखर परिषद नियोजित आहे.
Ans: युद्ध संपवून इराणच्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवणे आणि देशांतर्गत राजकीय अजेंड्यावर लक्ष केंद्रित करणे हे ट्रम्प यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.






