Is America's defense capability at risk claim by the country's former military officer created a stir.
वॉशिंग्टन : अमेरिकेला जगातील सर्वा शक्तीशाली लष्करी देश म्हणून ओळखले जाते. हा देश जगभरातील अनेक देशांना शस्त्रांची मदत पुरवतो. परंतु अमेरिकाला आता शस्त्रास्त्रांचा पुरवठा कमी पडत आहे. अमेरिकेचे माजी लष्कर अधिकारी कर्नल आणि पेंटागॉनचे माजी सल्लागार डग्लस मॅकग्रेगर यांनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे.
डग्लस मॅकग्रेगर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका युद्धभूमीत उतरल्यास केवळ ८ दिवस टिकू शकेल. यानंतर अमेरिकेकडे केवळ अण्वस्त्रांचा पर्याय राहिल.
डग्लस मॅकग्रेगर यांचे हे विधान अशा वेळी आहे, जेव्हा ट्रम्प यांनी नुकतेच युक्रेनला अमेरिकन शस्त्रास्त्रांचा साठा पुरवण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही काळात रशियाविरुद्धच्या युद्धादरम्यान अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रांचा मोठा पुरवठा केला आहे. परंतु यामुळे अमेरिकेच्या संरक्षण तयारीवर मोठा परिमाण होत असल्याचे म्हटले जात आहे.
डग्लस मॅकग्रेगर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने परदेशी देशांना शस्त्र पुरवठा थांबवला पाहिजे. आता अमेरिकेा युद्धभूमीत उतरल्यास केवळ ८ दिवसच लढू शकेले, त्यानंतर अमेरिकेपुढे अण्वस्त्रांचा वापर करण्याशिवाय कोणताही पर्याय उपल्बध राहणार नाही.
America needs to stop sending weapons abroad. Very reliable sources tell me we have roughly 8 days of offensive and defensive missiles on hand and readily available. Translation, we can fight an 8 days war and then we would have to go nuclear. — Douglas Macgregor (@DougAMacgregor) July 18, 2025
डग्लस मॅकग्रेगर यांच्या विधानाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानेने स्पष्ट होत आहे की, सध्या अमेरिकेचा क्षेपणास्त्र साठा धोक्यात येत आहे, यामुळे अमेरिकाच नव्हे तर जागतिक सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
याच वेळी रशियाने पाश्चत्य देशांकडून विशेष करुन अमेरिकेकडून युक्रेनला पुरवल्या जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांवर आक्षेप घेतला आहे. रशियाचे मते, युक्रेन या क्षेपणास्त्रांचा वापर रशियाच्या नागरी भागांवर करत आहे. यामुळे प्रादेशिक अशांतता निर्माण होत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नाटो देशांना या लढाई पासून दूर राहण्याचा थेट इशाराही दिली आहे.